पंप झाले, विमानतळ झालं; आता अदानी ऑनलाईन ट्रॅव्हल बिझनेसमध्ये

गौतम अदानी आणि अदानी ग्रुपचं नाव गेल्या काही महिन्यांत तुम्ही सातत्यानं ऐकत असाल. देशातल्या आणि परदेशातल्या अनेक व्यवसायांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या अदानी यांनी आता ऑनलाईन ट्रॅव्हल क्षेत्रात उडी घेतली आहे.

क्लिअरट्रिप प्रायव्हेट लिमिटेड या ऑनलाईन ट्रॅव्हल ॲग्रिगेटर कंपनीमध्ये अदानी ग्रुपनं शेअर घेत भागीदारी केली आहे. या डीलबाबत आणखी माहिती उपलब्ध झाली नसली, तरी नोव्हेंबर महिन्याच्या आधी खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच देशातल्या अनेक विमानतळांचं व्यवस्थापन अदानी उद्योग समुहाकडे आहे.

क्लिअरट्रिप काय आहे?

क्लिअरट्रिप हे मोबाईल ॲप आणि वेबसाईट आहे. याद्वारे जगभरात कुठंही फ्लाईट्स बुक करता येतात. सोबतच हॉटेल आणि ट्रेनचं बुकिंगही करता येतं. ही कंपनी फ्लिपकार्टनं विकत घेतल्यानंतर व्यवसायात जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली होती. आता अदानी ग्रुपची एन्ट्री झाल्यामुळं व्यवसाय नवी उंची गाठेल अशी चर्चा आहे.

अदानी ग्रुपचं म्हणणं काय?

अदानी ग्रुपनं एक निवेदन प्रसिद्ध करत, त्यात सांगितलंय की, ‘या व्यवहारामुळे फ्लिपकार्टसोबत आमचे संबंध अधिक व्यापक होऊन ते आता डेटा सेंटरपासून हवाई प्रवासापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये वाढत आहे. आम्ही एका स्वदेशी कंपनीसोबत भागीदारी केल्याचा फायदा देशातल्या युवकांना होणार आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नामध्ये हे आमचं एक छोटं योगदान आहे.

फ्लिपकार्ट काय म्हणतंय?

आम्ही अदानी समूहासोबतचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रवासाशी निगडित पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी आपलं प्रस्थान बसवलं आहे. या सुविधांचा लाभ घेऊन आम्ही ग्राहकांसाठी नव्या सवलती देऊ शकतो, असं फ्लिपकार्ट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले.

थोडक्यात आता एअरपोर्ट पण अदानींचं आणि फ्लाईट बुक करण्याचं ॲपही अदानींचंच असणार आहे.

आता तुमच्या डोक्यात सुरूवातीपासून प्रश्न घोळत असेल की, याचे शेअर उचलायचे की नाहीत?

हर्षद मेहता बनू इच्छिणाऱ्या भिडूंनो जरा नीट अभ्यास करा आणि मग धुरळा उडवा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.