नौदलात आजही शत्रूला परतावून लावण्यासाठी रामायणाच्या या टॅक्टची मदत घेतली जाते…

रामायण हा विषय आपल्या देशात एकदम जिव्हाळ्याचा समजला जातो. कितीतरी गोष्टी रामायणात दडलेल्या आहेत. तशाच प्रकारची एक गोष्ट म्हणा किंवा प्रकरण म्हणा ते म्हणजे मारीच राक्षसाचं. पण हे प्रकरण आपल्या भारतीय नौदलात वापरलं जातं. पण थोड्क्यात आढावा रामायणाच्या त्या गोष्टीचा घेऊन आपण मुळ मुद्द्याकडे जाऊ.

जेव्हा भगवान राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवास भोगत होते. रावणाला सीतेला पळवून न्यायचं होतं पण हे त्याला शक्य नव्हतं कारण राम आणि लक्ष्मण सतत सीतेभोवती असायचे म्हणजे असायचेच. तेव्हा रावणाने आपल्या मित्राला मारिचला बोलावून घेतलं. मारिच हा वेष धारण करण्यात पटाईत होता. रावणाने त्याचा उपयोग सीतेला पळवून नेण्यासाठी केला.

मारीच राक्षसाने काय केलं तर सुवर्ण हरिणाचा वेष धारण केला आणि सीतामाईसमोर जाऊन तो नाचू, बागडू लागला. त्या सुवर्ण हरिणाच रूप बघूनच सीतामाई प्रभावित झाली. सीतामाईने त्या हरिणासाठी भगवान् रामाकडे हट्ट धरला.

भगवान रामसुद्धा त्या हरणाला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे गेले. जेव्हा भगवान राम यांचा बाण त्या हरणाला लागला तेव्हा ते हरिण उलट रामाच्याच आवाजात ओरडू लागले सीते, लक्ष्मणा मला वाचव. 

सीतामाईने लागलीच लक्ष्मणाला भगवान रामाच्या आवाजाच्या दिशेने पाठवलं. दोन्ही भाऊ सीता माईपासून दूर गेले होते आणि त्याचवेळी रावणासाठी ही संधी चालून आली होती. ज्यांनी ज्यांनी रामायण पाहिलं, ऐकलं असेल किंवा वाचलं असेल त्यांना तर हे माहीतच असेल की मारीच या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे फसवणूक आहे. इंडियन नेव्हीमधल कोणीतरी ही स्टोरी जास्तच ध्यान देऊन ऐकली असेल.

2020 मध्ये भारताने स्वतःची अँटी टॉर्पेडो डिकोय प्रणाली विकसित केली.

त्याला मारीच ATDS ( म्हणजे प्रगत टॉर्पेडो संरक्षण प्रणाली, Advance torpedo decoys system ) म्हणतात. समोरून येणार संकट ओळखणे आणि त्याची दिशाभूल करणे या सिस्टीम मध्ये डिटेक्ट केलं जातं जे मारीचने केलं होतं. डिकॉय कोणत्याही येणाऱ्या टॉर्पेडोची उर्जा नाहीशी करतो आणि त्यांना एका कुचकामी मार्गाने वेगळ्याच गोष्टीच्या पाठलागावर घेऊन जातो. ही सिस्टीम भारतीय नौदलाच्या प्रत्येक जहाजावर पाहायला मिळते.

समुद्री मार्गाने असे अनेक शत्रु सुमडीत येऊन गेम वाजवायला पाहतात मात्र या मारीच ए टी डी एसमुळे सगळ्या गेमचा बट्ट्याबोळ होतो. कारण मारायला आलेला शत्रु वेगळचं प्रकरण पाठलाग करत संपवू पाहतो पण नंतर या रामायण टॅक्टमुळे त्याचच गेम वाजवला जातो. भारताच नौदल हे जगातलं प्रतिष्ठित नौदल समजलं जातं त्याला कारणीभूत अशा युनिक आयडीया समजल्या जातात.

रामायणातील ही स्टोरी नौदलातील एकाने अपडेटेड आणि अशा रूपाने सांगितली की ती कायमचीच परफेक्ट बसली. यामुळें काय झालं तर हकनाक होणार नुकसान वाचलं आणि शत्रूचा निकाल लावण्यास मदत होऊ लागली. किंवा शत्रु जास्त ताकदवान असेल तर त्याला भलत्याच कामाला गुंतवून ठेवून स्वार्थ साधण्यास मदत होते. आजही नौदलात भारताचा कोणी नाद करत नाही.

नौदलात वापरल्या जाणाऱ्या या रामायण टॅक्ट फक्तं मिथक नाही तर भारताचा इतिहास म्हणून त्याचा अशा प्रकारे गौरव झाला. 

फक्तं लहान मुलांचे नावच रामायण वरून प्रेरित नाही तर भारतीय डिफेन्स सिस्टम सुद्धा रामायण फॉलो करते. त्यामुळे इतिहास हा कायम आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहायला सांगतो.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.