आदि शंकराचार्य व स्टीफन हॉकिंग या दोघांच म्हणणं एकच होतं..

पवन वर्मा म्हणजे बिहारपासून दिल्लीपर्यंत मोठ्ठ नाव. त्यांनी आत्तापर्यंत एवढी पुस्तकं लिहिलेत की तेवढे विषय आपण ४ सेमिस्टरमध्ये शिकलो नायय. गालिबपासून युधिष्ठिरापर्यंत ते कृष्णापासून कामसूत्रापर्यंत सगळंकाय लिहून बसलेले माणूस.

गुलजार सायबांच्या अलवार कविता इंग्लिशमध्ये नेण्याबद्दल कॉन्व्हेंट शाळेतल्या सगळ्या पोरं-पोरी त्यांचे ऋणी आहेत.

त्यांनी लिहिलेल्या Adi Shankaracharya: Hinduism’s Greatest Thinker म्हणजे आदि शंकराचार्य: हिंदुधर्मातील सगळ्यात महान विचारवंत पुस्तकात केरळपासुन काश्मीरपर्यंत वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणाऱ्या आदि शंकराचार्यांची वैज्ञानिक पोहोच दाखवली आहे.

पवन वर्मा ह्यांनी आपल्या पुस्तकात असं म्हण्टलंय की,

काही वर्षांपर्यंत शास्त्रज्ञ लोकांना वाटत होतं का आपण विश्वाचं रहस्य शोधून काढलंय. आता आपल्याला माहीत करून घेण्याजोगं काही उरलं नाही.

आता आदि शंकराचार्य म्हणजे भारतात बौद्ध धर्म व्यापून राहिला होता तो काळ..!

औषादाला कुठं हिंदू माणूस तेव्हा भारतात सापडत नव्हता, असं अशोकाच्या शिलालेखावरुन समजतं. तिथून त्यांनी गुप्त घराण्याला हाताशी धरून त्यांनी सगळ्या भारतभर वेदांवर आधारलेल्या हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन केलं आणि अनेक नव्या तत्त्वज्ञानाची भर टाकली.

त्यातल्या त्यांच्या लेखनात ब्रह्माण्ड आणि उत्पत्ती ह्यावरचा काही भाग येतो. आणि सगळ्यांचे लाडके स्टीफन हॉकिन्स हेही त्याच्यावरच संशोधन करून गेलेत. तेव्हा त्यांच्यात काही समान धागा आढळतो असं पवन वर्मा सरांचं मत आहे.

जगाच्या तळाशी नक्की कायय शोधून काढायला आजपर्यंत असंख्य लोकांनी धडपड केलीय. आता गप आहे तेवढी पृथ्वी आधी नीट सांभाळायला पाहिजे मग बाकी उद्योग करा असं आपण मोकळं होऊच, पण शास्त्रज्ञ लोकांच्यात ह्याच्यावरून तुंबळ मारामाऱ्या होत असत्यात.

पण जगाच्या  टोकाला काळाच्या मोठ्या गॅपमध्ये होऊन गेलेल्या दोन ग्रेट माणसांनी ह्या प्रश्नावर आपलं एकमत केलं होतं.

आदि शंकराचार्यांचं म्हणणं होतं की,

जग हे ब्रह्माने बनवलं आहे आणि त्यानेच व्यापलेलं आहे. (मागच्या काही वर्षांत इथर नावाचं फ्लुइड विश्वात आहे ते ह्येच म्हणून लोकांनी प्रचंड कल्ला केला होता.) पण त्याने जग कसे ब्रह्मा व जगाच्या वाटचालीत नक्की कोणते नाते आहे ह्याविषयी त्यालाही कल्पना नव्हती.

त्यासाठी त्यांनी “अनिर्वचनीय” म्हणजे मराठीत ‘माहितीय पण शब्दात कस्काय सांगू’ ही संज्ञा वापरली आहे.

आधुनिक विज्ञानही हेच सांगतं असा वर्मा साहेबांचा दावाय.

आपण जितकं खोलात जाऊ पुढं येतात आणि एकामागे एक अजून प्रश्नांची निर्मिती होते. म्हणजे जगाचा शेवट कुठंय हे विचारलं की आपण पहिल्यांदा पाच तत्त्व म्हणतो. मग कुठून तर डाल्टन येऊन म्हणतो अणूय रं ते. मग अणूंमधले धन आणि ऋण प्रभारित पार्टीकल प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन पर्यंत जातो.

मग कोणतरी जेम्स चॅडविक येऊन म्हणतो, आबे, न्यूट्रॉन पण बघ की. आपुन अजून जवळ घेऊन ते  आपल्याला दोन प्रोटॉन एकमेकांना जोडणारे ग्लूऑन्स दिसत्यात आणि आपलं डोकं भंजाळतं. खोलात आपल्याला क्वार्क नावाचे काही कणही त्यांच्यात आहेत हे समजतं.

आता ह्या क्वार्क्स मध्येही सतत थरथराट होणाऱ्या तरंगलहरी (स्ट्रिंग्स) आहेत असं हॉकीन्स सायेब म्हणलेत. मुळात उघड्या डोळ्यांनाही अणू दिसत नाही त्याच्यामुळं हे सगळं तुम्ही-आम्ही बघू शकत नाहीच.

आणि हे सगळं कसं तयार झालं ह्यावर वेगवेगळ्या थियरी आहेतच. म्हणजे आपल्या हक्काच्या जयंत नारळीकरांनी तयार केलेली हॉयल- नारळीकर थियरी असू किंवा आत्ता आख्ख जग ज्याच्या मागे पडलंय ती बिग बँग असू… सगळ्यांनीच अजून ठाम उत्तर देऊन हाच तो विश्वाचा उगम जिथून आपण आलो हे सांगितलेलं नाय.

एवढं साम्य तर आदि शंकराचार्य आणि हॉकिन्स ह्यांच्यात घावतं.

पण मग फरक उरतो कुठं? आपल्या बेसिक थियरीचं कौतुक तिकडले लोकं करायला नाय का म्हणत्यात? कोपर्निकसच्या कितीतरी आधी ज्ञानेश्वर महाराज  म्हणून गेले होते –

उदय-अस्ताचे प्रमाणे,
जैसे न चालता सूर्याचे चालणे,
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे,
कर्मीचि असता।।

आता आपण तुम्हाला ह्यांच्यातून पार आईन्स्टाईनच्या सापेक्षेतेसहित गुरुत्वाकर्षण आणि हॅलेची लंबवर्तुळाकार कक्षा सुद्धा काढून दाखवू शकतोय.

पण मग हे लोकं आपल्या पूर्वजांना त्याचं क्रेडिट का देत नाहीत?

तर ह्याचं कारण सिद्धता नसणं.

गणितावर हा सगळा खेळ असतोय. जर का  तुमचं म्हणणं मांडता आलं तर होतेच. कोपर्निकसच्या कितीतरी आधी सूर्य हाच सर्व ग्रहांच्या कक्षांचे केंद्रस्थानी असला पाहिजे हे लिओनार्डो डा विंचुतात्या पण म्हणला होता, पण त्यालाही सिद्ध करता आलं नाही. ही गोम अशीय का नाय, कि ह्याच्यात मोठमोठे शास्त्रज्ञही अडकलेत.

आज केसं वाळवण्यासाठी तुम्ही घेता तो हेयर ड्रायर ते हेलिकॉप्टरएवढ्या आवाजाची झिरो मशीन ह्या सगळ्यात मायकल फॅरेडेची मोटार वापरली जाते. हे त्याचंच संशोधनाय, पण त्याच्या नावाने एकही सिद्धांत तेव्हा मान्य झाला नव्हता. त्याने मांडलेली अख्खी थियरी आज आपण  वापरतोय, पण तेव्हा त्याला मानायला कुणीच तयार नव्हतं कारण गणितातील सिद्धता त्याला मांडता येत नव्हती.

बिचारा बाटल्या व्हिसळून बिनाशाळा शिकता वैज्ञानिक झाला होता. शेवटी कोण कुठला मॅक्सवेल, त्याला माया फुटली आणि त्यानं हे समीकरण, तेव्हा जगानं फॅरेडेचा जयजयकार केला.

त्याच्यामुळं आपल्याला ह्या सिद्धांतांचं क्रेडिट आदि शंकराचार्यांना देता येत नाही. पण हॉकिन्स-शंकराचार्य युती तेवढ्यापुरती जमतेय हेही ठीकच म्हणू.

शेवटी माउली ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढं समाजउद्धाराची पहिली जबाबदारी होती. आदि शंकराचार्य बौद्ध धर्म कसा हिंदू धर्मापेक्षा वेगळाय हे सांगण्यात जास्त गुंतलेले होते. त्यामुळं त्यांनी स्वतंत्र प्रबंध लिहिणं हे अपेक्षितच नायय.

आपण पुत्र करंटे असं कुणाला म्हणायचं असल तर तो जिंदाबाद..!

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. अमित म्हाडेश्वर says

    😆😆😆😆😆 वर लिहिलेले सिद्धांत सुसंगत असणे लांबची गोष्ट आहे पण त्यातील वाक्य सुद्धा एकमेकांशी जुळतात का?
    हा लेख नोबेल पारितोषिक समितीने वाचला तर ते त्यांचा मरणोत्तर पारितोषक न देण्याचा नियम बदलतील नि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयातील यादीत भारताचं नाव येईल..

Leave A Reply

Your email address will not be published.