लोकमान्य, तान्हाजी, आदिपुरुष ; ओम राऊतांची मांडणी इतिहासाला धरून नसते का ?
मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटाचा २ ऑक्टोबरला टिझर रिलीज झालाय. जसा हा टिझर रिलीज झाला तेंव्हापासून सोशल मीडियावर आदिपुरुष ट्रेंड होतोय…पण हा ट्रेन्ड आदिपुरुष चित्रपटाला निगेटिव्ह जातोय…इतके दिवस आदिपुरुष बॉयकॉट, बॉयकॉट बॉलिवूड अशा ट्रेन्डपर्यंत हे सगळं प्रकरण मर्यादित होतं पण आता याला राजकीय वळण लागलंय.
भाजपचे आमदार राम कदम यांनी तर आदिपुरुष महाराष्ट्रात रिलीज होऊ देणार नाही असा इशाराच दिलाय पण मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला.
मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय.
१)ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 7, 2022
सोबतच अमेय खोपकर यांनी ओम राऊत यांनी तान्हाजी, लोकमान्य सिनेमा बनवलाय, तो कट्टर हिंदुत्ववादी आहे, तो कोणतीही चूक करणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय…
आदिपुरुष बनवणारे ओम राऊत यांच्या कायमच टीका होत आलीय कि त्यांच्या चित्रपटात केलेली मांडणी ही इतिहासाला धरून नसते, याआधी त्यांच्या लोकमान्य एक युगपुरुष आणि तानाजी : द अनसंग वॉरीयर या चित्रपटांवरूनही वाद निर्माण झालेला…
ओम राऊत कोण आहेत, त्यांच्या आदिपुरुषला का विरोध होतोय आणि त्यांची मांडणी इतिहासाला धरून असते का? जाणून घेण्यासाठी या व्हिडीओच्या लिंकवर क्लिक करा.