“अये उडी उडी उडी”, या रोमॅंन्टिक गाण्याला हिट करण्यासाठी एका भूताने हातभार लावला होता.

चेन्नईच्या कोद्म्बक्कम या उपनगरात छोट्याशा गल्ल्यांमध्ये लपलेलं पंचतन रेकोर्डिंग स्टुडिओ. पंचतन हा फक्त भारतातलाच नाही तर आशियातला सर्वात अद्यावत म्युजिक स्टुडिओ आहे. याला उभारलं आहे भारतातला सर्वश्रेष्ठ संगीतकार ए.आर.रेहमाननं. 

ए.आर. रेहमान हा एक मनस्वी कलाकार आहे. तो त्याच्या अटीशर्ती नियमानुसारच काम त्याच्या करतो. गेली तीस वर्षे त्याच्या घराच्या मागेच असलेल्या या स्टुडिओमध्येच त्याच्या संगिताच काम चालतं. त्याच्यासोबत काम करायचं असेल तर हॉलीवूड असो की बॉलीवूड कलाकारांना चेन्नईला जावं लागत.

साल होत २००१, रात्रीची वेळ होती.

यशराज बॅनरच्या साथिया या हिंदी सिनेमाच्या गाण्यांचं पंचतन मध्ये रेकॉर्डिंग सुरु होत. गुलजार यांनी लिहिलेल्या गीतांना रेहमानन साज चढवला होता. आशा भोसलेंच्या पासून साधना सरगम, सोनू निगम पासून केके शान कुणाल गांजावाला अशा अनेक सिंगरनी चित्रपटात गाणी म्हटली होती.

आता फक्त एक गाण उरलं होत. त्याचा गायक होता अदनान सामी. हे सोलो सॉंग होत.

अदनान सामी हा प्रचंड शरीर असलेला पाकिस्तानी गायक ए आर रेहमान साठी पहिल्यांदाच गाणं म्हणणार होता. आदल्या दिवशीचं विमानान त्यानं चेन्नई गाठली होती. तिथे एका हॉटेल मध्ये तो उतरला.

दिवसभर रेहमानन त्याला रेकॉर्डिंग साठी बोलावलंच नाही. रात्री दहा वाजता फोन आला की रेकॉर्डिंग आहे पंचतनला या. अकरा वाजता अदनान तिथे पोहचला. त्याला रेहमान मध्यरात्री काम करतो हे माहित नव्हत.

रेहमानची अजून एक सवय म्हणजे गाण्याचं रेकोर्डिंग होताना तो गायकाला एका खोलीत उभे करून गाण म्हणायला लावतो. त्यावेळी कोणतही संगीतगायकाच्या साथीला नसत. पूर्ण गाण रेकॉर्ड झाल्यावर त्याला संगीत मागाहून जोडलं जात.

अदनानला सोडायला आलेली हॉटेलची कार चेन्नईच्या त्या छोट्याशा गल्लीत घुसली. मध्यरात्र होत आलेली असल्यामूळ रस्त्यावर चीटपाखरू देखील नव्हत. सगळीकडे भयाण शांतता होती. गाडी पंचतनच्या जवळ दारापाशी थांबली. अदनान स्टुडीओमध्ये घुसला. तिथेसुद्धा टाचणी पडल्यावर आवाज येईल अशी शांतता होती. 

अचानक अदनानला आपल्या पाठीशी कोणीतरी उभे असल्यासारखे वाटले. त्याने झरकन मागे वळून पाहिलं, तिथं कोणीच नव्हत. त्याला वाटलं भास झाला असेल. तो रेकोर्डिंग रूम मध्ये गेला. तिथे रेहमान आणि त्याचे दोन सहकारी गाण्यांवर काम करत होते.

अदनानला चाल परत एकदा सांगण्यात आली. तो मुंबईत रिहर्स करून आला असल्यामुळे त्याची तयारी फुल होती. माईक समोर गाण्यासाठी तो उभा राहिला. काही रिटेक्स झाले. अदनान मस्त पैकी डुलत डुलत आपल्या स्टाईल मध्ये गात होता.

आता फायनल सॉंग रेकोर्डिंग सुरु होणार तोवर जवळपास दोन वाजत आले होते.

तेवढ्यात अदनानला स्पष्ट पणे एक म्हातारी व्यक्ती रेकोर्डिंग रूम मध्ये उभी असलेली दिसली आणि काही क्षणात अदृश्य झाली. अदनानला घाम फुटला, त्याचे पाय लटलट कपू लागले. काचेपलीकडे बसलेल्या रेहमानला कळेना अचानक काय झालं. अदनानचं भलं मोठ धूड खाली कोसळलं.

रेहमान आणि त्याचे सहकारी धावत तिथे गेले. त्यांनी त्याला विचारलं काय झालं? अदनानची वाचाचं बसली होती. तो फक्त “भूत भूत” एवढचं म्हणत होता.

त्याला पाणी वगैरे देऊन सावरण्यात आलं. रेहमानला लक्षात आलं गड्याला भास झाला आहे. काही वेळाने अदनान परत गाण्यासाठी उभा राहिला. पण मगाशी बसलेल्या धक्क्याचा इफेक्ट म्हणजे त्याचा आवाज बसलेला होता. अदनान रेहमान ला म्हणला,

“सर मेरा गला बैठ गया है. हो सके तो गाने कि रेकॉर्डिंग कल करे?”

पण रेहमान तर रेहमान आहे. त्याला अदनानचा हा आवाज खूप आवडला. तो म्हणाला हाच आवाज गाण्याला जास्त सुंदर बनवत आहे. तुला जर शक्य असेल तर याच आवाजात हे गाणं रेकॉर्ड करू. अदनान कसा बसा तयार झाला. खरखरत्या आवाजात त्याने ते गाणे गायले. त्या गाण्याचे बोल होते,

“अये उडी उडी उडी”

साथिया हिट झाला. त्याची गाणी सुपरहिट झाली. त्यावर्षीचे संगीतासाठीचे झाडून सगळे अवाॅर्ड ए.आर.रेहमानच्या साथियाला मिळाले. जगभर हा म्युजिक अल्बम गाजला. अदनानच्या उडी उडीच विशेष कौतुक झालं.

आजही अदनानला त्याच्या प्रत्येक कॉन्सर्ट मध्ये उडी उडी म्हणावंच लागत. पण ओरिजिनल गाण्याचा फील यावा म्हणून बिचारा अदनान त्याचा म्हाताऱ्या भूताला शोधत असावा. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.