बॉलिवूडला ह्युमर आणि ग्लॅमर मिळवून देण्याचं श्रेयसुद्धा अफगाण निर्वासितांचं आहे

आता सगळ्यात जास्त हायहोल्टेज असलेला मुद्दा म्हणजे तालिबानी संघटनांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलाय. सगळीकडून अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करणारे हात वाढत आहेत. या सगळ्या गराड्यात अफगाणिस्तानचं आणि बॉलिवूडचं कनेक्शन एके काळी एकदम घट्ट होतं. अफगाण जलेबी हे गाणं तरी आताच्या मागच्या काही वर्षात आलं असेल पण अफगाणिस्थानने अनेक बडेबडे सेलिब्रिटी बॉलीवूडला दिलेले आहेत.

बॉलिवूडचं कौतुक सगळ्या जगभरात असतं. बॉलिवूडमध्ये असलेलं भव्यदिव्य गाण्यांचं स्वरूप, मेलडी असं सगळं जबरदस्त कॉम्बिनेशन असल्याने सगळीकडेच बॉलिवूड फेमस आहेत. पण काही आपल्या आवडीचे सेलिब्रिटी आहेत जे मूळचे अफगाणिस्तानचे. या अफगाणी सेलिब्रिटींनी बॉलीवूडला अनेक मास्टरपीस सिनेमे, डायलॉग्ज, अभिनेते दिलेत. तर जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटी. 

सलीम खान

शोले सारखा बाप सिनेमा लिहिणारे सलीम खान हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव. शोले हा मास्टरपीस होण्यात आणि इतकी वर्षे अजूनही फ्रेश असण्याचं कारण म्हणजे यातील डायलॉग. सलीम जावेद या जोडीने हा सिनेमा लिहिलेला होता. सलीम खान यांचं मूळ स्थान हे अफगाणिस्थान. त्यांच्या वडिलांनी काहीतरी व्यापार करण्याच्या दृष्टीने भारताची वाट धरली आणि ते मध्य प्रदेशात येऊन राहू लागले. सलीम खान यांचा चिरंजीव सलमान खान आज बॉलिवूडचा टॉप सेलिब्रिटी आहे.

कादर खान

प्रत्येक बॉलिवुडप्रेमी माणसाला कादर खान हा भयंकर आवडतो. विनोदला हवं असणारं टायमिंग आणि कॉमिक सेन्स हे कादर खान यांच्याकडे होतं. बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण कादर खान हे फक्त अभिनेते नव्हते तर ते उत्तम पटकथाकार होते. अनेक सिनेमांच्या त्यांनी पटकथा लिहिल्या आणि ते सिनेमे हिट केलेत. कादर खान यांनी लिहिलेले सिनेमे म्हणजे मुक्कदर का सिकंदर, कुली, कुली नंबर वन, हम, बाप नंबरी बेटा दस नंबरी, तकदीरवाला हे होत.

कादर खान हे मूळचे कंदाहारहुन स्थायिक झालेले. अफगाणिस्थानमध्ये आपली मूळ घट्ट रुजलेली आहेत हे कादर खान यांच्या पश्तु भाषेतून दिसून यायचं. कॉमेडी रोल आणि कॅरॅक्टर रोल करणारे कादर खान कायम लोकांना हसवत राहिले.  

फिरोज खान

फिरोज खान हा बऱ्याच जुन्या जाणत्या सिनेप्रेमी लोकांचा आवडता स्टार होता. फिरोज खान यांची फॅमिली हि पठाण फॅमिली. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे फिरोज खान बराच काळ बॉलिवूडचे आघाडीचे नायक म्हणून काम करत राहिले. फिरोज खानसुद्धा अफगाणिस्तानचेच. मैने पूछा चांदसे या गाण्यातून भरपूर फेमस झालेले फिरोज खान बॉलिवूडमधले मोठे सेलेब्रिटी होते.

भारतातले अनेक सिनेमे हे अफगाणिस्थानमध्ये शूट झालेले आहेत. सिनेमासाठी लागणारे अनेक लोकेशन हे अफगाणिस्थानमध्ये होते. १९९२ सालचा सुपरहिट सिनेमा म्हणजे खुदा गवाह, त्यानंतर आलेला २००६ चा काबूल एक्स्प्रेस आणि अशा अनेक सिनेमांचं शूटिंग अफगाणीस्थामध्ये झालेलं आहे. 

फिरोज खान यांचे बंधू संजय खान यांनी हट्टाने बॉलिवूडमध्ये आपल्या मायदेशाची ओळख बनून राहावी म्हणून धर्मात्मा या सिनेमाची शूटिंग अफगाणीस्थामध्ये करण्याची मागणी ठेवली होती. बॉलिवूड आणि अफगाणिस्थान यांचं नातं हे असं आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट यामुळे अफगाणिस्थान आणि भारत यांचे चांगले संबंध राहिले.

या सगळ्या सेलिब्रिटींनी बॉलीवूडला अजूनच समृद्ध केलं आणि चांगले दिवस बॉलीवूडला आले. अफगाण जलेबी हे गाणं बॉलिवूडमध्ये मात्र जोरदार वाजलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.