१०० वर्षानंतरही जालियनवाला बागेत शहीद झालेल्यांचा आकडा आणि नाव या गोष्टी रहस्य आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालियनवाला बागच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, नवीन परिसर नवीन पिढीला प्रेरणा देईल. जालियनवाला बाग हे स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक आहे. हे आपल्याला स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाची नेहमी आठवण करून देईल

अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे १३  एप्रिल १९१९ रोजी इंग्रज ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरने हत्याकांड घडविले. जनरल डायरच्या हुकमावरून लष्कराने नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला. या घटनेला घडून १०० वर्ष घडून गेले आहेत, मात्र अजूनही या घटनेत किती भारतीय नागरिक शहीद झाले होते याची आकडेवारी अजूनही उपलब्ध होऊ शकली नाही. 

आजही अनेक भारतीय जालियानवाला बागेत जाऊन शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. मात्र त्यांना माहित असते की ते नेमके कोणाला श्रद्धांजली अर्पण करत आहे.

घटनेच्या दिवशी जालियानवाला बागेत नक्की किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले. हे पण रहस्य अजूनही कायम आहे.

ब्रिटीश सरकारनंतर सुद्धा एकाही भारतीय सरकाने याची योग्य चौकशी केली नाही असे सांगण्यात येते. तसेच येथे शहीद झालेल्यांच्या नागरिकांच्या नावाची यादी बनविण्याचे काम पंजाब सरकाने सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.

जालियानवाला बाग नरसंहारानंतर एक सरकारी अहवाल समोर आला होता. त्यात जनरल डायरहा १५० सैनिकांना घेऊन घटनास्थळी दाखल झाला होता. त्या सैनिकांनी १ हजार ६५० गोळ्या झाडल्या होत्या. म्हणजेच प्रत्येक सैनिकाने ३३ गोळी झाडल्या होत्या.

अहवाला नुसार गोळ्यांची मोजणी ही बागेत सापडलेल्या रिकाम्या काडतुसा वरून करण्यात आली होती. मात्र नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या याचा तपास पुढे कधी केला गेला नाही. तो अहवाल ब्रिटीश सरकारकडून तयार आला होता. तसेच हा अहवाल पंजाबचे लेफ्टनंट गवर्नर मायकल ओडवायर यांना पाठविण्यात आला होता. त्यात २०० ते ३०० नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले होते.

मात्र मायकल ओडवायर सरकारला पाठविलेल्या अहवालात जालियानवाला बाग नरसंहारात २०० जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. तर गृह विभागाचे मुख्य सचिव जे. बी. थाॅमस एच.डी. क्रैक यांनी मात्र नरसंहारात २९० जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते. 

तर ब्रिटीश सैन्याचे म्हणणे होते की, त्यावेळी जालियानवाला बाग हत्याकांडतात २०० पेक्षा कमी जणांचा मृत्यू झाला होता. मात्र काही दिवसानंतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी जालियानवाला बागेत ३८१ जणांचा मृत्यू तर १ हजार २०० जण जखमी झाल्याचे स्पष्ट केले होते.

तसेच अमृतसर सेवा समितीच्या वतीने मात्र सरकारी आकडे खोटे ठरवत जालियानवाला मध्ये ५०१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.

७ ऑगस्ट १९१९ या दिवशी छापून आलेल्या अमृत बाजार पत्रिकानुसार स्वामी श्रद्धानंद हे अमृतसर येथे पोहचले होते. त्यांनी घटनास्थळी आणि इतर ठिकाणची पाहणी करून नरसंहारात मृत्यू झालेल्यांची संख्या सरकारने सांगितल्या पेक्षा खूप जास्त असल्याचे सांगितले होते. आणि मृत्यू झाल्याची संख्या ही १ हजार ५०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले होते. तर अमृतसरचे तत्कालीन सिव्हील सर्जन डॉ. स्मित यांच्या नुसार १ हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला होता.

नरसंहारा नंतर काही दिवसात पंडित मदन मोहन मालवीय अमृतसर येथे पोहचले होते. त्यांनी अमृतसर शहर पूर्ण फिरून जालियानवाला बाग नरसंहारा बाबत लहान-लहान  माहिती गोळा केली होती. मालवीय यांच्या नुसार जालियानवाला बाग मध्ये जवळपास १ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला होता. 

हा झाला आकडेवारीचा गोंधळ. तसेच शहीद झालेल्यांच्या नावाबद्दल सुद्धा असाच गोंधळ आहे.

जालियानवाला बाग यादगार ट्रस्टकडे नरसंहारात शहीद झालेल्या ३३८ जणांची नावे आहेत. तर दुसरीकडे जालियानवाला बाग शहीद परिवार समिती जवळ ४३६ जणाच्या नावाची माहिती आहे.  तर पंजाबच्या गृह मंत्रालयाकडून १९२१ मध्ये ३८१ जणांची नावे असल्याचे सांगितले होते.

सरकारच्या वतीने १२ नोहेंबर १९१९ ला जालियानवाला बागेत शहीद होणाऱ्यांची नावे प्रकाशित केली होती. त्या यादीत ५०१ जणांची नावे होती. मात्र यातील ४३ पुरुषांचा, एक महिला आणि लहान मुलाचा अंत्यसंस्कार अमृतसर सेवा समितीने केला होता. मात्र शेवटपर्यंत त्यांची ओळख पटू शकली नव्हती.

या यादीत त्यांच्या नावाचा कुठलाही उल्लेख नाही. तर काहींचे नाव हे दोन वेळा सुद्धा लिहण्यात आले होते. तर यादीतील १४ जण हे जिवंत असल्याचे समजले होते.

चार महिन्यानंतर नरसंहारात मृत्यू झालेल्यांची नावे शोधायला सुरुवात केली होती. नरसंहारानंतर अनेकजण भयभीत झाले होते. त्यामुळे शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा नवीन भानगड नको म्हणून माहिती दिली नसल्याचे सांगण्यात येते. तर काही जण हल्ल्यात जखमी झाले होते. पुढे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची नावे सुद्धा या यादीत आले नाहीत. नावे सांगितली तरी पोलीस आपल्यावर कारवाई करतील अशी भीती त्यांच्या कुटुंबियांना वाटत होती.

यामुळे लक्षात येते की आकडेवारी प्रमाणे नावाच्या यादीत सुद्धा गोंधळ आहे.  

जालियानवाला बाग नरसंहाराला होऊन १०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आता त्यावेळी नेमके किती जणांचा मृत्यू झाला होता हे सांगणे सोपे काम नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर कुठल्याही सरकाने काम केले नाही. त्यामुळे जालियानवाला बाग मध्ये नेमके किती जणांचा मृत्यू झाला आणि नावे जाहीर केले गेली नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.