स्टेन स्वामी यांच्यानंतर आता झारखंड कारागृहातील ६,००० आदिवासी कैद्यांचे काय होईल?

२००७ ची गोष्ट आहे, दिल्लीमध्ये सारंडा अ‍ॅक्शन प्लॅनची ​​तयारी सुरू होती. आणि तिकडे झारखंडमधील सारंडा जंगलात सीआरपीएफ आणि झारखंड पोलिस धडाधड तैनात केले गेले. त्याचबरोबर जंगलात राहणारया आदिवासी समुदायाच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या.

माओवाद्यांच्या शोध घेणारी फोर्स आदिवासींच्या घरात बळजबरी प्रवेश करू लागली, त्यांच्या घरांत चौकशी करू लागली. त्या आदिवासींचा दोष इतकाच होता कि त्यांनी माओवाद्यांच्या दबावात येऊन त्यांना राशन पोहचवणे, त्यांच्यासाठी जेवण बनवणे इत्यादी कामं करावी लागली होती. परिणामी  पोलिसांनी हे असे काम करणाऱ्या ६,००० पेक्षा अधिक लोकांना अटक केली होती.

बर्‍याच आदिवासींना गोळ्या घालण्यात आल्या, स्थानीक महिलांवर बलात्कार करण्यात आले, त्यांची घरे पाडली गेली.

झारखंडमधल्या याच आदिवासींचा आवाज म्हणून समोर आलेले फादर स्टॅन स्वामी यांचे नुकतेच निधन झाले. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आले होते. इतर प्रकरणामधून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला गेला होता.

पेसा कायद्यासंदर्भातील मोहीम, हा कायदा १९९६ मध्ये लागू करण्यात आला. त्यानंतर या संदर्भात जितक्या जाहीर सभा, आंदोलनं  झालीत त्यात स्टॅन पुढे राहिले,

या झारखंड मधील अटक केलेल्या बहुतेक आदिवासी लोकांकडे साधे ओळखपत्रही नव्हते.

स्थानिक लोकांना स्टेन यांनी कायदेशीर हक्कांची माहिती देऊन त्यांची लढाईसाठी तयारी करून केली. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की सीआरपीएफने वेढलेले २५ गावे रिकामी करावी लागली.

पण स्टेन गप्प बसले नाहीत, त्यांनी २००८ ते २०१३ पर्यंत या आदिवासींच्या अटकसंदर्भात राज्यव्यापी मोहीम राबविली. सोबतच या आंदोलनकर्त्यांच्या मदतीने दोन वर्षे प्रवास करीत, त्यांनी डेटा मिळवला,  पुरावे गोळा केले.

यानंतर त्यांनी सुटकेसाठी झारखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

या प्रकरणाचे वकील होते मार्टिन हॉफमैन. “डिप्राइव ऑफ राइट्स ओवर नैचुरल रिसोर्सेज, इंप्रोवाइज्ड आदिवासीज गेट इंप्रीजनः अ स्टडी ऑफ अंडरट्रायल्स इन झारखंड”, या विषयावर एक अहवाल सार्वजनिक मंचात ठेवण्यात आला.

वकील मार्टिन हॉफमैन यांच्या सांगण्यावरून २०१७ मध्ये हि पीआईएल दाखल केली गेली.  ज्यात नमूद केले गेले कि, राज्यभरात वेगवेगळ्या भागातील तुरुंगात हे ६००० आदिवासी कैद आहेत. यावर २०१८  मध्ये पहिल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकार ला आदेश दिले कि, या प्रकरणाबाबातचा संपूर्ण तपशील सदर करावा. साधारण अशा चौकाशींच्या बाबतीतच्या प्रक्रियेला वेळ लागत असतो. पण याचे परिणाम निर्दोष नागरिक भोगत असतात.  यांच्यासाठी जे लढत होते ते गेले आता या निर्दोष लोकांचा वाली कोण असेल ?

स्टॅन यांच्या निधनामुळे हि निर्दोष माणसे त्यांच्या सुटकेची आशा गमावतील का?
तर यावर वकिलांच म्हणणे आहे कि, “प्रकरण न्यायालयात चालू आहे आणि याचा आणखी एक याचिकाकर्ता आहे, त्यामुळे हा विषय पुढे जाईलच. प्रश्न आता एवढाच आहे कि त्या आदिवासींच्या सुतकेबाबतचा निर्णय घेण्यास कोर्टाने उशीर करू नये म्हणजे झालं”.

स्टेन कोण होते ?

त्यांचं संपूर्ण नाव स्टेनस्लायस लॉर्डस्वामी आहे पण ते स्टॅन स्वामी म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक दशकांपासून आदिवासी हक्कांचे कार्यकर्ते म्हणून काम केले. स्टॅन स्वामी झारखंडच्या चाईबासा येथे येऊ लागले. गरीब आणि दलित वर्गात राहून, त्यांचे जीवन जवळून पाहण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच साठी नंतर त्यांनी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले.

मानवाधिकार चळवळीचे स्वामींवर ते नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता.

स्टेन स्वामींचा जन्म २६ एप्रिल १९३७ रोजी तिरुचिराप्पल्ली, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या ओळखीच्या माहितीनुसार, त्यांनी १९७० च्या दशकात मनीला विद्यापीठातून थियोलॉजी आणि समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

नंतर त्यांनी ब्रुसेल्समध्ये शिक्षण घेतले, जेथे त्यांची मैत्री झाली आर्चबिशप होल्डर कामराशी, ते ब्राझीलमधील गरिबांसाठी काम करीत असल्यामुळे त्यांचा स्टेन यांच्यावर खूप प्रभाव पडला. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.