बॉर्डरची स्क्रिप्ट ऐकून पंतप्रधान सुद्धा म्हणाले होते हा सिनेमा तर बनलाच पाहिजे….

बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस सिनेमांचा ट्रेंड सोडून काहीतरी हटके करायच्या प्रयत्नात दिग्दर्शक जेपी दत्ता होते. याआधी देशभक्तीपर सिनेमांची निर्मिती बॉलिवूडमध्ये झाली होती. पण जेपी दत्ता त्याहून भव्य दिव्य असणारा सिनेमा बनवायच्या प्लॅनमध्ये होते आणि त्यांनी बनवला

भारतातला देशभक्तीपर सगळ्यात मोठा सिनेमा म्हणजे बॉर्डर

बॉर्डर येण्या अगोदर एका नवीन सिनेमावर जेपी दत्ता काम करत होते, तो सिनेमाही देशभक्तीपर होता त्याचं नाव होतं सरहद. विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी अशा दिग्गज लोकांसोबत जेपी दत्ता सरहद घेऊन येणार होते. पण आर्थिक अडचणींमुळे हा सिनेमा डब्यात गेला, परत तो कधी प्रदर्शितच होऊ शकला नाही.

१९९६-९७ सालामध्ये शेवटी योग जुळून आला आणि बॉर्डर सिनेमाचा प्लॅन ठरला. बॉर्डर हा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित असावा असा जेपी दत्तांचा होरा होता. बॉर्डर सिनेमाने जेपी दत्ताना भरघोस प्रसिद्धी, पैसा आणि तीन नॅशनल अवॉर्ड अवॉर्ड मिळवून दिले. 

बॉर्डर सिनेमासाठी सलमान, शाहरुख, अमीर, अक्षय, अजय देवगण अशा बड्या लोकांना विचारणा करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव या मंडळींनी या सिनेमात काम करणं नाकारलं. जेपी दत्ता तेव्हा बॉर्डर हा सिनेमा हाय होल्टेज लेव्हलवर करण्याच्या विचारात होते. सरहद सिनेमाचं दुःख त्यांना सलत होतं.

सिनेमा तयार झाल्यानंतर पुढे काही अडचणी येऊ नये, विरोधी लोकांनी काही आक्षेप घेऊ नये म्हणून बॉर्डरची स्क्रिप्ट घेऊन जेपी दत्ता थेट तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हा राव यांच्याकडे गेले. पंतप्रधान नरसिम्हा राव यांची विशेष भेट जेपी दत्तांनी घेतली. या भेटीत त्यांनी सिनेमा विषयक अनेक गोष्टींवर आणि महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. 

जेपी दत्तांनी पंतप्रधान नरसिम्हा राव यांना बॉर्डरची स्क्रिप्ट ऐकवली. स्क्रिप्ट ऐकून पंतप्रधान खुश झाले आणि ते तेव्हा जेपी दत्तांना म्हणाले कि,

हा सिनेमा नक्कीच बनवला गेला पाहिजे. हि देशाभिमानाची गोष्ट आहे आणि ती मोठ्या पडद्यावर यायलाच हवी. याबरोबरच पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी जेपी दत्तांना वचन दिलं कि भारतीय मिलिटरी लोकांकडून पूर्णपणे सहकार्य केलं जाईल.

आता जेव्हा आपण बॉर्डर सिनेमा बघतो तेव्हा त्यात सगळी खरी हत्यारं दिसून येतात, ती सगळी हत्यारं हि भारताच्या मिलिटरी सैनिकांची होती. बॉर्डरच्या सेटवर सैनिक लोकांमध्ये एकही ज्युनिअर ऍक्टर नव्हता, ते सगळे खरेखुरे जवान होते. टॅंकपासून ते १९७१च्या युद्धात वापरल्या गेलेल्या सगळ्या बंदुका खऱ्या होत्या.

या सगळ्या सुविधा इंडियन आर्मीने जेपी दत्ता यांना उपलब्ध करून दिल्या होत्या विशेष आदेशांनुसार. या खऱ्या गोष्टींमुळे सिनेमा अधिकच वास्तविक होण्यास मदत झाली होती. ज्यावेळी सिनेमाच्या यशानंतर जेपी दत्ता यांना आर्मीकडून मिळालेल्या सपोर्टबद्दल विचारण्यात आलं तेव्हा जेपी दत्ता म्हणाले कि,

आर्मी आणि सैनीकांच्या सपोर्टमुळे सिनेमा बनला खरा पण यामध्ये खूप पैसा ओतावा लागला.  सिनेमात असणाऱ्या मिलिटरी सैनिकांना, वापरण्यात आलेल्या बंदुका, टॅंक या सगळ्यांसाठी जेपी दत्ताना पैसे मोजावे लागले होते.

पण याचा फायदा असा झाला होता कि पैसे देण्याच्या बदल्यात सिनेमासाठी त्यांना जे जे हवं होतं ते ते सगळं पुरवण्यात आलं होतं आणि सिनेमा चांगला तयार झाला होता.

या सिनेमांमुळे सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी आणि सिनेमातल्या इतर लोकांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. सिनेमातली गाणी प्रचंड चालली होती. देशभक्तीने सगळा देश प्रेरित झाला होता. जेपी दत्ता यांना या सिनेमामुळे मारून टाकण्याच्या धमक्या सुद्धा आल्या होत्या. मात्र जेपी दत्तांनी आपली कारकीर्द पुढे यशस्वीपणे चालू ठेवली. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.