अभिनव बिंद्राचं आत्मचरित्र वाचून नेमबाजीत अवनीने गोल्ड मिळवलयं…

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात अखेर सुवर्ण पदक आलंच. आणि ते मिळवून दिलंय अवघ्या १९ वर्षांच्या भारताची नेमबाज अवनी लेखराने. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला हे सुवर्ण पदक मिळालं आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे. अवनीने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुण मिळवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

पण अवनीच्या या यशामागे प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनत होती. याचं सगळं यश जातं अभिनव बिंद्राच्या ऑटोबायोग्राफीला. 

जयपूर, राजस्थानची येथे राहणारी १९ वर्षांची अवनीला स्पायनल कॉर्डचा त्रास आहे. अवनी ११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाला.

यानंतर ती फक्त व्हीलचेअरच्या मदतीनेच चालू शकत होती पण तिने हार मानली नाही. अवनीच्या वडिलांची इच्छा होती की तिने खेळात रस घ्यावा. अवनीचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं आणि तिने काहीतरी विशेष करावं म्हणून तिच्या वडिलांनी तिला २०११ साली आलेलं अभिनव बिंद्राचं पुस्तक दिलं.

A Shot At History : My Obsessive Journey to Olympic Gold या पुस्तकाने अवनीला जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा मिळाली. हेच पुस्तक तिच्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट ठरले.

सुरुवातीला अवनीने अभिनवच्या पाऊलावर पाऊल टाकत नेमबाजीत आणि जोडीला तिरंदाजीत तिचा हात आजमावला. २०१५ मध्ये, जयपूर शहरात ती शूटिंगची रेंज बघून शूटिंगच्या प्रेमात पडली. तिला तिरंदाजी पेक्षा शूटिंगमध्ये अधिक रस वाटला. आणि मग लागलीच तिने जगतपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सराव सुरू केला. तिने नेमबाजीत आपले नशीब आजमावले जिथे तिचं यश सातत्यपूर्ण होतं.

टोकियो पॅरालिम्पिक्सच्या सुरुवातीला तिला अडचणी आल्या. 

२०२० कोरोना महामारीमुळे अवनीच्या डेली रुटीनवर निगेटिव्ह इफेक्ट पडला. अवनीने म्हटले होते की,

कोरोनामुळे शूटिंग प्रशिक्षणावरच परिणाम झाला नाही, तर फिजिओथेरपीचे डेली रुटीन कोरोनामुळे बिघडले. पाठीच्या कण्यांच्या समस्येमुळे मला पाठिच्या खालच्या काहीही जाणवत नाही. पण तरीही मला रोज पायाचे व्यायाम करावे लागतात.

या काळात अवनीच्या पालकांनी तिला प्रचंड पाठिंबा दिला. त्यांनी शक्य ते केले. गोळ्यांच्या आवाजामुळे घरी शूटिंगचे प्रशिक्षण घेता येत नव्हतं. पण अवनीने गोळ्यांशिवाय सराव सुरू केला. आणि आज तिची कामगिरी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे.

या टोकियो पॅरालिम्पिक मध्ये,

अवनी महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच १ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे.

नऊ राऊंडच्या या अंतिम सामन्यात अवनी आणि चिनी ऍथलिट सी झांग यांच्यात अटितटीची लढत पाहायला मिळाली. झांगनं क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यामुळे या सामन्यात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार म्हणून झांगकडे पाहिलं जात होतं.

दरम्यान, अवनीनं अचूक वेध साधत झांगचं आव्हानं संपुष्टात आणलं आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अवनीनं नऊ राउंडमध्ये ५२.०, ५१.३, २१.६, २०.८, २१.२, २०.९, २१.२, २०.१, २०.५  सह एकूण २४९.६ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. आजही अवनी आपल्या यशाचं श्रेय अभिनव बिंद्राच्या पुस्तकाला देताना अजिबात दमत नाही.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.