सचिन रिटायर झाल्यावर वानखेडेवरचा ग्राउंड स्टाफ देखील रडला होता…

सचिन…. सचिन…. असा जयघोष सगळ्या स्टेडियमभर व्यापुन असायचा जेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असायचा. वानखेडे सचिनचं दुसरं घर होतं. या मैदानावर मारलेला प्रत्येक फटका सचिनची कीर्ती वाढवत गेला.

वानखेडे मुंबईची शान तर होतच पण जगभरातून येणाऱ्या खेळाडूंचंसुद्धा हे एक फेव्हरेट ग्राउंड होतं आणि अजूनही आहे. याच ग्राउंडरवर सचिनने निवृत्ती घोषित केली आणि बऱ्याच लोकांना रडू आवरलं नाही.

सचिनचं रिटायरमेंटच भाषण आजही बऱ्याच लोकांना चांगलंच आठवत असेल. त्या मैदानाच्या अनेक आठवणी सचिनने सांगितल्या होत्या. अगदी बॉलबॉय असलेला सचिन ते विक्रमादित्य सचिन असा मोठा प्रवास करणाऱ्या तेंडुलकरचा प्रवास याच वानखेडे स्टेडियमने बघितला होता. २५ वर्ष क्रिकेटसाठी वाहून घेतलेला सचिन तेंडुलकर लोकांच्या मनातून सहजासहजी जाणं तस अशक्यच.

१९८७ च्या वर्ल्डकपच्या बॉलबॉय पासून ते २४ वर्षानंतर वर्ल्डकप उचलणारा सचिन असा प्रवास वानखेडेच्या ग्राउंड स्टाफने बघितला होता. सचिनचं दुसरं घर असणाऱ्या वानखेडे स्टेडियमची काळजी घेणारे ग्राउंड स्टाफ सुद्धा सचिनला जीव लावायचे. रमेश म्हामुणकर हे वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर होते त्यांनी सचिनला अगदी त्याच्या शाळकरी वयापासून वानखेडे स्टेडियमवर बघितलं होतं.

रमेश म्हामुणकर म्हणतात कि जेव्हा सचिन मैदानाला फेरी मारत होता तेव्हा वानखेडेच्या प्रत्येक स्टाफच्या डोळ्यात पाणी होतं. इतके दिवस सचिनला खेळताना पाहणं हि एक पर्वणी असायची पण तो रिटायर्ड झाल्यानंतर क्रिकेट बद्दल तितकं विशेष आकर्षण राहणार नाही हे हि तितकंच खरं. कुरळे केस असलेला एक मुलगा यायचा आणि क्रिकेट म्हणजे त्याचा जीव कि प्राण असा तो खेळायचा. अजूनही जेव्हा आम्ही सचिनला काही सांगत असतो तो टिक्याच आदराने आणि प्रेमाने ते ऐकतो हि मोठी विशेष गोष्ट आहे.

सचिनचं क्रिकेट खेळत राहणं ग्राउंड स्टाफच्या लोकांसाठी कायम आकर्षक असायचं. कोणी कोणी तर दोन दशक सचिनची कारकीर्द वानखेडेवर पाहताना मोठी झाली. जेव्हा रणजी ट्रॉफीची एक मॅच होती तेव्हा म्हामुणकर यांनी सचिनला एक विनंती केली होती कि आम्ही दिलेला सन्मान स्वीकारावा आणि ग्राउंड स्टाफसोबत एक फोटोसेशन करावं. तेंडुलकरने लगेच होकार दिला आणि तो फोटो सेशनला आला तेव्हा आम्ही त्याला एक पुष्पगुच्छ देऊ केला होता.

त्याचा सन्मान करताना ग्राउंड स्टाफने इच्छा व्यक्त केली होती कि तुझ्या शेवटच्या मॅचमध्ये तू शतक करावस, तेव्हा सचिन म्हणाला होता तुमची हि इच्छा खरंच पूर्ण होवो..जेव्हा सचिनचा सन्मान ग्राउंड स्टाफने केला तेव्हा सचिनने एक इन्व्हेलप ग्राउंड क्युरेटरकडे दिलं आणि त्यात सगळ्या ग्राउंड स्टाफसाठी थोडेफार पैसे सचिनने दिलेले होते. २०१३ मध्ये आपल्या पूर्ण वर्षाची खेळण्याची रक्कम त्याने वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफला देऊ केली होती.

अशा अनेक आठवणी ग्राउंड स्टाफच्या सचिन तेंडुलकरच्या खेळाविषयी जोडलेल्या आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.