लसीचे ११ डोस घेतल्यावर आजोबा म्हणतायेत ‘मै तो जवान हो गया’

‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो.” ही म्हण आपण शाळेच्या पेपरात नेहमी लिहायचो. कारण ती लवकर आठवायची आणि त्याचा अर्थ सुद्धा सोपा असायचा. त्याचा अर्थ काय तर एखादी गोष्ट चांगली वाटली म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायचा नसतोय.  आता ह्या म्हणीचा आजच्या जमान्यात फारसा काही संबंध नाही. कारण “जिथं फुकट, तिथं सरसकट” अशी गत सध्याची झालीये.

यातलं ताज उदाहरण म्हणजे बिहारमधले ८४ वर्षाचे आजोबा. ज्यांनी २ नव्हे, ३ नव्हे तर डायरेक्ट ११ वेळा कोरोना लसीचे डोस घेतलेत. आता तुम्ही म्हणाल काय पण काय, पण भिडू हे खरंय. आणि ११ नाही तर हे आजोबा १२ वा डोस सुद्धा घेणार होते, पण नेमकं त्यादिवशीच्य लसी संपल्या आणि आजोबांचा १२ वा डोस हुकला.

आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे तर भिडू त्यासाठी स्टोरी वाचायला लागतीये.

तर सध्याच्या घडीला देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा एकदा वाढायला लागलाय. पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीये. आपण जर कालचा आकडा पहिला तर ६ जानेवारीला अख्ख्या देशात १ लाख १७ हजार १०० नवी पप्रकरण नोंदवली गेली. त्यामुळे हळू हळू आपल्या कंट्रोलमध्ये येणारी परिस्थिती पुन्हा हाताबाहेर चाललीये. ज्यामुळं परत कडक निर्बंध लावले जातायेत. 

याला कारणीभूत आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रोन. हा नवा व्हेरियंट इतका खतरनाक आहे कि लसीचे दोन डोस घेऊनसुद्धा म्हणावं तसं काम करत नाहीये. म्हणजे तुम्ही जरी लसीचा १ डोस घेतला असेल किंवा २ बरीच मंडळी या व्हेरियंटच्या कचाट्यात सापडतायेत. 

आता त्यावर तोडगा म्हणून अनेक डॉक्टर लसीचा बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस घ्या असा सल्ला देतायेत. तसं सध्या देशभरात लस घेतलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे, पण अजून सुद्धा बरीच शहाणी लोक आहेत ज्यांनी लसीचा एकसुद्धा डोस घेतलेला नाही. 

असो… तर हा काय आपला मुद्दा नाही आणि आजोबांना सुद्धा. त्यांना तर कोरोनाचं काही घेणं देणचं नाही. पण तरी त्यांनी ११ वेळा लसीचे डोस  घेतलेत. 

तर ब्रम्हदेव मंडल असं बिहारच्या या आजोबांचं नाव. जे मधेपुरा जिल्ह्यातल्या ओराय गावात राहतात. आपल्या सगळ्या नॉर्मल माणसांसारखं त्यांनी सुद्धा गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात लसीचा पहिला डोस घेतला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं वयाच्या मनानं त्यांच्या चांगलीच इम्युनिटी आली. 

आता सुरुवातीला कसं लसीच्या दोन डोसमध्ये एका महिन्याचं अंतर होत. त्याप्रमाणं पुढच्या महिन्यात त्यांनी दुसरा डोस घेतला. पण ह्यावेळी डोस घेतल्यानंतर त्यांना जास्तचं भारी वाटलं. वयामुळं त्यांना जे काही त्रास व्हायचे त्यांना त्यांना आराम मिळायला लागला. त्यांचे गुडघेचं दुखायचे कमी झाले. म्ह्णून त्यांनी या लसी पुढेही घ्यायचं ठरवलं. आणि महिन्या – महिन्याच्या गॅपने त्यांनी डिसेंबर महिन्यापर्यंत ११ डोस घेतले.   

ब्रह्मदेव मंडल यांच्याकडे तसा रेकॉर्ड सुद्धा आहे. म्हणजे त्यांनी पीएससीमध्ये पहिला डोस १३ फेब्रुवारी २०२१ ला घेतला. त्यानंतर दुसरा डोस १३ मार्चला तिथेच घेतला. पुढे त्यांनी १९ मे ला औरई उपआरोग्य केंद्रात बूस्टर डोस घेतला.  आता तसं लस घेण्याची फार फार तर लिमिट एवढीच आहे. पण आजोबांनी पुढचा डोस सुद्धा घेतला. 

त्यांनी चौथा डोस १६ जूनला भूपेंद्र भगत यांच्या कोटामधल्या शिबिरात जाणून घेतला. पुढे पाचवा डोस २४ जुलैला जुनी बडी हॉट स्कूलच्या शिबिरात, नाथबाबा स्थान शिबिरात १३ ऑगस्टला सहावा डोस, बडी हाट शाळेत सातवा डोस ११ सप्टेंबरला, २२ सप्टेंबरला तिथेच आठवा डोस घेतला, नववा डोस २४ सप्टेंबरला आरोग्य उपकेंद्र कलासन इथं जाऊन घेतला, १० वा डोस खगरिया जिल्ह्यातील पर्वता इथं घेतला आणि भागलपूरच्या कहलगावमध्ये इथं ११ डोस घेतला. 

म्हणजे १३ फेब्रुवारी ते ३० डिसेंबर २०२१ या एका वर्षात त्यांनी ११ डोस घेतलेत. आता एवढ्यावर आजोबा थांबले नाहीत ते १२ वा डोस घेण्यासाठी चौसा पीएचसीमध्ये गेले होते, पण तिथं लसीकरणाचे काम बंद झालं ज्यामुळं त्यांना माघारी घरी जायला लागलं आणि १२ वा डोस घेता आला नाही. 

आता तुम्हाला वाटेल आजोबांचं वय झालंय, त्यांना फारसं काही कळत नसेल, तर भिडू तुमच्या माहितीसाठी आजोबा काय साधे सुधे नाहीतर त्यांनी एकेकाळी ग्रामीण डॉक्टर म्हणूनही केलंय. आणि एवढचं नाही तर ते टपाल खात्यात सुद्धा काम करायचे पण सध्या निवृत्तीनंतर गावातच राहतात.

या सगळ्या प्रकरणावर ब्रह्मदेव मंडल म्हणतात,

 लस हे अमृत आहे, सरकारने खूप चांगली गोष्ट तयार केलीये, परंतु काही लोकांना सरकारची बदनामी करायची आहे. या लसींमुळं मला जवान झाल्यासारखं वाटतंय.

आता हे सगळं खरंय पण मेन मुद्दा म्हणेज ब्रह्मदेव मंडल यांना ११ डोस मिळाले तरी कसे. म्हणजे मध्यंतरी लस घेण्यासाठी पार मारामारी व्हायची, लोक २ – २ दिवस चपला रांगेत ठेवायची, ८ दिवस आधीच स्लॉट बुक करायला लागायचा. मग या आजोबाना एवढ्या लसी ते पण महिना टू महिना भेटल्या तरी कश्या? त्यामुळं  बिहारमधील लसीकरण प्रक्रियेवर खूप मोठा प्रश्न निर्माण केलाय. कारण लस घेतल्याचे सगळे रेकॉर्ड असतात. मग ही गोष्ट कोणालाच कशी कळली नाही. 

ब्रह्मदेव यांच्या म्हणण्यानुसार तर त्यांनी स्वतःच्या आधार कार्डवर ८ वेळा, मोबाईल नंबरवर १ वेळा, वोटर आयडी आणि बायकोच्या फोन नंबरवर ३ वेळा हे लसीचे ११ डोस घेतले. 

या प्रकारांवर आरोग्य विभागाच्या काही कर्मचार्‍यांनी म्हणणं आहे की, लोक ऑफलाइन शिबिरांमध्ये अशा प्रकारचा घोळ घालू शकतात, कारण त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक शिबिरात घेतला जातो, जो नंतर कम्प्युटरमध्ये फीड केला जातो, जो मॅच झाल्यावर रिजेक्ट सुद्धा होतो. त्यामुळे बऱ्याचदा फीड डेटा आणि लस केंद्रावरील रजिस्टरच्या डेटामध्ये फरक असतो.  त्याचवेळी ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाची सुद्धा झोप उडालीये. 

हे ही  वाचं भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.