जखमी खेळाडूला त्याच्या आईशी बोलता यावं म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातली सगळी सूत्रे हलवली.

लेन पास्कोचा खतरनाक बाउन्सर संदीप पाटलांच्या कानावर बसला आणि त्यानंतर त्यांनी अजरामर शतक ठोकलं होतं.

१९८१ मधला सिडनीतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना. ५०० धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियाने उभा केला होता. संदीप पाटील ६५ धावांवर फलंदाजी करत होते. चहापानाच्या ब्रेक आधीची शेवटची ओव्हर. संदीप पाटील स्ट्राईकवर होते आणि डोक्यात त्यांनी त्यावेळी हेल्मेट घातलेलं नव्हत. संपूर्ण भारतीय संघात केवळ दिलीप दोशी यांच्याकडेच हेल्मेट होतं. त्यावेळी हेल्मेट घालायची प्रथा नव्हती. रॉडनी हॉगने एक बाउंसर फेकून मारला आणि तो थेट संदीप पाटलांच्या गळ्यावर जाऊन धडकला. संदीप पाटील मैदानावरच कोसळले.

चहापानाचा ब्रेक झाला तेव्हा संदीप पाटील ड्रेसिंग रूममध्ये आले. त्यांच्या स्वागतासाठी सर गारफिर्ड सोबर्स तिथे उभे होते आणि ते संदीप पाटलांचं अभिनंदन करत म्हणाले,

son what a brilliant knock you are playing…

चेंडू लागल्याच्या धक्क्यातून पाटील अजून सावरले नव्हते. नंतर संघातले खेळाडू संदीप पाटलांना हेल्मेट घालून तू खेळावं असा सल्ला देत होते. कारण भारताला फॉलोऑन वाचवण्यासाठी अजून ५०-६० धावांची गरज होती ,आणि संदीप पाटील चांगल्या फॉर्म मध्ये खेळत होते. पण हेल्मेट कुणाकडेच नव्हतं त्यामुळे घालणार काय ?

शेवटी सुनील गावस्कर संदीप पाटलांच्या जवळ जाऊन म्हणाले , तुला जर मनातून खरच हेल्मेट घालू वाटत नसेल तर नको घालूस आणि जर तुला हेल्मेट घालून खेळायचं असेल तर मी हेल्मेटची सोय करतो. पण गारफीर्ड सोबर्स म्हणाले की, ” अरे एवढा चांगला खेळतोयस आणि आता कशाला हेल्मेटचा विचार करतोय. सोबेर्सच्या या वाक्यांनी संदीप पाटलांचा आत्मविश्वास दुणावला.

चहापानाचा ब्रेक संपला आणि सामना पुन्हा सुरु झाला. यावेळी चेंडू लेन पास्कोच्या हातात होता. लेन पास्को हा चतुर बॉलर होता त्याने बाउंसर वर संदीप पाटलांची उडालेली भंबेरी पाहिली होती. चहापानाच्या ब्रेकच्या आधीच्या ओव्हरचा बाउंसर आणि चहापानाच्या नंतरच्या लेन पास्कोचा बाउंसर ह्या कात्रीत संदीप पाटील अडकले होते. त्यांच्या मनात अजूनही हेल्मेट घालायला हवं होतं की नको, आता बाउंसर बॉल आला तर डक करायचा की मारायचा  हाच संभ्रम सुरु होता.

लेन पास्कोने एक भेदक बाउंसर टाकला आणि संदीप पाटलांनी चेंडू ना डक केला ना फटकावला ते तसेच द्विधा मनस्थितीत उभे राहिले. व्हायचा तोच परिणाम झाला आणि तो वेगवान चेंडू संदीप पाटलांच्या कानावर येऊन आदळला तिथेच पाटील मैदानावर आडवे पडले.

संदीप पाटलांना अशा स्थितीत पाहून भारतीय संघाचे असिस्टंट मेनेजर बापुजी आणि एक डॉक्टर धावत  मैदानावर गेले. त्यापैकी बापुजी यांनी संदीप पाटलांच्या ज्या कानात लागलेलं होतं त्याचं कानात जोरात ओरडून सांगितलं की, ए दुखतय का रे ? संदीप पाटलांना तो आवाज कानठळी बसल्यासारखा भासला.

ग्रेग चापेल ,रॉडनी मार्श असे सगळे ऑस्ट्रेलियाचे प्लेअर्स तिथे आले. युवराज सिंगचे वडील त्यांनी तशा अवस्थेत संदीप पाटलांना उठवलं आणि त्यांचं डोकं काखेत दाबत म्हणाले , अरे पुत्तर कुच्छ नै हुआ हे, चल अस म्हणत बोलत पाटलांना पुढे घेऊन आले पण मारच इतका जोरात लागला होता की पाटील परत कोसळले.

जेव्हा त्यांना शुध्द आली तेव्हा त्यांच्या बेडच्या बाजूला लेनी पास्को बसलेला. त्याला बघून संदीप पाटील विचारात पडले की अरे हा आता तर मला बोलिंग टाकत होता इथे कसा काय आला हा ? मग सुनील गावस्कर दिसल्यावर त्यांना हायसं वाटलं.

पण सुनील गावस्करांनी त्यांना बॅटिंग ला चल म्हणून सांगितलं कारण सामना वाचवण्याखेरीज भारताकडे दुसरा पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत संदीप पाटील पुन्हा मैदानात उतरले आणि त्यांनी १७४ धावांची अप्रतिम खेळी करून सामना वाचवला.

सामना सुरु असताना जेव्हा संदीप पाटलांना चेंडू लागला तेव्हा कॉमेंट्री करणाऱ्यांनी ही बातमी सांगितली तेव्हा रेडीओवर संदीप पाटलांच्या आईने ही बातमी ऐकली तेव्हा त्या भयंकर टेन्शन मध्ये आल्या. विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे साधा फोनसुद्धा नव्हता . त्या भयंकर काकुळतीला आल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी संदीप पाटलांशी बोलायचं आहे म्हणून विनंती केली पण काहीच फायदा झाला नाही.

या प्रकरणाची माहिती कुठूनतरी तेव्हाचे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांना कळाली. आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू भारताच प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्या घरी साधा फोन सुद्धा नाही याचं अंतुलेंना वाईट वाटलं. त्यांनी अत्यंत तातडीने अंतुले यांच्या घरी दोन तासात फोन बसवून दिला. तेव्हा संदीप पाटील आणि त्यांच्या परिवाराचं बोलण झालं.

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.