त्यानंतर भारताला शिवीगाळ करण्याची हिंमत मिंयादादला झाली नाही.

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटला कि त्यात स्पर्धा आलीच. प्रेशर आलं. जिंकण्याची कधी सम्पणारी भूक आली.

फक्त खेळाडूच नाही तर अख्खा देश एखाद्या महायुद्धाला सामोरे जात असल्याप्रमाणे सज्ज होतो. कधी खेळाडूंची आपापसात भांडणे होतात तर कधी स्टेडियम मध्ये प्रेक्षक एकमेकांशी लढाई सुरु करतात. कधी कधी इंझमाम सारखा खेळाडू बॅट घेऊन प्रेक्षकांच्या अंगावर चालून जातो. रागाच्या भरात टीव्ही फोडल्याची उदाहरणे देखील कमी नाही आहेत.

सध्या चालू असेलेले मौका मौका जाहिरातीचे वॉर  हे देखील अशाच इंटेन्स लढाईचं उदाहरण आहे.

क्रिकेट मध्ये स्लेजिंग हे एक अस्त्र समजले जाते. खेळाडू विरुद्ध टीम वर मानसिक रित्या प्रेशर बनवण्यासाठी टोचून बोलणे, टोमणे मारणे, कधीकधी शिवीगाळ करणे याचा वापर करत असतात. किपर, स्लिप मधले खेळाडू यांचं तेच काम असते. सगळ्या टीम याचा वापर करताना दिसतात.

पण हा प्रकार आताचा नाही तर खूप वर्षांपासून भारत पाकिस्तान सामन्यावेळी स्लेजिंगचे अनेक प्रकार घडलेले दिसून आलेले आहे. इथे खेळाडूंना एकमेकांची भाषा येत असल्यामुळे स्लेजिंग ला जास्त धार चढते.

यात सगळ्यात आघाडी वर असायचा तो जावेद मिंयादाद.

कधी कधी माकड चाळे करणाऱ्या जावेदला विदूषक अशी म्हटलं जायचं. पण खरं  तर जावेद मिंयादादसारखा क्रिकेटचा चाणाक्ष खेळाडूदुसरा कोणी नव्हता. तो मेंटली इतका स्ट्रॉंग होता कि कोणतीही प्रेशर कंडिशन असू दे त्याच्यावर स्लेजिंगचा फरक पडला नाही. त्याच्या याच स्ट्रीट स्मार्टनेस तो एकेकदा स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी इतर खेळाडूंसोबत भांडणे हि करायचा.

डेनिस लिली बरोबर पंगा घेणे , भारताविरुद्ध शेवट बॉल ला सिक्स मारून मॅच जिंकून देणे अशा गोष्टी फक्त त्यालाच जमू शकतात .

१९८६-८७ मधली गोष्ट आहे. तेव्हा पाकिस्तान भारताच्या दौऱ्यावर आलेला होता. राजस्थान मधील जयपूर येथे कसोटी सामना चालला होता. हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया उल हक हजर होते. यामुळे मॅच अजून हाय व्होल्टेज झाली होती. खेळाडू आपले प्राण पणाला लावून खेळत होते.

भारताचा सिनियर खेळाडू ऑलराउंडर मोहिंदर अमरनाथ बॅटिंग करत होते. फिल्डिंगसाठी सिली पॉईंट वर उभा असलेला जावेद मियांदाद आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सेट झालेल्या मोहिंदर अमरनाथ यांना डिस्टरब  करण्यासाठी स्लेजिंग करत होता. पण मोहिंदर अमरनाथ कोणाला दाद लागू देत नव्हते.

एका बॉल वेळी  अमरनाथ एलबी डब्ल्यू आहेत म्हणून पाकिस्तानी प्लेअर्स नि जोरदार अपील केली.  पण अंपायरनी त्यांना नॉट  आउट दिले. इकडे जावेद मिंयादाद ची तोंडाची टकळी सुरु होती. बो लता बोलता त्याने अमरनाथ याना डिचवण्याच्या हेतूने ओरडून भारताबद्दल काही तरी अपशब्द उच्चारले. मोहिंदर अमरनाथ यांना ते ऐकु  गेलं.

एवढा वेळ शांत असलेले मोहिंदर अमरनाथ  हळुवारपणे सिली पॉईंट कडे गेले. सगळ्यांना ते वाटलं कि आता जोरदार भांडण होणार. पण अमरनाथ कोणताही राग न करता शांतपणे पण अतिशय दृढ शब्दात त्याला  म्हणले,

“देख जावेद, मुझे जो कहना है कह, लेकिन मेरे देश को कुछ ना कहना.”

जावेद मियांदाद यांच्या साठी हा खूप मोठा धडा  होता. या घटनेचा उल्लेख त्याने “कटिंग एज ” या  आपल्या आत्मचरित्रात केला आहे. त्यात तो म्हणतो,

“या घटनेने मला अंतर्मुख केले. अल्लाह वगळता मी सर्वकाही माझ्या स्वत: च्या देशात मानले आहे. माझ्या देशाबद्दल असेच वाटले की मोहिंदरच्या मनाचा मला आदर नव्हता. मी लगेच त्याला क्षमा मागितली.”

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.