असं पहिल्यांदाच घडलंय…कोर्टाने ३८ जणांना एकत्र फाशीची शिक्षा सुनावलीये

केरळच्या जंगलात एक मोठा प्लॅन झाला…सिरीयल बॉम्ब ब्लास्टचा…आणि या प्लॅननुसार २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी ७० मिनिटात तब्बल २१ बॉम्बब्लास्ट झाले अन त्यात ५६ लोकांचा जागीच मृत्यू झाला. आणि जखमींची तर गिनतीच नाही… या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. तपास सुरु झाला अन १९ दिवसांत ३० दहशतवादी पकडले. मग कळलं या सिरीयल बॉम्बब्लास्टचे मास्टरमाइंड इकबाल, यासिन भटकळ आणि रियाज भटकळ होते.  

या दुर्दैवी घटनेची आठवण यासाठी कि आजच या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना अखेर शिक्षा जाहीर झाली आहे…. न्यायालयाने ४९ पैकी ३८ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर ११ आरोपी जन्मठेपेत राहणार आहेत.  

आणि भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय कि इतक्या आरोपींना एकत्र फाशी देण्यात आली आहे. 

फिर्यादी पक्षाच्या वतीने न्यायालयाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, बचाव पक्षाने अपील न्यायालयात किमान शिक्षेची मागणी केली होती. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल यांनी ८ फेब्रुवारी रोजी निकाल देताना ४९ आरोपींना दोषी ठरवले होते. न्यायालयाने ७७ पैकी २८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून ३८ जणांना फाशी आणि ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खरं तर या प्रकरणाचा निर्णय २ फेब्रुवारीला येणार होता, मात्र विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तो ८ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.

अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी २० एफआयआर नोंदवल्या होत्या. त्याच वेळी, सुरतमध्ये आणखी १५ एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. 

६,००० कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले. एकूण ३,४७,८०० पानांची ५४७ आरोपपत्रे दाखल करण्यात आलीत. केवळ ९८०० पानांचे प्राथमिक आरोपपत्र आहे. ७७ आरोपींसमोर तब्बल १४ वर्षांनी युक्तिवाद पूर्ण झाला. ७ न्यायाधीश बदलले, कोरोनाच्या काळात तर ३ आरोपी पाकिस्तानात तर १ आरोपी सीरियाला पळून गेला होता.

या बॉम्बस्फोटांमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व दहशतवाद्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

त्यादरम्यान राज्याचे विद्यमान डीजीपी आशिष भाटिया यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती. देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगही अहमदाबादला पोहोचले होते. २८ जुलै २००८ रोजी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. अवघ्या १९ दिवसांत पोलिसांनी ३० दहशतवाद्यांना अटक करून तुरुंगात पाठवले होते. यानंतर उर्वरित दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली. अहमदाबादमधील या स्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या टीमने जयपूर आणि वाराणसीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

या प्रकरणासाठी स्थापन केलेल्या तपास पथकात सहभागी असलेले अहमदाबादचे जॉइंट पोलिस कमिशनर (JCP) असारी यांनी माध्यमांना सांगितले की, या ब्लास्ट मध्ये सहभागी असलेल्या दशतवाद्यांना आम्ही कसं शोधून काढलं, देशाच्या प्रत्येक कोपरा त्यांनी धुंडाळला अन १९ दिवसांत ३० दहशतवादी पकडले. 

असारी यांच्या म्हणण्यानुसार, २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा ते गोध्रा येथे ड्युटीवर होते. त्यांना फोन आला की तुम्ही ताबडतोब अहमदाबाद क्राइम ब्रँचला रिपोर्ट करा. दुसऱ्या दिवशी २७ तारखेला ते अहमदाबाद क्राइम ब्रँचमध्ये हजर झाले. या दहशतवादी हल्ल्याची राज्यभर चर्चा होत होती. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे शोधून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांच्या तपास पथकाला देण्यात आले होते.

दाणीलिमडा इमारतीत बॉम्ब बनवल्याची लिंक सापडली

वरिष्ठ अधिकारी अभय चुडासामा यांनी माझ्यावर बॉम्बस्फोटात वापरलेले साहित्य दहशतवाद्यांनी कोठे तयार केले होते आणि बॉम्ब कोठे बनवले होते हे शोधण्याचे असारी यांच्यावर सोपवले होते. तसेच त्यांच्यावर सर्व पुरावे गोळा करण्याची जबाबदारी होती. यादरम्यान अनेक अधिकारी त्यांच्या टीममध्ये सामील झाले. टीम हळूहळू RDX (प्लास्टिक एक्स्प्लोझिव्ह) स्टोरेज एरिया आणि त्याच्याशी संबंधित संशयास्पद सामग्री कुठे सापडेल हे शोधण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान त्यांना एक लिंक मिळाली, ज्यामध्ये दानिलिमडा भागातील एका घरात दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचे कळाले होते, असारी यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना घेऊन तिथे पोहोचले. त्यावेळी त्यांना मिळालेल्या टिप्सने दहशतवादी कारवायांचे ठोस पुरावेच दिले.

टिममधले अधिकारी चार महिने घरी गेले नाही, रात्रंदिवस काम करायचे…

संपूर्ण प्रकरण लवकरात लवकर उलघडवण्यासाठी टीमवर प्रचंड दबाव होता. यामुळे टीम चार महिने रात्रंदिवस काम करत होती. दरम्यान परिस्थिती अशी होती की, हे सगळे अधिकारी सकाळी नऊ वाजता जेवण करायचो आणि मग अख्खा दिवस अन रात्र त्यावरच काढायचे. असं करत करत चार महिने हि अधिकारी लोकं घरीही गेले नव्हते.

टीमने देशभरात लपून बसलेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत होती. अखेर या दशतवाद्यांना पकडलं अन त्यांना अहमदाबाद क्राइम ब्रँचकडे सोपवलं. एक आरोपी कर्नाटकात सापडला होता. या आरोपींची वाहतूक करताना इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी तुमच्यावर हल्ला करू शकतात, असे टीमला सांगण्यात आले होते. त्यामुळे पाणी पिण्यासाठी देखील त्यांचे वाहन थांबले नव्हते. कर्नाटकातून गाडी निघाल्यावर ११६३ किमी अंतरावर येऊन अहमदाबादलाच थांबली. तसेच उज्जैनमधूनही टीमने दहशतवादी आणले होते. तेंव्हांदेखील अशीच काळजी घेत दहशतवादी आणले गेले…

या बॉम्बस्फोट साखळीचा मास्टरमाइंड असलेला  मास्टरमाइंड इकबाल, यासिन भटकळ आणि रियाज भटकळ होते.  यासीन भटकळ सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे.यासीन भटकळविरोधात नव्याने खटला सुरू होणार आहे, कारण यासीन पाकिस्तानात पळून गेला होता आणि नंतर पकडला गेला होता. मुफ्ती अबू बसरने स्लीपर सेल सक्रिय केला होता. ७७ आरोपींमध्ये यासीनचा समावेश आहे. अहमदाबाद साबरमती कारागृहात ४९, भोपाळ कारागृहात १०, मुंबईच्या तळोजा कारागृहात ४, बंगळुरू कारागृहात ५, केरळ कारागृहात ६, जयपूर कारागृहात २ आरोपी दिल्ली कारागृहात आहेत.

त्यातले दोषी सिद्ध झालेले लवकरच आता फासावर चढतील…पण असं पहिल्यांदाच घडलंय…कोर्टाने एकदाच ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे हा निकाल ऐतिहासिक ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केलाय जात आहेत. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.