राहूल गांधी म्हणाले, आटा २२ रुपये लिटर.. पण तसं नाही खोटा व्हिडीओ व्हायरल केलाय

एक गोष्ट एका व्यक्तीच्या बाबतीत सारखी सारखी होते, अन् ती म्हणजे भाषणातल्या चुकांचे व्हायरल व्हिडीओ. मध्यंतरी राहूल गांधींचा इकडून आलू टाकले की तिकडून सोनं बाहेर पडेल असा व्हिडीओ शेअर झाला होता.

तो इतका व्हायरल झाला की खूप जणांना अजूनही तो खराच व्हिडीओ आहे अस वाटतं. पण तस नव्हतं, राहूल गांधी मोदींवर टिका करताना बोलत होते. तेव्हा ते सांगत होते की केंद्रातलं मोदी सरकार काहीही आश्वासन देतं. मोदी कशा प्रकारचे आश्वासन देतात हे सांगताना त्यांनी आलू आणि सोनाचं वक्तव्य केलं.

पण भाजपकडून नेमकं तेच वक्तव्य कट करून राहूल गांधींच आश्वासन म्हणून दाखवण्यात आलं. त्यानंतर राहूल गांधींच्या मागे ते वक्तव्य कायमचं चिटकलं.. 

आत्ताही राहूल गांधींचा असाच एक व्हिडीओ शेअर होतोय. 

भाजपचे नॅशनल जनरल सेक्रेटरी कैलास विजयवर्गीय यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात राहूल गांधी आटा २२ रुपये लीटर असे म्हणताना दिसून येतय. कैलास विजयवर्गीय यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हणलय की, राहूलजी आटा लिटर मैं खरीदतें हैं.. 

सुमारे साडेचारशे लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. सात सेकंदाचा हा व्हिडीओ भाजपकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे… 

पण मुद्दा आहे तो राहूल गांधी खरच अस म्हणाले आहेत का? आणि म्हणाले आहेत तर कुठे? 

हा व्हिडीओ कुठला आहे? 

4 सप्टेंबर 2022 रोजी कॉंग्रेस पक्षामार्फत महागाईच्या विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानात महंगाई पर हल्ला बोल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्येच राहूल गांधी महागाईबद्दल बोलत होते… 

नेमकं काय म्हणाले राहूल गांधी.. 

या व्हिडीओच्या मागचं आणि पुढचं वक्तव्य घेतलं तर संपूर्ण व्हिडीओबाबत नेमकं काय झाल आहे हे कळून येत. 

या भाषणात राहूल गांधी म्हणतात,

2014 में एलपीजी का सिलेंडर 410 रुपए का था, आज 1050 रुपए का है, पेट्रोल 70 रुपए लीटर आज तकरीबन 100 रुपए लीटर. डीजल 55 रुपए लीटर आज 90 रुपए लीटर, सरसों का तेल 90 रुपए लीटर आज 200 रुपए लीटर, दूध 35 रुपए लीटर आज 60 रुपए लीटर, आटा 22 रुपए लीटर आज 40 रुपए लीटर.. .अअ केजी (किलोग्राम)

कॉग्रेस पक्षाच्या ऑफिशियल यू ट्यूब चॅनेलवर हल्ला बोल रॅली चं लाईव्ह स्ट्रिमिंग देण्यात आलं आहे. या व्हिडीओत 1 तास 52 मिनटांनी राहूल गांधी हे वाक्य बोलतात.

संपूर्ण व्हिडीओ पाहताना सहज लक्षात येत की लीटरमध्ये देत जाणाऱ्या उदाहरणानंतर शेवटी आटा येतो.

अशा वेळी बोलण्याच्या ओघात राहूल गांधी लीटर असा उल्लेख करतात पण त्याच्याच दूसऱ्या क्षणी आपली चूक सुधारत किलोग्रॅम असा उल्लेख करतात. 

म्हणजेच राहूल गांधींना बोलण्यात झालेली चूक लगेच लक्षात आली व त्यांनी ती लागलीच सुधारली देखील. भाषणात होणारी सहज चुक मात्र निवडून भाजपकडून राहूल गांधी यांनी तसाच उल्लेख केल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.