स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती. 

आज बातमी आली कि भारताचा महाराजा एअर इंडियाचा लिलाव टाटांनी जिंकला. एअर इंडियाचे मालक टाटा सन्स होणार. टाटा एअर इंडियाचे मालक होण्याची हि पहिली वेळ नाही. खरं तर एअर इंडियाची स्थापनाच जे.आर.डी.टाटा यांनी केली होती.

भारत कधीकाळी सोन्याचे पंख असणारी चिमणी होता अस सांगितलं जातं. इंग्रजांनी आपले हाल केले म्हणूनच आपण गरिब राहिलो हे धन्य मानण्यात एका वर्ग गुंतला असताना अशीही माणसं होती जी पुन्हा भारताला त्याच ताकदीने जगाच्या पाठीवर उभा करु पाहत होती. 

द टाटा ग्रुप – “टॉर्चबेअरर्स टू ट्रिलब्लैजर” या नव्या पुस्तकात टाटांनी पंचवीस कंपन्या उभा करताना कोणते कष्ट घेतले याची काही उदाहरणे देण्यात आली आहेत.

त्यातीलच महत्वाच उदाहरण म्हणजे जेआर डी टाटांनी एअर इंडिया उभा करताना घेतलेले परिश्रम. 

१९३२ साली जेआर डी टाटांनी टाटा सन्स नावाने कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ साली ब्रिटीशांनी त्यांनी हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याची परवानगी दिली, व त्याच वर्षीच्या ऑक्टोंबरमध्ये जेआर डी टाटांनी स्वत: टपालविमान चालवत कराचीहून अहमदाबादमार्ग मुंबईला आणले होते. कंपनीची स्थापनाच दोन विमान व एक वैमानिकावर करण्यात आली होती. 

दुसऱ्या महायुद्धानंतर टाटा एअरलाईन्सचं नाव बदलण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एअर इंडियाचे ४९ टक्के शेअर्स विकत घेवून ती शासनाचे नियंत्रण असणारी कंपनी बनवण्यात आली. त्याच वेळी एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा परवाना देखील देण्यात आला.  १९५३ च्या संपुर्ण राष्ट्रीयकरणानंतर देखील जेआरडी टाटांनी राष्ट्रीय वाहकचे अध्यक्ष करण्यात आलं. या नात्याने ते अजूनही एअर इंडियाच्या सुख सुविधाकडे लक्ष देत होते. 

या दरम्यानच्या कालावधीत जेआरडी टाटांनी एयर इंडिया कशी उभा केली याचं वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे, 

जेआर डी टाटा व्यक्तिगतरित्या विमानातील अंतर्गत सजावटीसाठी लक्ष देत असत. पडद्यांचा रंग कोणता असावा, कुशन कोणत्या प्रकारचे असावेत, सोईसुविधा कोणत्या देता येतील याकडे त्यांचे बारीक लक्ष असत. 

अशाच एका प्रसंगी जेआरडी टाटा विमानत आले असता,

त्यांनी विमानातले टॉयलेटच भांड अस्वच्छ दिसलं. लगेच त्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या व स्वत:च्या हातांनी ते साफ करु लागले.

अशाच एका बैठकीसाठी जात असताना त्यांना एअरलाईन्सचा टेबल अस्वच्छ दिसला. तात्काळ डस्टर मागवून त्यांनी तो स्वच्छ करायला घेतला. 

अशाच छोट्या मोठ्या कारणांमुळे एअर इंडिया आशियातील सर्वात मोठ्ठी कंपनी म्हणून विकसीत होतं होती.

एकेकाळी एकूण विमान वाहतुकीत एअर इंडियाचा हिस्सा साठ टक्के होता. पुढे काय झाल, ते आपण जाणताच. आकडेवारीत सांगायचं झालं तर आज एअर इंडियाचा एकूण हवाई वाहतुकीतील हिस्सा १४ टक्के इतका आहे. 

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.