एअरटेलच्या फ्रेन्ड्स कार्डवरुन तुम्ही प्रेमात पडला असाल तर हा लेख तुमच्यासाठी.

परवा एक मिम पाहिलं होतं. wtapp आणि फेसबुक मॅसेंजर गप्पा मारत असतात. एकमेकांना टाळ्या देत खुष असतात. दोघांच महत्व J1 झालं का याहून अधिक असल्याच सांगत असतात. तिकडे कोपऱ्यात SMS गॅलेरी शांतपणे एकट्यात दिवस काढत असते. आज SMS ला कोणीच विचारत नाही. इतक्यात आठवतं OTP आणि SMS गॅलेरी या दोघांपेक्षा स्वॅग मध्ये पुढे येवून उभा राहते.

SMS ची दहशत तशी आजही आहे, भले ती OTP पुरती का असेना.

आज मॅटर कसा आहे तर माणसांना फेसबुकवरुन प्रेम होतं. ते मॅसेंजरवरुन J1 झालं का विचारतात. सुत जुळलच तर तूम्ही wtsapp वर येता. झालं हल्लीच प्रेम इथच संपत गरजेलाच SMS वापरला जातो. पण खूप खूप वर्षांपुर्वी म्हणजे साधारण RHTDM दंगा घालत होता, वातावरणात आर्या नावाचा सिनेमा होता. लोकांच्या हातात नोकिया असायचे. गाण्यासाठी बाप फोन सोनी एरेक्सनचा वॉकमन सिरीज होता. तोच तो आरेंज कलरचा. आणि सर्वसामान्य कामगार वर्ग 3315, 3310,1100 मध्ये खुष होता. त्या काळात प्रेमाची पहिली भाषा SMS वरुन जायची.

SMS चा शोध लागला तो फ्रॉंको जर्मन GSM कॉ-ऑपरेशनमधील फ्रेडहेल्म हिलेब्रॉंज आणि बर्नाड गिलेबार्ट यांनी. शोध लावल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी व्होडाफोनच्या नेटवर्कवरुन पहिला SMS पाठवण्यात आला होता. नील पेपरेथ याने UK मधून हा SMS पाठवलेला म्हणे.

असो, तर या इतिहासात जाण्याची तशी विशेष गरज नाही. आपण सुरवात करुया ती इनकमिंग कॉलिंगला पैसे द्यावे लागयचे, SMS चार रुपयला पडायचा इथपासून ते फक्त OTP पर्यन्तच्या प्रवासात.

मोबाईल आले त्या काळात इनकमिंग देखील फ्रि नव्हतं. सुरवातीच्या काळात एअरटेल आणि नोकिया हे समिकरण होतं. GSM आणि CDMA हे कार्डचे प्रकार. GSM हे लोकशाहीवादी. कुठल्यापण मोबाईलला फिट होणारं. GSM कार्डची किंमत असायची हजार दोन हजार रुपये. बरं ते पैसे दिले की फक्त कार्ड मिळायचं. पुढं जोरदार जाहिरात आली की लाईफटाईम इनकमिंग फ्रि. वर्षा दोन वर्षातच आयड्या, हच, रिलायन्स, टाटा डोकोमो, टेलिनॉर सारख्या कंपन्यांनी डोकं वर काढलं आणि दर पडायला सुरवात झाली.

त्याचवेळी एअरटेलच्या स्किमा आलेल्या. आयडियाचे माय गँग, एअरटेलचे फ्रेंड्स सिम कार्ड होते. आयड्याने माय गॅंग नंतर काढलं त्यापुर्वी होतं ते एअरटेलच फ्रेन्डस कार्ड. त्यावेळी असल्या स्किमा आपल्या आहे त्या सिमवर चालू करता येत नसायच्या. प्रत्येक स्कीमसाठी सेपरेट कार्ड. फ्रेन्ड्स हा एअरटेलाचा पोटप्रकार होता. दुपारी तीन ते पाच दहा पैसे मिनट कॉल पडायचा. रात्रीचं फ्रि. त्यात दिवसाला 100 SMS फ्रि. आत्तासारखं कुठेही कधी बोलण्यासाठी स्किम तेव्हा तरी नसायची. असली तरी आमच्या नशीबात तशा मुली नव्हत्या. पोरगी कुठेतरी मग चान्स मिळायचा तो SMS करुनच.

SMS ची स्किम अशी होती की, आपण टाईप करतोय ते तिकडं दिसायचं नाही. जास्तित जास्त मॅसेंज डिलिव्हरी झाल्याचं नोटिफिकेश यायचं. सिंगल टिक, मग डबल टिक, मग ब्यू टिक, मग टायपिंग अशा दिर्घ कारभार नव्हता. पोरगीला मॅसेज गेला की नाही, तिनेच बघितला का तिच्या बापाने बघितला इथून गदारोळ चालू व्हायचा. त्यातही SMS साठी शब्दांची मर्यादा होती 160. पानभर लिहायचं नाही. तरिही 100 शब्दांच निवडक बोलणं व्हायचं. कारण OK, BYE, गुड नाईट यासाठी सेपरेट SMS करणं न परवडण्यासारखी स्किम असायची. मग असलं सगळं एकाच  मॅसेजमध्ये यायचं.

मोबाईल देखील किबोर्ड वाले. टच स्क्रिन आला तो सॅमसंग कॉर्बी. त्यानंतर एनड्राईड आलं. पण कि बोर्डवर टाईप करण्याची मज्जा वेगळी होती. फ्रेन्ड्स वरुन SMS करणारी जी काही लोकं असतील समजा त्यातले कोणीच कुठे नसेल तर आज ती मुलं किमान तहसिल कार्यालयाच्या बाहेर टायपिंग सुरू करुन किमान पोटापाण्याला लागली असतील यावर आमचा ठाम विश्वास आहे. आत्ता हे सगळं विस्कळित आहे.

आत्ता SMS कुठे आहेत तर फक्त OTP पुरते. नेटला रेन्ज नसेल तर SMS कर नेट नाही इतकं सांगण्यापुरतं. आज शक्यता कमीच आहे कुणाच्या लव्हस्टोऱ्या मोबाईलच्या SMS गॅलेरीत जन्माला येत असतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.