खुंखार समजल्या जाणाऱ्या वकार युनूसची जडेजाने केलेली धुलाई ऐतिहासिकच होती..

९ मार्च १९९६. भारत विरुद्ध पाकिस्तान. वर्ल्ड कप क्वार्टर फायनल्स. बेंगरुळु. सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये पाकिस्तान वर्ल्डकप मध्ये भारताकडून खेळला आणि नेहमीप्रमाणे पराभूत झाला. ते रेकॉर्ड बराच काळ भारताने अबाधित ठेवलं होत.

पण हि मॅच काय साधीसुधी नव्हती. हि मॅच भारत जिंकला म्हणून खास नव्हती तर या मॅचमध्ये मिस्टर स्टाईलिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय जडेजाने पाकिस्तानच्या वकार युनुसला पळता भुई थोडी केली होती.

भारताने प्रथम फलंदाजी करताना नवज्योत सिंग सिद्धूच्या ९३ धावांच्या जोरावर ४७ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून २३६ धावांपर्यंत पोहचला होता. मैदानावर आता अनिल कुंबळे आणि अजय जडेजा खेळत होते. भारताला उरलेल्यात ओव्हरमध्ये किमान २५० धावांचं आव्हान पाकिस्तानपुढे उभं करायचं होतं.

पण आत्ता कुठं मॅचमध्ये रंगत चढायला सुरवात झाली होती. पाकिस्तानचा गोलंदाज वकार युनूस भयंकर फॉर्ममध्ये होता, त्याचा खतरनाक इनस्विंग चेंडू बॅट्समनला समजत नव्हता. पण अजय जडेजा त्या दिवशी डोक्यात काहीतरी वेगळीच धून घेऊन उतरला होता.

४८ व्या ओव्हरला वकार युनूस बॉलिंगला आणि समोर अजय जडेजा उभा होता. पहिल्याच चेंडूवर ३ धावा निघाल्या आणि अजय जडेजा नॉन स्ट्रायकर झाला. पुढच्या दोन चेंडूंवर अनिल कुंबळेने सलग दोन चौकार लगावले. चौथ्या चेंडुवरही चौकाचं होता आपण फिल्डरने डाइव्ह मारून तो चेंडू अडवला. कुंबळे एक रन काढून पुन्हा नॉन स्ट्राईकवर गेला.

स्ट्राईकवर अजय जडेजा, वकार युनूस बॉल चांगलाच इनस्वींग आणि रिव्हर्सस्विंग करत होता. यॉर्कर टाकण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नव्हतं. त्यापैकी त्याचा कुठलाही एक चेंडू बॅट्समनला आउट करण्यासाठी पुरेसा होता. पण तो दिवसच खऱ्या अर्थाने अजय जडेजाचा होता. वकारने यॉर्कर टाकण्याच्या नादात पायावर बॉल फेकला अजय जडेजाने फ्लिक करून चौकार मिळवला. 

वकार चिडून बॉलिंग करत होता, फिल्डर्सला इकडे तिकडे पळवत होता. ओव्हर संपवायची कशी या मुद्द्यावर येऊन तो थांबला होता. यॉर्करवरचं अजय जडेजाला आउट करायचं असं त्याने ठरवलंच होतं, यॉर्कर पडला पण अजय जडेजाने अचूक टायमिंग साधत बॉल थेट सिक्स मारला ,सगळं स्टेडियम गजबजून गेलं.

वकार युनुसचं एक वेगळंच रेकॉर्ड झालं होत. त्याच्या या ओव्हरमध्ये ३,४,४,१,४,६ या प्रकारे एकूण २२ रन भारताने वसूल केले होते.

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरला पुन्हा वकार युनूस आणि अजय जडेजा समोरासमोर आले, वकार आधीच चिडलेला होता पण अजय जडेजाने शांत राहून आपला गेम त्याला दाखवला होता. या ओव्हरमध्येही अजय जडेजाने एक चौकार आणि एक षटकार लगावला. पण याच षटकात तो बादही झाला.

मात्र २५ चेंडूत ४६ धावांचा पाऊस पडून जडेजाने पाकिस्तानचं तोंडचं पाणी पळवलं होतं. भारताला चांगली धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात पाकिस्तनला सुरवात चांगली मिळाली पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानची डाळ शिजू दिली नाही. अमीर सोहेल आणि सईद अनवर बाद झाल्यावर पाकिस्तानची टीम अक्षरशः ढेपाळली. भारताने हा सामना ३९ धावांनी जिंकला.

मॅन ऑफ द मॅच म्हणून सिद्धूला निवडण्यात आलं मात्र त्या दिवसाचा खरा हिरो हा अजय जडेजाचं होता. वकार युनुसला त्याने जे झोडपलं होतं ते क्रिकेट रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.