ते जावूदे, अजय सिंह बिश्टचे ‘योगी आदित्यनाथ’ कसे झाले ते वाचा !
अलाहाबादचं प्रयागराज. कस आहे राजकारणात आत्तापर्यन्त सर्वात चर्चेला गेलेला विषय असेल नामांतराचा. मग ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो की औंरगाबादचं संभाजीनगर करण्याचे मुद्दे असोत. उस्मानाबादच धाराशीव, एल्फिस्टनच प्रभादेवी, इस्लामपूरच ईश्वरपुर अस आपल्या गल्लीतून जाणारं राजकारण दिल्लीत जात आणि दिल्लीतलं राजकारण गल्लीत येत. असच काय ते.
योगींची ठळक कामे कोणती विचारली तर सध्या, दिसेल त्याचं नाव बदलणे आणि फावल्या वेळात एन्कांटर? इतकी दोनच काम तुफान चालू आहेत. अधीमध्ये चांगली होतं असतील आपण नाही कशाला म्हणा, चुकून काम करत नाही म्हणायचो आणि ते आमचच नाव बदलून टाकायचे. कशीतरी बोलभिडू कार्यकर्ते म्हणून होणारी ओळख बदलून दुसरचं काहीतरी व्हायचं.
काय म्हणता, योगी आदित्यनाथ माणसांची नावे कशी काय बदलतील ? अहो इथे काहीही होवू शकतं. एकदा का योगी माणसाच्या मनात आलं ना, तर कोणीच त्यांना अडवू शकत नसतय.
इतकच काय असच खूप खूप वर्षांपुर्वी त्यांच्या मनात आलेले आपलं नाव अजित सिंग बिश्ट वरुन योगी आदित्यनाथ करायचं. मग काय झालं देखील. फक्त ते आत्ताच्यासारखं एका रात्रीत झालं नाही. त्याला खूप मोठ्ठा इतिहास आहे. हाच इतिहास खास आपल्यासाठी.
योगी आदित्यनाथ. वयाच्या २६ वर्षी गोरखपुर लोकसभा मतदारसंघावर स्वतच्या कर्तत्वानं झेंडा फडकवणारा नेता. स्वकर्तृत्वानं युपीच्या राजकारणात डेरेदाखल झालेला उत्तराखंडचा मुलगा.
योगींचा जन्म. उत्तराखंडमधल्या पंचुर गावचा. वडिल फॉरेस्टमध्ये नोकरीला तर आई हाऊसवाईफ. घरात तीन बहिणी आणि तीन भाऊ. एकूण सातजण. या सात मुलांच्यात आईचा लाडका दोडकां म्हणून योगींचा उल्लेख होत असे. वडिल सतत बाहेर असल्यानं आईबरोबरचं त्यांच नातं घट्ट झालं होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर योगी हे घरात रमणारे ममाज बॉय होते.
हे ही वाचा –
- गोष्ट, वाजपेयी आणि नेहरूंच्या नात्याची !
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव अधिकृतरित्या बदलण्यात आलं आहे -योगी सरकार
- वाजपेयींनी दिलेली राष्ट्रपती पदाची ऑफर कांशीराम यांनी का नाकारली ?
आपण जस शिक्षणाच्या नावानं पुण्याला यायचा निर्णय घेतो तसच योगी गोरखपुरला आले. तिथ त्यांनी BSC ला अॅडमिशन घेतलं. शिक्षण हा एकमेव मार्ग त्यांना दिसत असावा मात्र याच काळात योगींच्या आयुष्यात एक कांड झालं. योगींच्या रुमवर चोरी झाली. त्यात त्यांचे पदवी पुर्ण केल्याची प्रमाणपत्र हरवली. योगींना पुढचं शिक्षण घेण अवघड वाटत होतं.
अशातच एक दिवस त्यांच्या वडिलांना निरोप मिळाला, ते साल होतं १९९४.
आपला मुलगा संन्याशी झाल्याची ती बातमी होती. आई आणि वडिल तात्काळ गोरखपूरच्या मठात दाखल झाले. कोणत्याही कुटूंबाला आपला मुलगा असा अचानक संन्याशी होणं पटणारं नव्हतं. ते गोरखनाथ मठाचे सर्वेसर्वो अवैद्यनाथ महाराज यांना भेटले. आईनं आपल्या मुलालां परत घेवून जाण्याची विनंती महाराजांना केली. तर महाराजांनी आईला त्यांच्या मुलाला इथेच ठेवण्याची विनंती केली.
आदित्यनाथांनी आईला आपण मठाच्या सेवेसाठी राहत असल्याचं सांगितलं. तुमच्या आमच्या आईला जे वाटलं असेल तेच त्यांच्या आईला वाटलं. आई वडिल दोघेही रिकाम्या हातानं परत आले. काही वर्षात योगी खासदार झाले. ते ही वयाच्या सव्वीसाव्या वर्षी. निवडून आल्यानंतर योगी घरी आले. त्यानंतर ते अध्ये मध्ये घरी जावू लागले. त्यांचा एक भाउ स्थानिक कॉलेजमध्ये कॉम्युटर ऑपरेटर आहे. एक तिथेच शिपाई आहे. बहिणी संसारास लागली आहे.
आणि आई सांगते योगीने लहानपणी एक बाग केली होती. हल्ली योगीच्या आठवणी म्हणून आम्ही तिच बाग जीवापाड जपतो. वडिल म्हणतात, योगींच्या वाढदिवसाला आम्ही केक कापत नाही. आमच्याकडे वाढदिवसाला केक कापलाच जात नाही. आमच्याकडे पूजा असते. योगीच्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही पूजा करतो. अध्ये मध्ये योगी आम्हाला भेटतात आम्ही योगींना. सध्या आम्ही अजय सिंग बिश्टला योगी आदित्यनाथच म्हणतो !
हे ही वाचा –
- वाजपेयी नाहीत, अडवाणी नाहीत. मग कोण होते ? पहिल्यांदा निवडून येणारे भाजपचे ते दोन खासदार.
- दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचा संशय वाजपेयींवर का घेण्यात आला होता ?