अजित दादा…दिल्ली अभी बहोत दूर हैं !
“इथं राष्ट्रीय नेत्यांची भाषण अपेक्षित होती, म्हणून मी बोललो नाही. मी महाराष्ट्रात जावून बोलेनं” – अजित पवार
कालच्या राड्यानंतर अजित पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतलं हे वाक्य अजित पवारांची अस्वस्थता दाखवण्यासाठी पुरेसं आहे. तत्पूर्वी रविवारी नेमकं काय झालं? अजित पवार देशपातळीवरील मिडीयात चर्चेत का आले हे सांगण महत्वाचं आहे.
तर झालं असं की राष्ट्रवादी पक्षाचं आठवं राष्ट्रीय संमेलन काल दिल्ली येथे पार पडलं. या अधिवेशना दरम्यान अगदी सुरवातीला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच भाष झालं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, पीसी चाको, फौजिया खान, अमोल कोल्हे यांची भाषणे झाली. आत्ता घोषणा झाली ती जयंत पाटील यांच्या नावाची. नेमक्या याच वेळी अजित पवारांना भाषणांची संधी देण्यात यावी अशा घोषणा स्टेजखालून चालू झाल्या.
प्रफुल्ल पटेलांनी जयंत पाटलांचं भाषण पूर्ण होताच अजित पवारांच्या नावाची घोषणा केली पण त्यापूर्वीच अजित पवारांनी व्यासपीठ सोडलं होतं. अजित पवार वॉशरूमला गेले आहेत असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं असलं तरी ते स्टेजखाली असणाऱ्या कार्यकर्त्यांना व स्टेजवर असणाऱ्या नेत्यांना देखील न पटणारं होतं.
यानंतर अजित पवार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, इथे राष्ट्रीय नेत्यांची भाषण अपेक्षित होती..मी महाराष्ट्रात जावून बोलेन..
इथूनच पुन्हा एकदा अजित पवारांच्या नाराजीनाट्यावर चर्चा घडू लागल्या. पण यावेळीचं नाराजीनाट्य वेगळं आहे.
कारण आजवर अजित पवार नाराज झाले ते महाराष्ट्रातल्या राजकीय मुद्द्यावर. इथल्या राजकारणावर. यावेळी दिल्लीत अजित पवारांच्या नाराजीचा प्रत्यय आला आणि मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे, अजित दादा दिल्ली अभी बहूत दूर हैं..
हाच विषय समजून घेण्यासाठी, राष्ट्रवादी पक्षाची केंद्रिय रचना व राज्याची रचना कशी आहे? दोन्हीकडचं राजकारण नेमकं कसं चालतं आणि अजित पवारांना दिल्लीच्या राजकारणात कधीच स्कोप कसा मिळाला नाही हे विस्ताराने जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा..