किरीट सोमय्या यांचे नेक्स्ट टार्गेट कोण?
कालपासून चालू असलेला आघाडी सरकार वर्सेस किरीट सोमय्या हा हाय होल्टेज ड्रामा आपण पाहताच आहोत. आघाडी सरकारच्या नेत्यांचे घोटाळे काढण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. आता यात ड्रामा मध्ये एकएक पात्रांची एंट्री होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रडार वर असलेले हसन मुश्रीफ १०० कोटींचा घोटाळा केला म्हणून त्यांच्या सोमय्या त्यांच्या मागे लागले आहेत. सुरुवात अनिल देशमुख, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ. पण आता त्यांचे नेक्स्ट टार्गेट कोण असू शकतात असा प्रश्न माध्यमं आणि नागरिकांना पडले आहेत.
सोमय्या यांचे नेक्स्ट टार्गेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री?
याबाबत त्यांनी आजच्याच कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
पहिलं टार्गेट म्हणजे मुख्यमंत्री –
सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि, पुढच्या सोमवारी २७ तारखेला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं आहे.
तसेच या घोटाळ्याचा पाठपुरावा ते मागील जूनपासून करत आहेत. त्यांनी तेंव्हाच जाहीरपणे सांगितलं होतं कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत आहे, अशी सूचना त्यांनी १ जून २०२१ रोजी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना दिली होती.
कोर्लई गावात कोरोनाचा नावाने १०० दिवसाची घरबंदी, गावबंदी
गावचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर 28 दिवस पर्यंत लॉकडाऊन असा आदेश
मी कोर्लई तहसीलदार… अधिकाऱ्यांना श्री उध्दव ठाकरे चा 19 बंगलांचा घोटाळा चा पाठपुरावा साथी येणार असे कळविले होते, आता हा गाव बंदी चा आदेश pic.twitter.com/iVwWbNKLUc
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 6, 2021
त्यानंतर त्यांना प्रशासनाने ४ जून रोजी गावबंदी आणि घरबंदीचा काढण्यात आलेला आदेश पाठवला होता. तसेच तेथील ग्रामस्थांना कोर्लई गावातून बाहेर पडण्यास तसेच इतर गावातून कोर्लईत येण्यास प्रतिबंध लादला गेला होता. तसेच गावातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही २८ दिवसापर्यंत हा लॉकडाऊन, गावबंदी कायम राहील, असं अलिबाग प्रशासनाने या आदेशात म्हटलं होतं, असं सोमय्या यांनी सांगितलं होतं.
त्यांनी ठाकरे, वायकर परिवाराच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करत असल्यामुळे ठाकरे सरकार ने अनेक अडचणी आणल्या पण आता मी त्याचा पाठपुरवा येत्या काहीच दिवसात पूर्ण करेल असं ठामपणे सांगितलं आहे.
दुसरं टार्गेट म्हणजे, अजित पवार –
तर अजित पवार यांना टार्गेट करत त्यांनी ३० ताखेची डेडलाईन दिली आहे. ते म्हणाले कि, येत्या ३० तारखेला मी अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळी मला कुणीही रोखू शकत नाही.
मागील जुलै महिन्यात महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केली होती. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे कि, या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार याचं कनेक्शन आहे.
नेमकं प्रकरण असंय कि,
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. ली यांच्या मालकीचा असून त्यांनी २०१० सालात ६५ कोटी, ७५ लाख रुपयांना खरेदी केला होता.
तसेच हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. या कंपनीची भागीदारी हि, मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनीकडे देखील आहे. आणि हीच कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे माहिती ईडीने केलेल्या तपासात मिल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०१० सालात विक्री करण्यात आली तेंव्हा अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.
तसेच या विक्रीच्या प्रक्रीयेमध्ये योग्य ते औपचारिकता पळाली गेली नव्हती असे आरोप आहेत.
हा गैरव्यवहार होण्याच्या काळात काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते तेंव्हाच हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला होता. नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ला भाडे तत्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा ली मध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सोईल प्रा ली. कंपनीचा हिस्सा आहे.
आणि हि कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता. मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे ७०० कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. हे कर्ज २०१० पासून पुढील काळात घेतलं गेलं आहे असं म्हणण्यात आलं होतं.
तसेच हा साखर कारखाना अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांच्याकडे चालवण्यासाठी आहे.
या कारखान्याच्या च्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई झाल्यानंतर शालिनीताई पाटील यांनी माध्यमांन सांगितलं होतं कि, आमच्या कारखान्यावर कर्जाचा हफ्ता केवळ ३ कोटींचा असताना त्यांनी विकला. वास्तविक पाहता आमच्या खात्यात ८ कोटी रुपये होते. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला. त्यांनी २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. थोडा उशीर झाला पण आम्हाला आता न्याय मिळाला.
त्यानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले होते कि,
जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याची विक्री करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने २००७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या कर्जबाजारी साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत अशी सूचना केली होती. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढा अशी देखील सूचना न्यायालयाने केली होती.
जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याची विक्री करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने २००७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या कर्जबाजारी साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत अशी सूचना केली होती. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढा अशी देखील सूचना न्यायालयाने केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानादेखील होता. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले.
त्यानंतर पुढील काळात हनुमंतराव गायकवाड यांच्याकडून तो, राजेंद्र घाटगे यांनी चालवण्यासाठी घेतला. पण नंतरच्या काळात त्यांना देखील तोटा झाला. पण नंतर रितसर परवानगी घेत त्याचा विस्तार करण्यात आला. यासाठी रितसर कर्ज घेण्यात आलं असून ते सध्या फेडलंही जात आहे.
राजकीय सुडापोटी भाजपकडून त्रास देण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचे राष्ट्रवादी नेत्याचं म्हणण आहे. असो मागे किरीट सोमय्या म्हणाले होते कि, गणपती विसर्जन होईपर्यंत राष्ट्रवादी नेत्यांच विसर्जन होईल. त्या अनुषंगाने त्यांनी लावलेला कारवाई आणि आरोपांचा सपाटा पाहता पुढे अजून काय घडेल आणि आणखी किती नेते त्यांच्या कचाट्यात अडकतील हे पाहणे महत्वाचे आहे.
हे हि वाच भिडू :
- किरीट सोमय्या यांचे १० आरोप जे पुढे कुठेच टिकले नाहीत.
- किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर असलेले महाविकास आघाडीचे ११ नेते.
- सोमय्या यांचे नेक्स्ट टार्गेट कोण?