मुस्लिम कट्टरतावादाकडे झुकलेल्या अकबरुद्दीन ओवेसींची बायको मात्र ख्रिश्चन आहे.

AIMIM अर्थात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन. हैदराबादच्या राजकारणात वरचष्मा असणाऱ्या या पक्षाचं नाव घेतलं कि डोळ्यासमोर येतो तो कट्टरतावाद. आणि ओघानं डोळ्यापुढं येतात, या ओवेसींच्या घरचे लहान चिरंजीव अकबरुद्दीन ओवसी.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हे महाशय नेहमीच चर्चेत असतात. तसा ओवेसी घराण्याचा राजकीय इतिहास हा नेहमी चर्चेत असतोच. पण काही गोष्टी मात्र लवकर पुढं येत नाहीत, किंवा मग आल्या असल्या तरी लोकांना माहीतच नसतं.

अशाच या अकबरुद्दीन ओवेसींची लव्ह स्टोरीबद्दल भिडू आज तुम्हाला सांगणार आहे.

तर हैदराबादमध्ये AIMIM पक्षाचा एकतर्फी राज आहे. या पक्षाचे अकबरुद्दीन ओवसी तेलंगणा विधानसभेत जवळजवळ चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. पण असंच नाही बरं का निवडून आले, तर त्या मागे कट्टरतावाद होता.

आजवर अकबरुद्दीन यांच्यावर धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याबद्दल देशाच्या विविध भागात गुन्हे दाखल झाले आहेत. आता ते हे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य का करतात? तर अकबरुद्दीनचा असा विश्वास आहे की,

“हमरी क़ौम जजबाती है इसिलिये उसके जजबात को बेदर करना पड़ता है !

म्हणजे आमचा समुदाय भावनिक आहे. आपल्याला त्यांच्या धार्मिक भावना जागृत कराव्या लागतात.

पण याच कट्टर माणसाने एका ख्रिश्चन बाईशी लग्न केलंय. 

अकबरुद्दीन यांची पर्सनल आणि पॉलिटिकल लाईफ खूपच ड्रॅमॅटिक राहिली आहे. त्यांचा जन्म १९७० मध्ये हैद्राबाद मध्ये झाला. मोठा होत होतंच त्यांनी भारतात बऱ्याच ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगे पाहिले. अकबरुद्दीन लहान असल्यापासूनच त्यांचे वडील सालार सलाहुद्दीन ओवेसी, यांच्यासोबत बैठका आणि जलसामध्ये जायचा. कट्टरतावाद तिथूनच त्यांच्यात आला.

त्यांचे आजोबा आणि वडील राजकारणात सक्रिय होते. त्यांच्याच पायावर पाय देऊन अकबरुद्दीन यांना राजकारणात यायचे होते. पुढं शिक्षण कशातच घ्यायचं म्हणून त्यांनी डॉक्टरकी निवडली. पण एमबीबीएस पूर्ण काही केलं नाही. कारण ते एका मुलीच्या प्रेमात पडले.

एमबीबीएसला असताना तिथंच शिक्षण घेणाऱ्या एका ख्रिश्चन तरुणीच्या ते प्रेमात पडला. त्या तरुणीचं नाव होतं, सबिना.

सबिनाच्या प्रेमात अकबरुद्दीन इतके वाहून गेले होते की, संपूर्ण कुटुंबीयांचा विरोध न जुमानता त्याने सबिनाशी १९९५ मध्ये लग्न केलं. त्यांना प्रेमपुढं जातधर्म असं काहीच दिसलं नाही.

अकबरूद्दीन यांच्या वडिलांची इच्छा होती की, अकबरुद्दीनने एखाद्या मुस्लिम तरुणीशी लग्न करावं. पण तसं घडलं नाही. अकबरूद्दीन यांच्या न सांगता लग्न केल्याचा परिणाम झाला तो म्हणजे ओवेसींच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले होते.

शेवटी 

सलग तीन वर्षांनंतर अकबरूद्दीन यांच्या वडिलांचा राग शांत झाला. वडिलांनी त्यांना घरी बोलावले. वास्तविक या काळात त्याच्या वडिलांची प्रकृती ही सतत खालावत होती आणि त्यांना अकबरुद्दीन यांना भेटायचे होतं. कारण १९९९ हे वर्ष ओवेसी कुटुंबियांसाठी वेगळ होत.

ओवेसी कुटुंबाचे माजी विश्वासू आणि चंद्रयानगुट्टा मधून पाच वेळा आमदार राहिलेले अमानुल्ला खान AIMIM मधून बाहेर पडले होते. अमानुल्लाह एक फायरब्रँड लोकप्रिय नेता होते. त्यांना हरवणं AIMIM साठी गरजेचं होत. सालार सलाहुद्दीन ओवेसी यांच्या डोक्यात अकबरुद्दीन सोडले तर असा कोणताच व्यक्ती येईना जो अमानुल्लाहला हरवू शकेल.

या मागच्या कालावधीत अकबरूद्दीनने आपल्या बायकोचं, सबीनाचे नाव बदलून ‘सबीना फरजाना’ असं केलं होत. कदाचित या दोन्ही कारणांमुळे अकबरूद्दीन यांना ओवेसी घराचे दरवाजे उघडे झाले. 

तदनंतर अकबरुद्दीन यांना वडिलांच्या सांगण्यावरून पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली. वर्ष १९९९ मध्ये अकबरुद्दीन यांनी चंद्रयानगुट्टा येथून विधानसभा निवडणूक लढवली आणि एकतर्फी विजय मिळवून विधानसभेत पोहोचले.

म्हणजे ज्या प्रेमासाठी अकबरूद्दीन यांनी धर्म पाहिला नाही, घरच्यांचा विरोध जुमानला नाही, तेच अकबरुद्दीन निवडणुकीत मात्र धार्मिक कट्टरतेमुळे निवडून आले आहेत.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.