अखिलेश यादव यांना वाटतंय सायकलछाप परफ्युम योगी सरकारची हवा संपवणार..

निवडणुकीच्या टायमाला या नेते मंडळींच्या डोक्यात अश्या काही भन्नाट कल्पना येतात कि, काय विचारायला नको. जनतेचं लक्ष आपल्याकडे खेचून घ्यायची आणि विरोधकांना टोमणे मारायची एकही संधी ही मंडळी सोडत नाहीत.

असचं काहीस चित्र उत्तर प्रदेशातही पाहायला मिळतंय. येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जो तो पक्ष नवनवीन रणनीती आखातय. म्हणजे सत्ताधारी भाजप हिंदुत्तवाचं आपल कार्ड खेळतयं, तर काँग्रेसने यंदा वुमन कार्ड वापरलंय त्यामुळे हे दोन्ही पक्ष चर्चेत आहेत.

आता या सगळ्यात आपणही मीडियाच्या हेडलाईनमध्ये झळकाव म्हणून समाजवादी पक्ष सुद्धा खटाटोप करताना पाहायला मिळतंय. याचाच एक भाग म्ह्णून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या गटाने एक परफ्युम लॉन्च केलं. ज्याचं नाव ठेवलं ‘समाजवादी परफ्युम’.

माहितीनुसार, २२ नैसर्गिक सुगंधांनी हा परफ्युम बनवला गेलाय. या पर्फ्युमच्या बॉटलचा रंग पक्षाच्या झेंड्याच्या रंगासारखाच म्हणजे लाल आणि हिरवा रंगाचा वापर करून लॉन्च केला गेलाय. ज्यावर सपाचे निवडणूक चिन्ह सायकल सुद्धा आहे. 

 आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समाजवादी परफ्युम पक्षाच्याच आमदार पम्मी जैन यांनी बनवलाय, जे कन्नौजमधील परफ्यूम व्यापारी आहेत. पण हा परफ्युम बनवण्यामागे अखिलेश यांचंही डोकं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हा परफ्युम लॉन्च करताना सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हंटल कि 

 “जैन यांनी खूप चांगला परफ्यूम बनवला आहे. जे , ते समाजवादी पक्ष आणि समाजवादी विचारसरणीची आठवण करून देतील. रंगही लाल हिरवा ठेवला आहे. ही बाटली बाकी कुठे तरी गेली तर तिचा वास बदलू शकतील की नाही, पण रंग नक्कीच बदलतील.

आता या आपल्या वक्तव्यातून अखिलेश यांनी नाव न घेता थेट सीएम योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. लखनऊमध्ये परफ्युमच्या लॉन्चिंगवेळी अखिलेश यादव म्हणाले की,

 “हा परफ्यूम समाजवादी पक्षाची विचारधारा देशभर पसरवेल. द्वेषाची विचारधारा नष्ट करण्यासाठी तो सुगंधाचे काम करेल. त्यामुळे मला हा परफ्यूम सत्ताधाऱ्यांच्याकडे सुद्धा पाठवायचे आहे, पण ते कोणाच्या माध्यमातून पाठवायचे ते समजत नाही.”

असं म्हंटल जातंय की, हा परफ्युम २२ नैसर्गिक सुगंधाने बनलेला आहे, ज्या संख्येला राजकीय महत्त्व देखील आहे. म्हणजे २०२२ च्या निवडणूक वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा परफ्यूम तयार केला गेलाय. ज्यात पुढे जाणून २४ नैसर्गिक सुगंध असतील, जे २०२४ पर्यंत देशभरात पसरलेले द्वेषाचे वादळ दूर करण्याचे कामही करेल.

सपाच्या एका पदाधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, हा परफ्यूम विक्रीसाठी नाही, तर पक्षाच्या रॅली आणि इतर कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये त्याच वाटप केलं जाणार आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत सुमारे एक लाख बाटल्या तयार करण्यात आल्या आहेत.

पक्षाच्या दाव्यानुसार, ‘लोक जेव्हा हा परफ्युम वापरतील, तेव्हा त्यांना त्यात समाजवादाचा वास येईल. हा परफ्यूम २०२२ मध्ये द्वेषाचाही अंत करेल.’

आता समाजवादी पक्षानं हे परफ्युम लॉन्च केलं खरं पण त्यामुळे पक्षाला ट्रोलचा सामनाही करावा लागला.

 

आता अखिलेश यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा हा समाजवादी परफ्युम द्वेषाचे वातावरण दूर करेल. म्हणजे काय तर योगी आदित्यनाथ यांच्या सत्ता दूर होईल असा त्यांचा विश्वास आहे. पण निवडणुकीच्या वेळी प्रत्यक्ष निकालात येतोय, आणि कोणाची हवा राहतेय आणि कोणाची निघतेय हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.  

 ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.