नावच नसणाऱ्या ढाब्यानं इस्लामपूरच्या आख्खा मसुरला जगात फेमस केलं !!

आज सगळीकडे इस्लामपूरचा आख्खा मसुर म्हणून प्रसिध्द आहे. पण हा आख्खा मसुर इस्लामपूरमध्ये मिळतो कुठे. एवढा का प्रसिध्द झाला. मग ज्या ढाब्यावर मिळतो. त्या ढाब्याचे नाव तरी काय आहे असा प्रश्न पडतो.

पुणे – बेंगलोर महामार्गावर असंख्य ढाबे आहेत. पण कामेरीचा नाव नसलेला ढाबा आख्खा मसुरसाठी प्रसिध्द आहे. या ढाब्याने आख्खा मसुर या डिशला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. पुणे बेंगलोर हायवेला इस्लामपूर जवळच कामेरीमध्ये हा ढाबा आहे.

हा ढाबा १९८३ मध्ये अरुण पाटील यांनी सुरु केला. त्यावेळी त्यांनी त्या ढाब्याला नावच दिले नव्हते. पण आख्खा मसुराने ढाब्याला वेगळी ओळख निर्माण झाली.

या ढाब्यावरील आख्खा मसुरला चव वेगळीच आहे. या चवीने मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील अति श्रीमंत लोकांना भुरळ घातली आहे. आजही या ढाब्याबाहेर लक्झरी कारची प्रचंड गर्दी असते. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील श्रीमंत मंडळी हमखास या ढाब्यावर नंबर लावून वेटींगला थांबलेले पहायला मिळतात.

साधारणता बाहेरील कोणत्याही ढाबा किंवा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यावर आपल्याला १० ते १२ प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या मिळतात. पण अरुण पाटील यांच्या ढाब्यावर फक्त आख्खा मसुरच मिळतो. एकच प्रकारची भाजी मिळणार हॉटेल अस कधी ऐकल आहे का…? पण हीच तर खासीयत आहे. या ढाब्यावरील आख्खा मसुरच्या चवीची.

आज या आख्खा मसुरच्या धाब्यामुळे आख्खा मसुरची इंडस्ट्रीच तयार झाली आहे. कुठेही जावा इस्लामपूरचा स्पेशल आख्खा मसुरा नावानेच हॉटेल, ढाबे मिळणार.

गरिबांचे कडधान्य म्हणून ओळखल्या जाणारी ही मसूर डाळ श्रीमंतांचे खाद्य बनले आहे.

आज धाब्यावरचं जेवन म्हटल तर सगळ्यांसमोर येत ते फक्त मटनच, तांबडा, पांढरा. पण हा आख्खा मसुर खाण्यासाठी लोक १०० किलोमीटरवरुन कामेरीला येऊ लागले. ढाब्यावरील सुविधा कल्पने पलिकडील आहे. ढाब्यावर ऑर्डर देत असताना आधी मसुरा टेस्ट करण्यासाठी दिला जातो. ती टेस्ट बघुन नंतर तुम्हाला हवी तशी ऑर्डर दिली जाते. अशी पध्दत हॉटेलिंग व्यवसायात प्रथम याच ढाब्यावर आली असावी.

आता या आख्खा मसुऱ्याचा पश्चिम महाराष्ट्रात ट्रेंडच सुरु आहे. आजही कायम हाऊसफुल असतो. या ढाब्यावर आल्यानंतर वेटींगवरच थांबाव लागत.

अरुण पाटील यांच्यामुळे आज स्वारगेट ते कोल्हापूर परिसरात ढाब्यावर आक्का मसूरा ची इंडस्ट्री चालू सुरू झाली आहे. हायवेवरील कोणत्याही ढाब्यावर आज इस्लामपूर मसुरा मिळतोच. अरुण पाटील यांच्या या आक्का मसूऱ्यामुळे अनेक ढाबे चालू झाले आहेत.

आज अरुण पाटील हयात नाहीत. पण त्यांच्या ढाब्यावरील मसुऱ्याची चव आजही बदलली नाही. त्यांचे भाऊ प्रकाश पाटील आख्खा मसुर तयार करतात. ढाबा आजही साधाच आहे. फक्त या विना नावाच्या ढाब्याला आता अरुण पाटील ढाबा असे नाव देण्यात आले आहे.

पुणे -बेंगलोर हायवे वर कामेरी व इटकरे च्या मध्ये हा ढाबा आहे.

या ढाब्याला पूर्वी नावच नसल्यामुळे मुंबई, पुणे येथील लोक या मसुऱ्याला इस्लामपूरचा किंवा कामेरीचा आख्खा मसुर म्हणू लागले. अख्ख्या महाराष्ट्राला मसूर खाण्याची सवय लावणाऱ्या अरुण पाटलांची आठवण आणि त्यांच्या हातची चव आजही जपली आहे.

  • संदीप कदम

 ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.