अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशिल शेरकर संपुर्ण प्रकरण काय आहे..?

सोशल मिडिया सध्या एका वादामुळे रंगल आहे. वाद आहे सत्यशिल शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे यांचा.

सत्यशिल शेरकर हे कॉंग्रेसचे नेते आहेत.

जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रूक हे त्यांच गाव. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. परिसरात ते चेअरमन या नावाने प्रसिद्ध आहेत. सत्यशिल शेरकर हे राजकीय पातळ्यांवर मात्तब्बर व्यक्ती म्हणून ओळखले जातात. स्व. निवृत्तीशेठ शेरकर हे खासदार होते.

त्यांनीच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर स्व. सोपानशेठ शेरकर यांनी चेअरमन म्हणून कारखान्याचा कारभार पाहिला व त्यांच्या पश्चात सत्यशिल शेरकर हे कारखान्याच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात देखील सक्रीय राहिलेले आहेत.

तर या वादातील दूसरे व्यक्ती अक्षय बोऱ्हाडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

रस्त्यांवर भटकणाऱ्या मनोरुग्णांवर उपचार करून त्यांची सेवा करण्याच काम २३ वर्षांचा हा तरुण करत आलेला आहे. जुन्नर येथे असणाऱ्या ‘शिवऋण’ या आपल्या सामाजिक संस्थेमार्फत आजपर्यन्त शेकडो निराधार व्यक्तींना आधार मिळवून देण्याचं सामाजिक कार्य ते करत असतात.

वादाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे.

अक्षय बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला एक व्हिडीओ प्रसारित केला. हा व्हिडीओ बुधवार दिनांक २७ मे रोजी दूपारी १ वाजून ४० मिनटांनी प्रसारित करण्यात आला.

या व्हिडीओमार्फत अक्षय बोऱ्हाडे यांनी आपल्याला सत्यशिल शेरकर यांनी मारहाण केल्याचं सांगितलं. याच सोबत त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले. त्यामध्ये,

सत्यशिल शेरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली, आपल्यावरती बंदूक रोखली, माती चाटायला लावली व दमदाटी केली असे आरोप आहेत.

आपल्या मारहाणीबाबत सांगत असताना अक्षय बोऱ्हाडे म्हणतात,

Akshay Mohan Borhade ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮೇ 27, 2020

सत्यशिल शेरकर यांच्या बंगल्यावरील CCTV फुटेज पाहून खऱ्याखोट्याची खातरजमा करावी. मात्र याबाबत आपण पोलीस केस दाखल करणार नसल्याचं देखील ते सांगतात.

अक्षय बोऱ्हाडे यांच्या मारहाणीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काही दिवसांपूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.

त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांवर देखील असाच आरोप झाल्याने व मारहाण झालेली व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता असल्याने हे प्रकरण तापले.

त्यानंतर सत्यशिल शेरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सोशल मिडियातून व्हायरल झाला.

 

या व्हिडीओमध्ये सत्यशील शेरकर सांगतात की,

कोरोनाच्या परिस्थितीमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. अक्षय बोऱ्हाडे या युवकाने आपल्या घराच्या परिसरात त्याच्या संस्थेत ४० ते ४५ मनोरुग्ण व्यक्तिंना आसरा दिलेला आहे.

आम्हाला एका व्यक्तिने सांगितले की अक्षय बोऱ्हाडे यांच्या संस्थेत असणारी एक व्यक्ती कोरोनासदृश्य आहे.

त्यामुळे त्या व्यक्तिबाबत आम्ही विचारणा केली. त्यानंतर अक्षय बोऱ्हाडे मंचरवरून आणलेल्या सदर व्यक्तीस पुण्याला सोडून आला. त्याने या व्यक्तीस हॉस्पीटलमध्ये सोडलं का इतर कुठे सोडलं याबाबत आम्हाला माहिती नाही.

त्यानंतर ग्रामस्थांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आम्ही दिनांक २७ मे रोजी सकाळी त्याला घरी बोलवलं. त्यावेळी माझ्यासोबत गावातील ५-६ ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला मनोरुग्ण व्यक्तींची काळजी घे अस सांगितलं असता त्याने आरेरावीची भाषा केली, शिवीगाळ केली व तो तिथून निघून गेला व त्यानंतर त्याने हा व्हिडीओ प्रसारीत केला.

या व्हिडीओच्या माध्यमातून,

सत्यशील शेरकर यांचा पत्रकार परिषदेत खुलासा करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघा !!! Video- (विघ्नहर टाईम्स) जुन्नर च्या पत्रकाराने घेतलेली मुलाखत आहे. टीप -आम्ही अक्षय वरती झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आमचा व शेरकर चा कोणताही संबंध नाही….. आम्ही बातमी देणे हे आमचे कर्तव्य करत आहोत……

PUNE city news ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮೇ 27, 2020

अक्षय बोऱ्हाडे यांना आपल्या बंगल्यावर बोलावून घेतल्याचं सत्यशील शेरकर मान्य करतात. पण त्याला मारहाण झाल्याच्या गोष्टीला नकारतात.

पोलीस कारवाई करण्याच्या बाबतीत शेरकर सांगतात की,

तो लहान आहे. यापुढे त्यांने आरोग्याची काळजी घ्यावी. आम्ही कोणत्याही प्रकारची पोलीस केस करणार नसल्याचं ते स्पष्ट करतात.

या दोन्ही गोष्टीमधून सत्यशील शेरकर यांनी अक्षय बोऱ्हाडे यांना बंगल्यावर बोलावल्याचं स्पष्ट आहे. याबाबत अक्षय बोऱ्हाडे यांच म्हणणं आहे की त्यांच्या बंगल्यावरील CCTV चा तपास करावा. मात्र CCTV बाबत सत्यशिल शेरकर कोणतही भाष्य करत नाहीत.

त्यामुळेच सत्यशिल शेरकर यांना सांगू वाटतं की,

CCTV फुटेज पोलीसांच्या ताब्यात देवून दूध का दूध अन् पाणी का पाणी करावं

अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशिल शेरकर यांच्या वादावरून सोशल मिडीयावरती देखील दोन गट पडले.

त्यापैकी अक्षय बोऱ्हाडे यांची बाजू घेणाऱ्या लोकांच मत आहे की,

अक्षय हा निस्वार्थपणे सामाजिक कार्यात सक्रिय आहे. त्याला बंगल्यावर बोलावून मारहाण करणं चूकीचं असून ही प्रवृत्ती सरंजामदारची आहे. अक्षय यांच्या आजवर केलेल्या कामांचा दाखला देवून मोठ्या प्रमाणात त्यांना युवक पाठिंबा देत आहेत. यापैकी,

कोल्हापूरचे खा. संभाजीराजे, सातारचे खा. उदयनमहाराज आणि निलेश राणे, बाबाराजे भोसले या प्रमुख व्यक्तिंसह अनेक मान्यवरांनी अक्षयला पाठिंबा देवून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खासदार संभाजी राजे लिहतात, 

Screenshot 2020 05 28 at 7.08.06 PM

 

खा. उदयनराजे भोसले लिहतात, 

Screenshot 2020 05 28 at 7.08.46 PM

आ. नितेश राणे लिहतात,

Screenshot 2020 05 28 at 7.11.46 PM

या प्रमुख व्यक्तींसह अनेकांनी अक्षय बोऱ्हाडेंना झालेल्या मारहाणीचा निषेध करत त्यांच्या सामाजिक कार्यांची आठवण करुन दिलेली आहे. 

याचसोबत सत्यशिल शेरकर यांच्या पाठिंब्यासाठी देखील लोक मैदानात उतरले असून त्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती,

अक्षय बोऱ्हाडेस मारहाण झाली असल्यास तो पोलीस कारवाई करण्यास नकार का देत आहे?

स्थानिक राजकारणामुळे तो सत्यशिल शेरकर यांच्या बदनामीचा प्रयत्न करत आहे याचसोबत त्यांच्या सामाजिक कार्यावर आक्षेप नोंदवणाऱ्या पोस्ट टाकल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने सत्यशिल शेरकर यांना पाठिंबा दर्शवणारा व्हिडीओ खा. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटरवरून व्हिडीओ प्रसारित केला असून नाण्याला दोन बाजू असतात, दूसरी बाजू आपण ऐकून घ्यायला हवी त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलीस खात्याला त्यांच काम करून द्यावं अस ते सांगतात,

ते म्हणतात,

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.