जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाची बायको २४ तासाच्या आत त्याला सोडून गेलेली…

आपण जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांच्याबद्दल बोलतोय हे फोटो पाहून तुमच्या लक्षात आलच असेल. डॉ. अल्बर्ट एलिस हे अमेरिकेतले जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. REBT अर्थात Rational Emotive Behavioral Theropy (REBT) चे ते जनक.

एखाद्याने विचार कसा करावा, भूतकाळासंबधित जाणिव, लैंगिक स्वातंत्र याबद्दल त्यांनी काम काम केलं. त्यांच्या संस्थेचं नावच लव्ह अॅण्ड मॅरेज प्रोब्लेम इन्टिट्यूट होतं. जगप्रसिद्ध असणाऱ्या अशा माणसाच्या खाजगी आयुष्यात सगळं काही चांगलच चाललं असेल असा आपला समज असेल. पण दिसतं तसं नसतय. या माणसाची बायको तर त्याला एका दिवसात म्हणजे २४ तासांच्या आतच सोडून गेली होती.

साहजिक भुवया उंचावुन वाचायला पायजे की, अस काय केलेल की त्यांनी की बायको एका दिवसात सोडून गेली. याचा उल्लेख त्याच्या मी अल्बर्ट एलिस या पुस्तकात करण्यात आला आहे.  

तर झालं होतं असं की,

अल्बर्टच्या आयुष्यात एक कॅरल नावाची मुलगी होती. दिसायला गोरीपान आणि आकर्षक असणाऱ्या कॅरलला पाहताक्षणीच अल्बर्ट प्रेमात पडला. कॅरल समोर दिसली की त्याच्या मनात तिच्यासोबतच्या संसाराची स्वप्ने रंगायची. हे सगळं ठिक असलं तरी कॅरलला पटवणं खुप महत्त्वाचं होतं, आणि ते त्यान केलंही.

ती एका ड्रीमगर्ल नावाच्या नाटकात ड्रिमगर्लची भुमिका करीत होती. नाटक संपल्यानंतर रोज हा तिची वाट पाहायचा आणि तिच्याशी बोलायची संधी शोधायचा नंतर याला कळलं की तिचा एक बॉयफ्रेंडही आहे पण त्याच्यासोबतच तिचं नातं संपुष्टात आल्याने अल्बर्टचा रस्ता आपोआप रिकामा झाला. ते दोघे भेटू लागले, बोलु लागले तो तिला गिफ्ट द्यायचा पण लग्नाचा विषय काढलाकी मात्र ती काहीच बोलत नसल्याने अल्बर्टला दिशा गवसत नव्हती.

एकेदिवशी त्याने धाडस करून तिच्यासमोर लग्न करून दाखविण्याची इच्छा व्यक्‍त केली आणि तिनेही त्याचे बोलणे ऐकून ती मान्य केली. आता वेळ होती कॅरलच्या वडीलांना भेटायची. तिच्या वडिलांना भेटायला अल्बर्ट तिच्या अलिशान घरात गेला.

अल्बर्टला भेटल्यावर कॅरलच्या वडिलांनी त्याच्या घरच्यांबद्‌दल विचारलं. अल्बर्टने त्यांचा घटस्फोट झाला असल्याचे सांगताच त्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी नंतर विचारलं तु चर्चला जातोस का त्यांचा रोख लक्षात घेत अल्बर्ट म्हणाला नाही, मी ज्यू असलो तरी सिनेगॉगमध्येही जात नाही कारण माझा देवावर विश्‍वास नाही.

त्यांनी तडाडून विचारलं ज्यू……

मग तुझं आडनाव एलीस कसं काय तर अल्बर्ट ते आडनाव वडिलांनी बदलले असल्याचे सांगितले. ते ताडकन उठले आणि त्यांनी अल्बर्टला घरातून हाकलून लावलं कारण ते व्हाईट अमेरिकन होते.

अल्बर्टला हा अपमान सहन झाला नाही पण काही दिवसाने कॅरल त्याला पुन्हा भेटायला आणि त्या दोघांनी कायदेशीर लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट तिच्या बाबांना सांगायची नाही असंही त्यांनी ठरवलं. आणि ठरल्याप्रमाणे लग्न पार पाडलं.

आता मधुचंद्राची वेळ होती.

अनोख्या दिसणाऱ्या कॅरलसोबत वेळ घालविण्याची स्वप्ने अल्बर्ट पाहू लागला होता. त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका अलिशान हॉटेलमध्ये एक खोलीही बुक केली होती. येथे आल्यावर काही वेळात तो बघतोय मी वडिलांकडे जात असल्याची चिठ्‌ठी लिहून कॅरल निघून गेली होती. आता कॅरल पलटी मारते की काय. अशा विचारांनी वेडापिसा होत तो तिच्या मागे तिच्या घरी गेला तर तिच्या वडिलांचा पारा चढला होता.

कायदेशीर लग्न करूनही कॅरल तिच्या वडिलांच्या बाजूलाच उभी होती. पण तिथं गेल्यावर मी तिला घटस्फोट देईन असं लिहलेल्या कागदावर सही करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली. असं करं अन्यथा मी तुला पोलीसांच्या हवाली करीन आणि तुझं जगणं मुश्‍किल करेन अशी धमकीही त्यांनी दिली. त्यानं कॅरलकडे उदास डोळ्यांनी पाहिलं आणि तिला विणविण्याचा प्रयत्न करू लागला मात्र ती म्हणाली, मला तुझ्याबरोबर येण्याची इच्छा नाही. तुझ्याशी लग्न करून मी चुकच केंलीय. असं म्हणून तीनं आपल्या भाषेत सांगायच तर पलटी मारली आणि बिचाऱ्या अल्बर्टला त्याच दिवशी तिला घटस्फोट देत असल्याचे मान्य करावे लागले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.