7 वर्ष फरार असलेला गडी फक्त एका घड्याळामुळे पकडला गेला होता…..

जगभरात हजारो मर्डर, गोळीबार, गँगवॉर घडत असतात. काही काही गुन्हे इतके विचित्र असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही असे गूढ ते बनून जातात. पण ते म्हणतात ना का आरोपी काही ना काहीतरी पुरावा सोडुन जात असतो आणि पोलिसांचे हात तिथं पोहचतातच. असाच आजचा किस्सा आहे ज्यात एका घड्याळाच्या पुराव्यावरून 7 वर्षे फरार झालेल्या घोटाळेबाज आरोपीला अटक करण्यात आली होती. तर जाणून घेऊया नक्की काय विषय झाला होता.

या किस्स्याची सुरवात होते 1990 पासून. कॅनडामध्ये एकदा 3 मिलियन यूएस डॉलरचा तगडा घोटाळा झाला. हा इतका मोठा मॅटर करणाऱ्या गड्याचं नाव होतं अल्बर्ट जॉन्सन वॉकर. घोटाळा उघडकीस आल्यावर मात्र या अल्बर्ट जॉन्सन वॉकरची पळापळ सुरू झाली. पोलिसांच्या ताब्यात जाण्याअगोदर तो फरार झाला आणि जाऊन पोहचला थेट कॅनडाला. तिथून तो युरोपला आणि नंतर पुढे इंग्लंडमध्ये लपून बसला. आता गप बसायचं सोडून हा गडी नवनवीन युक्त्या शोधू लागला.

तिथं त्याची भेट झाली टीव्ही रिपेअर करणाऱ्या रोनाल्ड प्लाट आणि त्याच्या गर्लफ्रेंडशी. इकडे वॉकर कॅनडाला कल्टी देऊन इंग्लंडमध्ये आलेला होता आणि तिकडे रोनाल्ड प्लाटला इंग्लंडमधून कॅनडाला जायचं होतं. याच गोष्टीचा फायदा उचलत वॉकरने बरोबर फासे टाकायला सुरवात केली. अगोदर त्याने रोनाल्ड सोबत चांगली मैत्री केली आणि मैत्रीचा हवाला देत ख्रिसमसच्या दिवशी अल्बर्ट जॉन्सन वॉकरने रोनाल्ड आणि त्याच्या गर्लफ्रेंडला कॅनडाची तिकीट गिफ्ट दिली.

आता इतक्या पैश्याचा घोटाळा करून आलेला अल्बर्ट जॉन्सन वॉकर हुशार होता त्याने तिकिटं देतेवेळी रोनाल्ड कडून एक स्टॅम्प पेपर साइन करून घेतला आणि त्याबरोबरचं त्याने क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि इतर सगळे कागदपत्रे जमा करून घेतले. दुसऱ्या बाजूला रोनाल्ड तर पार येडा झालेला होता त्याला सगळं सोडून कॅनडाला जायचं होतं. त्याला या बाबतीत काहीच माहिती नव्हतं.

रोनाल्ड कॅनडाला गेला. इकडे वॉकरने रोनाल्डच्या कागदपत्रावर स्वतःची नवी ओळख निर्माण केली आणि नवीन आयुष्य जगायला सुरवात केली. सगळं पद्धतीशीर चालू होतं पण नेमका लफडा झाला आणि रोनाल्ड कॅनडा वरून परत आला, आत रोनाल्डच्या येण्याने सगळं सोंग उघडकीस येणार होत म्हणून अल्बर्ट जॉन्सन वॉकरने रोनाल्डची हत्या घडवून आणली आणि आपल्या रस्त्यातला काटा कायमचा काढून टाकला. पण त्याचा अल्बर्ट जॉन्सन वॉकरला फार उपयोग झाला नाही.

काही दिवसांनी म्हणजे 6 आठ्वड्यानी पोलिसांना एक प्रेत सापडलं. त्याच्या हातात एक रोलेक्सचं घड्याळ होतं ज्यामुळे ते प्रेत रोनाल्डचं आहे हे ओळखायला मदत झाली. घड्याळावरून पोलीसांनी शोध घेतला आणि वॉकर अलगद पोलिसांना सापडला. तब्बल 7 वर्षे अल्बर्ट जॉन्सन वॉकर याने पोलिसांना गुंगारा दिला होता. वॉकर हाती आल्यावर पोलिसी खाक्या दाखवताच अल्बर्ट जॉन्सन वॉकरने सगळं खरं सांगून टाकलं.

अशा प्रकारे एका घड्याळामुळे 7 वर्ष लपून बसलेला घोटाळेबाज पोलिसांच्या तावडीत सापडला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.