सासऱ्यांनी दिलेल्या सायकल वरून नगरपालिकेत जाणारा मुख्यमंत्री बनला.

वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि मराठवाड्यातले एक मान्यवर नेते शंकरराव चव्हाण हे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले होते. शंकरराव चव्हाण हे १९७५ ते १९८७ आणि त्यानंतर १९८६ ते १९८८ असे दोन वेळा या पदावर विराजमान झाले होते.

शंकरराव चव्हाण हे पैठण एक पंडित गागाभट्ट यांची जन्मभूमी असणाऱ्या गावचे. तिथं १४ जुलै १९२०  रोजी त्यांचा जन्म झाला. पूर्वीच्या काळी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पैठण हे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेले प्रसिद्ध महाराष्ट्रातले तीर्थक्षेत्र.

शंकररावांच्या वडिलांचे नाव भाऊराव व त्यांच्या मातोश्रीचे नाव लक्ष्मीबाई. या दांपत्याला पाच मुले आणि दोन मुली होत्या. यातले चौथ्या क्रमांकाचे म्हणजे शंकर राव. मूळचा अहमदनगर जिल्ह्यातल्या रांजणगाव या गावाचे चव्हाण हे कुटुंब. या गावात त्यांची शेती होती. पण ती खूपच तुटपुंजी होती त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होऊ लागली.

चव्हाण कुटुंबाने रांजणगाव ते गाव सोडलं आणि मराठवाड्यातल्या पैठण या गावी स्थलांतरित झाले. या गावात त्यांनी काही काळ बांधकाम व्यवसाय केला.

त्यामुळे लोकं त्यांना दगडफोड्या नावाने संबोधू लागले.

भाऊराव ते जेमतेम सातवी इयत्ता शिकलेले होते. पण त्या काळात सातवीपर्यंतचे शिक्षण ही बहुमोल मानलं जायचं. त्यावरच त्यांना पैठणमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली होती. शंकरराव यांचे वडील भाऊराव यांचा समाजात तसा खूप दरारा होता. शाळेतली मुलं भाऊराव दिसले रे दिसले की खिशातली टोपी काढून ती पटापट डोक्यावर ठेवीत.

भाऊराव एक शिस्तप्रिय शिक्षक असा त्यांचा लौकिक होता ती खरोखरच शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना एक प्रकारे भीतीयुक्त आदर होता. हाच गुण पुढे शंकररावांच्या मध्ये आला असावा.

शंकराव यांची पैठण जवळील टाकळी या गावाच्या शाळेतील तुळजापूरकर गुरुजींशी त्यांची भेट झाली आणि तेव्हापासून शंकररावांच्या डोक्यात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचा विचार करू लागले. सातवीपर्यंत पैठणमध्ये शिकल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांना हैदराबादला पाठवण्यात आलं.

१९३९ मध्ये ते मॅट्रिक पर्यंतचे हैदराबाद मधलं निजाम कॉलेज हे तसं श्रीमंताचा कॉलेज मानलं जायचं.

पण शिकवण्या करून शंकररावांनी त्याच कॉलेजात प्रवेश घेण्याचे नक्की केले आणि घेतलं सुद्धा, अशा प्रकारे ते पदवीधर झाले. हैदराबाद मधल्या उस्मानिया विद्यापीठातून ते कायद्याची  परीक्षा उत्तीर्ण झाले. पण शंकररावांच्या काळातलं कॉलेज हे वेगळ्या प्रकारचं होतं.

ते शिकत असताना परभणी जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या माधवराव पाटील यांची कन्या  कुसुम यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. शंकराव आणि लग्नानंतर काही काळ हैदराबाद मध्ये बिऱ्हाड  केलं होतं, कारण त्यांचे शिक्षण चालू होतं. मात्र त्यांची खूपच हलाखीची परिस्थिती होती त्यामुळे नंतर  त्यांनी नांदेडला बिऱ्हाड हलवण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या पुत्राने अशोकराव चव्हाण यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे.

शंकराव चव्हाण यांनी हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली, त्यावेळची त्यांची परिस्थिती खरोखरच बिकट होती. शंकरराव हा माणूस पहिल्यापासूनच अत्यंत कष्ट सोसणारा आणि आपल्या कामावर विलक्षण निष्ठा असणारा असा नेता होता.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर ते काम करीत असायचे. स्वामी यांनी त्यांना हैदराबाद स्टेट च्या काँग्रेसच्या सचिवपदी नेमलं. या माणसाने चळवळीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं.

१९४९ साली शंकरराव नांदेड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पद देण्यात आलं आणि १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हदगाव या विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. पण पुढच्याच वर्षी म्हणजे १९५३ मध्ये नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले आणि त्यांना नगराचं अध्यक्षपद मिळालं.

पण त्या काळात आपल्या सासऱ्यांनी घेऊन दिलेल्या सायकल वरून नगरपालिकेत जाणारा असा हा अध्यक्ष होता.

नगराध्यक्ष असताना पोलिसांनी त्यांची सायकल अडवली, दिवा नसल्यामुळे त्यांनी दंड देखील भरला होता.

आता नगराध्यक्ष, महापौर सोडा नगर वा महानगरपालिकेच्या जवळपास प्रत्येक नगरसेवकाकडे दोन-दोन, तीन-तीन चारचाकी वाहन असतात हा भाग वेगळा. अर्थात ती कशी मिळवली जातात हा एक लाख मोलाचा प्रश्न आहे पण त्या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.

असो, सुरुवातीपासूनच भ्रष्टाचारापासून लांब सणारा नेता अशी त्यांची प्रतिमा बदलली आणि ती अखेरपर्यंत कायम राहिली.

१९५६ मध्ये खुद्द थोरल्या चव्हाण साहेबांनी म्हणजे यशवंतरावांनी द्विभाषिक मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना महसूल खात्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमलं होतं. १९५७ च्या निवडणुकीत शंकरराव धर्माबाद या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाटबंधारे आणि वीज खात्याचा कारभार दिला.

१९६२ मध्ये धर्माबाद आणि १९६७ मध्ये भोकर मतदारसंघातून त्यांची विधानसभेवर निवड झाली.  पुन्हा १९७२ च्या निवडणुकीत ते भोकर याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. ते मंत्रिमंडळात जवळजवळ कायमच होते.

शंकरराव चव्हाण याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जवळपास  २० खात्यांचा कारभार सांभाळला होता.

त्यामुळे १९७५ मध्ये वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच शंकराव चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आलं.

१९७५ ते १९७७ अशा ‘आणीबाणीच्या’ काळात त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं. ते काटेकोरपणे कामाचं स्वरूप समजावून घेत आणि नियमात बसेल तेवढेच काम ते करीत. पण त्यांचा एकदा घेतलेला निर्णय मात्र कायम असे.

एखाद्या शाळा प्रमुखप्रमाणे हेडमास्तरांसारखी त्यांनी मंत्रालयामध्ये शिस्त निर्माण केली.

उगाचच कामाचे गठ्ठेच्या-गठ्ठे बंगल्यावर घेऊन जाऊन काम करण्याची पद्धत त्यांनी बंद केली. हा माणूस वक्तशीरपणा साठी प्रसिद्ध होता. स्वतः ते सकाळी नऊ-साडेनऊ वाजता कार्यालयात येऊन कधीकधी गेट जवळ थांबत आणि उशिरा येणारे अधिकाऱ्यांना समज देत. त्यामुळे त्यांना सारे हेडमास्तर असंच म्हणायचे.  काहींना त्यांच्या या गोष्टीचा राग यायचा पण त्यामुळे मंत्रालयात शिस्त निर्माण करण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागतं.

त्यांच्या शेतकरी कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे त्यांनी पंधरा-सोळा परिषद पाटबंधारे खात्याचा कार्यभार सांभाळला आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पण खूप प्रयत्न केले.

कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाची कडक अंमलबजावणी, आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी सावकाराच्या जोखडातून काढून त्यांना परत करणे, “भिकारी हटाव मोहीम” म्हणजे भीक मागण्याची प्रथा बंद करण्यासाठी योजना करणे, अंमली पदार्थांच्या वापरावर बंदी,  गरिबांना शासकीय योजनेतून घर देणं, मराठवाडा ग्रामीण बँकेची स्थापना, रोजगार हमी योजनेचा विस्तार रेल्वेचा रुंदीकरणाला प्राधान्य, जवाहर रोजगार योजनेची अंमलबजावणी करणे असे अगणित कामे त्यांनी केलं आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.