रामदेव बाबा सुद्धा ज्यांचं नाव ब्रँड म्हणून वापरतात असे ‘पतंजली मुनी’ नेमके कोण होते?

आज आपण जी योगधारणा करतो योगविद्या शिकतो याची नियमावली पतंजली या ऋषींनी घालून दिलेली आहे या पतंजली मुनींची एक पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे,

ती अशी कि,भगवान विष्णू शेषशयेवर अनंतासनात पहुडले होते,त्यावेळी शंकराने तांडव नृत्य सुरु केले. त्यांनी शंकराला तांडव करताना पहिले.ते पाहून विष्णूंना खूप आनंद झाला ,त्यांचा आंनद देहात मावेना झाला,त्यांनी आपल्या देहाचा आकार विशाल करायला सुरवात केली. ते इतके जड  होत गेले कि त्यांचा आकार शेषाला सुद्धा सहन होईना, मग काय लक्ष्मी घाबरली तीन विष्णूना  झोपेतून उठवले. विष्णू झोपेतून उठले त्यांच्या देहाचा आकार मूळ रूपात आला.

शेषाने विष्णूंना विचारल,

“आज काय माझी परीक्षा पाहण्याचे ठरवले होते काय ?”

त्यावर विष्णू बोलले.

“तस  नाही रे ,तांडव हि सर्वश्रेष्ठ नृत्य कला आहे. मी खरच तल्लीन झालो होतो .तू एक काम कर पृथ्वीवर अवतार घे, मग तुला पण पाहता येईल तांडव नृत्य “

शेष तयार झाला,पण अवतार घ्यायचा कुठ हा प्रश्न त्याला पडला.

तेवढयात त्याला उत्तर भारतातल्या मगध राज्यात गोंडवन प्रदेशात गोदर्न नावाचे छोटेसे गाव दिसले तीथे गोणिका नावाची स्त्री पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या करताना दिसली.मग काय तीन ओंजळीत पाणी धरल कि तिच्या हातात बालक तिला दिसले.ती खुश झाली परमेश्वराने आपल्याला पुत्र दिला म्हणून तिचा आनंद गगनात मावेना झाला, तिने त्याला नाव दिले पतंजली(ओंजळीतून पडलेला).

Patanjali

पतंजली ने आपल्या बुद्धीने तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून घेतले शिवाने त्यांना तांडव नृत्य दाखवले. त्यानंतर शंकराने त्याला आदेश दिला.

“बाळ, तू व्याकरणावर भाष्य कर”

पतंजली ने आदेश मानत व्याकरणावर भाष्य लिहिले त्यातून त्यांना “भाष्यकार” अशी ओळख मिळाली. आता त्यांची ख्याती इतकी दूर पसरली कि हजारो लोक त्यांना ऐकायला दूर प्रदेशातून  येऊ लागले,

त्यांनी मग ज्ञान देण्याचा सपाटाच लावला,त्यानी एक पांढरा पडदा लावला होता ते आतून ज्ञान देत असत,आत डोकवायची परवानगी कोणाला नव्हती. पण एका उतावीळ शिष्याने  उघडलाच पडदा मग काय?? आत पतंजली  शेष नागाच्या रूपात शिकवत बसले होते. त्यांचं तेज इतका होत कि शिष्य पळून गेले परंतु, त्यातला एकजण वाचला.

पतंजली त्याला सांगितले

“हे ज्ञान तू लायक आणि संयमी विद्यार्थ्यांना शिकव.”

इथून पुढे पतंजली ने ग्रंथ निर्मिती चे काम हाती घेतले “योगसूत्रे” हा ग्रंथ लिहिला.पतंजली ने भारतभर भ्रमण करून योगविदया,आयुर्वेद,व्याकरण याचा प्रसार केला.

पतंजलींचा काळ पहिला तर शेवटचा मौर्य सम्राट  बृह्दरथाची हत्या करून शुंग वंशाची स्थापना करणाऱ्या पुष्यमित्र शुंगाचे समकालीन असावेत असे इतिहासकार सांगतात. पुढे पुष्यमित्राचा अश्वमेध यज्ञ सुद्धा पतंजली ऋषीं ने केला ,पाणिनी चे शिष्य म्हणून हि पतंजलि ऋषी ओळखले जातात.

पातंजल-महाभाष्य-चरकप्रतिसंस्कृतै:।

मनोवाक्कायदोषाणां हन्त्रेऽहिपतये नम:।।

याचा अर्थ असा कि,योगसूत्रे,महाभाष्य,चरक संहितेचे प्रति संस्करण या तीन कृतीने मन,वाणी,शरीर यातील दोषांचे  निराकार करणाऱ्या पतंजली ला नमस्कार करून भिडुनो,कमीत कमी आज योग दिना निमित्त तरी योगासने  करा.

हे ही  वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.