तो भारताचा पहिला बॉडीबिल्डर होता.

उंची चार फुट अकरा इंच. जन्म १७ मार्च १९१२. गाव पुटिया. तत्कालिन बंगाल आणि सध्याचा बांग्लादेश. ५ जून २०१६ साली ते १०४ वर्षांचे होते पण त्याच सोबत एक गोष्ट देखील होती. ते म्हातारे नव्हते. फोटोत जो माणूस दिसतोय त्याला म्हातारा म्हणायचं धाडस आम्ही तर करणार नाही.

आत्ता या माणसाची दूसरी गोष्ट म्हणजे हा माणूस भारताचा पहिला मिस्टर युनिव्हर्स होता. चार फुट अकरा इंचाचा मनोहर आइच आणि त्याची पहिला बॉडीबिल्डर बनण्याची हि कथा.

मनोहर इचान सांगायचा त्यानं लहानपणी पैलवान पाहिले होते. त्यानं त्यांची बॉडी पाहिली. कुस्ती खेळायची नाही पण बॉडी करायची अस त्या काळातलं अजब तर्कट त्यानं मांडल. झालं रोजगारावर जाणाऱ्या आई बापाच्या पोराला बॉडी बनवण्याचा छंद लागला. पण कमी पैशाच्या जोरावर त्याचा हा शौक टिकणं अवघड होतं.

त्यानं चांगली बॉडी केली पण अशा काळात त्याच्या वडिलांच्या आजारामुळे घराची संपुर्ण जबाबदारी त्याच्यावर आली. त्यानंतर तो गावोगावच्या जत्रेत जावून त्यानं आपल्या बॉडीचा खेळ करण्यास सुरवात केली त्यातून मिळालेले चार पैसे तो बॉडी बनवण्यासाठी घालवू लागला.

बॉडीमुळे सैन्यात प्रवेश.

मनोहर इचान त्याच्या बॉडीमुळे सैन्यात भरती झाला. ब्रिटीश रॉयल एअरफोर्स मध्ये फिजीकल ट्रेनर म्हणून त्याची भरती करण्यात आली. सैन्यात भरती झाल्यानंतर त्याला भेटले ते रयूब मार्टिन. रयुब मार्टिन यांनी अशी बॉडी असणारा ट्रेनर आजपर्यन्त पाहिला नव्हता. त्यांनी मनोहरला पाहताच त्याला बॉडीबिल्डींगचे पुढे धडे गिरवण्यास सांगितलं. मनोहर याच पुढचं प्रॅक्टिस याच ब्रिटीश अधिकाऱ्याच्या सल्याने होवू लागलं.

१९४२ साल होतं. या वर्षी छोडो भारत आंदोलनाने जोर घेतला. सैन्यात देखील स्वातंत्र आंदोलनाच वार वाहू लागलं होतं. ब्रिटीश अधिकारी आणि मनोहर याचं या काळात वाजलं. वाजल देखील अस की बॉडीबिल्डर असणाऱ्या मनोहर याने त्या ब्रिटीश अधिकाऱ्याला चांगलच तुडवलं.

सैनिकापासून ते कैदी.

आत्ता मनोहरचा मुक्काम कारागृह होता. ब्रिटीश अधिकाऱ्याला मारल्याची शिक्षा म्हणून त्यांना अटक करण्यात आलं होत. पण तिथल्या जेलरने त्यांची बॉडी बघून त्यांची खास सोय केली. व्यायाम करणं, खाण पिणं करणं आणि तिथल्या कैद्यांना बॉडीबिल्डींगच प्रशिक्षण देण्याच काम मनोहर करू लागला.

जेलमधून बाहेर पडताच मनोहर इचान यांनी स्वत:ची जीम खोलली. स्वत: देखील त्यातचं तयारी करु लागले. आणि तो क्षण आला.

मिस्टर हर्क्युलस.

साल होतं १९५०. मनोहर इचान यांनी आपलं पहिलं आतराष्ट्रीय पदक जिंकल ती स्पर्धा होती मिस्टर हॅर्क्युलस. या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर त्यांना पॉकेट हर्क्युलस हे टोपन नाव पडलं. त्याच वर्षीच्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. यात त्यांचा दूसरा नंबर आला. ते मिस्टर युनिव्हर्स होवू शकले नाहीत.

आत्ता भारतात परत येणं आणि पुन्हा तयार करणं अशक्य होतं म्हणून त्यांनी लंडनमध्येच थांबून स्पर्धेची तयारी करायचं ठरवलं. एक वर्ष दिवसभर कंडक्टरचं काम करणं आणि उरलेल्या वेळेत सराव करणं हा त्यांचा दिनक्रम चालू झाला.

मिस्टर युनिव्हर्स.

पुढच्या वर्षाच्या म्हणजेच १९५१ सालच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. ४ फुट ११ इंच उंची असणाऱ्या या माणसाची बॉडी पाहून भलेभले आवाक झाले. हि स्पर्धा मनोहर यांनी जिंकली. ते भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स झाले.

वयाची १०४ वर्ष  झाली होती. ५ जून २०१६ साली त्यांच कोलकत्ता येथे निधन झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.