व्हिलन बनायला आलेल्या सुनीलने कॉमेडियन बनून टॉलिवूडचं मार्केट खाल्लय..

साऊथ सिनेमा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला विषय. काही दिवसांनी बॉलिवुड टॉलिवूडमध्ये विलीन होतं की काय असं एकूण चित्र दिसू लागलेलं आहे. इतकी भयानक क्रेझ साउथच्या सिनेमांची दिसत आहे. बरं यात भारी भारी हिरो आपल्या लक्षात राहिले हेही मान्य आहे पण आजचा विषय अशा एका साऊथ अभिनेत्याचा आहे ज्याला कॉमेडियन म्हणून सुरवातीला हलक्यात घेण्यात आलं पण नंतर पुष्पा या बहुचर्चित सिनेमात तो जबऱ्या भूमिका साकारून मार्केट काबीज करतोय. हा अभिनेता आहे सुनील.

खरंतर सुनीलला आपण ओळखतो ते म्हणजे मेरी जंग वन मॅन आर्मी म्हणजे मास या सिनेमात त्याने साकारलेल्या आदी या पात्रावरून. नागार्जुन आणि त्याची जोडी चांगली जमलेली याच सिनेमात.

सुनील वर्मा हे त्याचं पूर्ण नाव. 28 फेब्रुवारी 1974 रोजी सुनीलचा जन्म झाला. साऊथमध्ये त्याला जास्तीत जास्त कॉमेडी रोलच त्याला मिळत गेले.खरंतर सुनीलच्या कॉमेडीला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आणि त्याच रोलमध्ये लोकं त्याला पाहू लागले. नंतर एकच इमेज कायम नको म्हणून सुनील लीड हिरो म्हणूनही कामन करू लागला. 170 पेक्षा जास्त सिनेमात सुनीलने काम केलेले आहे.

केवळ अभिनेताच नाही तर व्हॉइस आर्टिस्ट, प्रोड्युसर आणि व्यावसायिक म्हणून सुद्धा सुनील वर्मा गाजलेला आहे. सुनील अगदी लहान असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं पण त्याच्या आईने मोठ्या कष्टाने त्याला वाढवलं. सुनील वर्मा चिरंजीवीचा खूप मोठा फॅन होता. चिरंजीवीकडे बघत बघत सुनील वर्मा डान्स शिकला पण एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं जर तुला हेच करायचं असेल तर मग तू फाईन आर्टस् कडे जा कशाला उगाच बी कॉमच्या नादी लागतो.

सुनील फाईन आर्ट्समध्ये ग्रॅज्युएट झाला आणि त्याचा डान्ससुद्धा चांगला होत गेला. लोकल कॉम्पिटिशनला तो गेला की स्पर्धा जिंकूनच माघारी यायचा. थेटरमध्ये करिअर करून पाहू म्हणून तो गेला पण तिथेही त्याला चेहरा हिरोचा नसल्याने लीड रोल काय मिळालेच नाही. 1995 साली सगळं सोडून सुनीलने तेलगू सिनेमात काम।करायचं ठरवलं. सुरवातीच्या तीन चार सिनेमात सुनील बॅकग्राऊंड डान्सर म्हणून वावरू लागला.

डान्स क्लास जॉईन केला , छोटे रोल केले पण सुनील वर्माचं समाधान होत नव्हतं. काहीतरी जबऱ्या करायचा त्याचा मूड होता. नंतर पवन कल्याणच्या सिनेमात काम मिळालं पण तेही छोटच होतं आणी त्याला क्रेडीटही दिलं गेलं नाही. 1999 साली सेकंद हॅन्ड नावाचा सिनेमा सुनीलला मिळाला पण तो काही दिवसांनी बंद पडला. स्वयंवर आणि प्रेमकथा हे दोन सिनेमे सुनीलला फेमस करून गेले.

नाय हिरो पण मग सुनील व्हिलनचे कामं शोधायला लागला. नुववे कवाली या सिनेमात त्याला कॉमिक रोल मिळाला. दीड लाखात हा सिनेमा बनला आणि 24 करोडचा या सिनेमानं धंदा केला. सुनीलला हा सिनेमा बरंच काही देऊन गेला. मात्र या सिनेमानंतर सगळे रोल कॉमेडी त्याला ऑफर होऊ लागले. 2002 साली तब्बल 18 सिनेमात तो होता. नंतर हळूहळू भरपूर सिनेमे मिळत गेले आणि एके दिवशी चिरंजीवी सोबत काम करायला सुद्धा मिळालं.

2004 साली आर्या आणि मेरी जंग वन मॅन आर्मी हे सिनेमे जगभर गाजले आणि सुनील वर्माही गाजला. अजूनही हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहेत.

आज घडीला सुनील वर्मा साऊथचा कॉमेडी किंग म्हणून फेमस आहे. भारतभर त्याचे फॅन्स आहेत. आता सुनील वर्मा पुष्पा सिनेमाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये व्हिलन साकारतोय आणि लोकांमध्ये भरपूर उत्सुकता आहे की सुनील यात काय जादू करतोय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.