हे आठ पिक्चर आले आणि बाबूजी संस्कारक्षम पोरींचे पिताश्री झाले !

सासरा असावा तर आलोक नाथसारखा. उत्तम संस्कारी मुलगी तुमची पत्नी म्हणून घरी येणार याची शंभर टक्के गॅरेंटी. भाग्यश्री पटवर्धन, करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय, महिमा चौधरी, काजोल, अमृता राव अशा कित्येक नट्यांना संस्कारक्षम मुली बनवण्यात बाबूजींचा हातखंडा.

पण एक दिवशी माशी शिंकली. बापूजी #मीटूचा शिकार झाले. त्यानंतर बाबूजी दारू पिवून छळ करायचे, राडा घालायचे, सहकाऱ्यांच्या विरोधात सापळा रचायचे असल्या कहाण्या ट्विटरवर जाहिर होवू लागल्या. च्या गावात आणि बाराच्या भावात. बापूजी तर मुंबईचा राडा करणारा आलोकनाथ निघाले.

दुख:दुख:दुख: त्रिवार दुख: झालं. आत्ता करायचं काय असाही प्रश्न पडला. बापाकडे बघून लग्न करणाऱ्या मुलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तुम्हाला जसे अनेक प्रश्न पडले तसेच आम्हाला देखील पडले की या आलोकनाथच करायचं काय.

मग गाढ विचाराअंती आम्ही या निष्कर्षाला पोहचलो की, या माणसाला संस्कारक्षम बाबूजी कोणत्या सिनेमामुळं म्हणलं गेलं ते शोधून काढावं. मग लागलो कामाला आणि आमच्या हातात हे निवडक सिनेमे घावले.

आधी हि लिस्ट बघा आणि मग ठरवा, मग पुढचं बोलू…

१.मैने प्यार किया. 

सलमान खानचा हा पहिला सुपरहिट पिक्चर. यात भाग्यश्री रातोरात हिट झाली. भाग्यश्री गरिबाघरची पोरगी. पण संस्कारक्षम पोरगी. ती आपल्या वडल्यांच्या मित्राच्या घरी काही दिवस रहायला जाते तिथे ती सल्लूच्या प्रेमात पडते. प्रेम जरी केलं तरी जपून हा संस्कार पेरायला कारणीभूत होते बाबूजी.

२.हम आपके है कौन. 

प्लर्ट कर आलोकनाथ सारखं. समोरासमोर बसलेलं आणि हळुच गाण्यातून बोल्लेलं.. आलोकनाथ पहिल्यांदा प्लर्ट करताना दिसले. ते हम आपके हैं कोन मधून. तरी देखील ते संस्कारांचे पुतळे होते. इथे हिरोंच्या काकाचा रोल त्यांनी केलेला. पण रेणुका शहाणे या सुनेला त्यांनी आपल्या पोरीसारखं संभाळलं. असो तर हा सिनेमा देखील त्यांना बाबूजी करुन गेला.

३.जीत.  

प्रा. सिद्धांत शर्मा. काय नाव शोधलं होतं. एकतर प्रा. हि पदवी आणि नाव सिद्धांत आणि आडनाव शर्मा. मग खटिया सरकायलो करणारी मुलगी करिश्मा कपूर देखील असली तरी तिला संस्काराचा पुतळा करु शकतो माणूस. नावाच्या जडपणातून सुरू झालेला हा सिनेमा कित्येकांना नविन ओळख करुन देणारा ठरला असला तरी आपल्या आलोकनाथजींच्या बाबूजी पणावर शिक्का मारणारा होता.

४. परदेस. 

 महिमा चौधरीचा बाप. सॉरी वडिल. शाहरूख खानचा, अमरिश पुरी आणि तो मालिकेवाला हिरो अशा तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमातून बाबूजी पुन्हा इंडियातले संस्कारी माणूस झालेले.

५.हम साथ साथ है. 

एकत्रित कुटूंब पद्धती. तीन मुलं एक मुलगी. त्यात मुहनीश बहलचा एक हात नेहमी खिश्यात. एक लडका औंर लडकी कभीं दोस्त नहीं हों सकते अस म्हणणारा मोहनीश बहल या सिनेमात चक्क ये तो सच हैं की भगवान हैं, धरती पें रुप मा बाप का वगैरे म्हणू लागला. या सिनेमात बाबूजींनी संस्कारक्षमतेचा गड चढला अस म्हणता येईल.

६.ताल.  

ऐश्वर्या राय बच्चन याचे पिता. संगीत गुरूजी. भोळेभाबडे दुनियादारी न समजणारे गुरूजी. ऐश्वर्या सारख्या देखण्या अभिनेत्रीचा बाप. बस की अजून काय कौतुक करायचं या सिनेमाचं.

७.कभी खुशी कभी गम. 

कदाचित बाबूजी गचकलेला हा पहिला सिनेमा असावा. काजोलचे वडिल जातात आणि शाहरूख काजोल सोबत लग्न करतो. मग सगळा पिक्चर बच्चनचा. त्यामुळ बाबूजींचा रोल कमी होता. पण त्यांच्यामुळ कथा फिरते. शाहरूख सारखा बड्या बापाचा पोरगा घरदार सोडून काजोल सोबत जातो कारण एकच, संस्कार…

८.विवाह. 

लय दिवसांनी पाण्याला “जल” म्हणणारे बाबूजी दिसेल आणि अस वाटलं की साला जलसमाधी घ्यावी. सुरज बडजात्यानं हितं त्यांना अमृता रावच्या बापाच्या रोलमध्ये सर्वांच्या समोर आणलं होतं. तर जावायबापू होते शाहिद कपूर.

हा तर मग आत्ता, आत्ता काय ट्विटरच बाबूजींना बघून घेईल.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.