लहान असताना कळलेला पहिला ब्रँड अल्पेन्लीबे ..लालच आह लपलप

लहानपणी घरी कोणी पाहुन्यांनी हातावर एक रुपया ठेवला की ठरलेला विधी असायचा. लागलीच जायचं तात्याच्या टपरीवर. जी जास्त येतील तीच द्या हे ठरलेलं गणित. त्यामुळं एक रुपयाला ४ येणारी ”पार्ले किसमी” हा आपला ठरलेला ब्रँड. मग एक दिवशी तात्यांनी पार्लेचं चॉकलेट संपलंय म्हणून वेगळीच गोळी हातात ठेवलं. आता रुपयाला दोन म्हटल्यावर थोडा हिरमुसलो होतोच पण मग पॅकिंग चांगलं आहे म्हणून म्हटलं बघू नवीन ट्राय करू.

 ते एवढं भारी निघालं की “तात्या आता एक रुपयाची दोन पार्ले आणि एक अल्पेन्लीबे द्या” हे नवीन इक्वेशन फिक्स झालं

कॅरॅमल फ्लेवर नक्की काय असतंय हे अल्पेन्लीबे खाऊनच कळलं होतं.म्हणजे फ्लेवर पहिल्यांदा कळला आणि मग त्याचं नाव. पुढे टीव्हीवर जाहिरात आल्यावर अल्पेन्लीबे हे नाव कळलं हा विषय वेगळा. आता बाजारात ही चॉकलेटं मिळणं थोडं वघड झालंय. त्यामुळं बघावं म्हटली याची कंपनी तरी कुठली होती. 

मग कळलं Perfetti Van Melle जी कॅण्डी आणि चुईंग गमची इटालियन-डच बहुराष्ट्रीय कंपनी आहे ती ही चॉकलेटं बनवती.  

ती २००१ मध्ये इटलीची Perfetti आणि नेदरलँडची Van Melle यांच्या विलीनीकरणाने स्थापन झाली होती. मात्र भारतीय बाजरात ही कंपनी विलनीकरण्याच्या आधीच उतरली होती. मात्र भारतात ती विलनकरणाच्या आधीच उतरली होती. १९९४ मध्ये सेंटर फ्रेश बँड ऑफर करून भारतीय बाजारपेठेत एंट्री केला. 

त्यानंतर १९९५ मध्ये बिग बबुल आणि अल्पेनलीबे यांनी आणलं. 

आता हे तिन्ही ब्रँड किती पॉप्युलर होती हे सांगायला नको. ह्या चॉकलेटच्या ब्रँड बिल्ड होण्यामधी या चॉकलेटच्या युनिक चवींबरोबर त्यांची जाहिरात सगळ्यात जमेची बाजू होती. या चॉकलेटची मस्त गोड आणि थोडी आंबट अशी खट्याळ चव असणाऱ्या या कंपनीनं तशीच खट्याळ ऍक्टिंग करणाऱ्या काजोलला बरोबर आपला ब्रँड ऍम्बॅसॅडर केलं होतं.

तो समझो भक्तो आदमी हो या बंदर लालच एक शाश्वत सत्य है असं म्हणणारी ती काजोलची जाहिरात जोरात चालली आणि त्याच बरोबर ब्रँड ही फोफावला.

 

 

बाकी सेंटर फ्रेश आणि बिग बबूलचं मार्केटिंग ही कंपनीनं अश्याच हटके पद्धतीनं केलं. जेव्हा अल्पेन्लीबे त्यांची क्रेमफिल ही नवीन कँडी बाजारात आणली तेव्हा वरतून कॅरॅमल कव्हरिंग आणि आतून क्रिमी लिक्विड हे कॉम्बिनेशन जोरात चाललं. आणि हे चॉकलेटपण त्यांनी एक वेगळीच जाहिरात काढून लाँच केलेलं.  एका हटके म्युझिकवर नाचणारे ते सिंह भारतीयांनी पहिल्यांदाच पहिले असतील.

कैसा लगा सरप्राइझ कुछ अलग अचानक म्हणत अल्पेन्लीबेने ही पण टॉफी चालून दाखवली.

 

 

भारतासारख्या कंपेटीटीव्ह मार्केटमध्ये तग धरून राहण्यासाठी अल्पेन्लीबे नेहमीच काही ना काही नवीन देत राहिले. मग ते चॉकलेट वर फ्री मिळणारे ‘टॅटू’ असू दे की डोरेमॉनचे कार्ड अश्या नवनवीन स्ट्रॅटेजि काढून अल्पेन्लीबे नेहमीच त्यांचा प्रमुख ग्राहकाला म्हणजेच लहान मुलांना आकर्षित करत राहिली. आज भारतात येऊन या ब्रँड ला २५ वर्षे झालेत. बाकी तुमची अल्पेन्लीबेची एकादी आठवण असेल तर खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.