TCS, INFOSYS सारख्या IT कंपन्या फायद्यात आहेत तरी लोकं या कंपन्या का सोडून चाललेत?
करोनाच्या काळात सगळ्यांचेच वांदे झाले होते. तरी WFH करणारे सॉफ्टवेअरवाले मात्र यात कसेतरी तग धरून होते. हळू हळू त्यांना पण घरातून काम करायची सवय पडली होती. अनेकांनी तर कायमचाच वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन मिळावं म्ह्णून साकडं घातलं होतं.
करोनाच्या लॉकडाऊनमध्ये पुर्ण जग ठप्प असताना IT कर्मचाऱ्यांनी काम केलं हे ही तितकंच खरं आहे.
याचा फायदा IT कंपन्यांनापण मोठ्या प्रमाणात झाला हे मान्य करावाच लागेल. करोना काळात IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवला होता हे हि दिसून येत आहे.आता २०२१-२०२२च्या चौथ्या तिमाहीचे आकडे जाहीर होता आहेत तेव्हा या कंपन्यांनी करोडोंचा प्रॉफिट केल्याचं समोर येत आहे.
TCS ने पहिल्यांदाच ५०००० करोडचा महसुलाचा आकडा पार केला होता आणि त्यामध्ये प्रॉफिट ९००० करोडपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं. INFOSYS ने सुद्धा ५६५८ करोडचा नफ्याची घोषणा केलीय.
मात्र यावेळी एक हाही विरोधाभास आहे तो म्हणजे या सॉफ्टवेअर कंपन्यांमधून जॉब सोडून जाणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. गेल्या २० वर्षातील सर्वाधिक कर्मचारी गळती सध्या होत आहे. Aon संस्थेने एक सर्वे केला होता. त्यानुसार २०२० मध्ये १२.८% असलेली गळती २०२१ मध्ये २१% इतकी झाली आहे.
या कर्मचारी गळतीमुळे या कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीमध्ये ३५००० नव्या कर्मचाऱ्यांची भारतीदेखील केली होती.
यातही सर्वाधिक नवीन भरती TCS, Infosys, Cognizant आणि HCL या कंपन्यांमध्ये झाली आहे.
आता हे कर्मचारी गळतीचं प्रमाण मोजतात कसं तर ऍट्रिशन रेट (ATTRITION RATE) वरून. डिसेंबर २०२१मध्ये TCS चा ऍट्रिशन रेट होता १५.३%. तर WIPRO आणि INFOSYS चा अनुक्रमे २२.७% आणि २५.५%. आणि मार्च २०२२ मध्ये TCSचा ऍट्रिशन रेट होता १७.४%. INFOSYS मध्ये तर हे प्रमाण २७.७% वॉर गेली.
थोडक्यात काय तर कंपनीतला चौघातला एक नोकरी सोडून जात आहे.
त्यामुळं बघावं म्हटलं कधीकाळी अगदी सरकारी जॉबशी कंपेयर केल्या जाणाऱ्या या सॉफ्टवेअर जॉब्स ना गळती का लागली आहे.
तर याचं पाहिलं कारण सापडतं IT जॉब्सना आलेल्या डिमांडमुळं.
करोना काळात डिजिटायझेशनची लाटाच आली. IT सर्विसेसची डिमांड करोना काळात शिखरावर होती. त्यामुळं सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना जोरदार डिमांड आली. नवखे असो की ५-६ वर्षांचा अनुभव असणारे सगळ्यांनाच संधी अक्षरशः वाहतायेत.
यासोबतच कंपनी सोडून जाऊ नये म्ह्णून पॅकेज पण वाढवून दिली जात आहेत. तर दुसऱ्या कंपन्या त्याहूनही जास्त ऑफर द्यायला तयार आहेत. आणि यामुळंच कर्मचारी जुनी कंपनी सोडून नव्या कंपनीचा रस्ता धरतायेत.
त्याचबरोबर नवीन टेक स्टार्टअप पण सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देत आहेत.
त्याचबरोबर स्टार्टअपमध्ये पॅकेज बरोबर नव्या गोष्टी शिकण्यास मिळत असल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा स्टार्टअपकडे ओढा आहे.
TECHGIG ने एक सर्व्हे केला होता त्यानुसार इन्क्रिमेंट रेट जो २०१९ मध्ये ९.५५ होता तो २०२०-२१ मध्ये ५.२% झाला.
त्यामुळं मनाप्रमाणे हाईक न भेटल्यानं देखील कर्मचारी नवीन कंपन्यांकडे वळत आहेत.
फ्रीलान्सिंगकडं पण एक मोठा वर्ग आकर्षित झाला आहे.
आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी सोडून जात असताना कंपन्या कोणते उपाय करत आहेत?
तर पहिलं म्हणजे कंपन्या फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात भरती करून घेत आहेत. त्याचवेळी पॅकेज वाढवून देऊन गळती थांबवण्याचा प्रयत्न देखील करून पाहत आहेत.
गळतीमुळे कंपन्यांना त्यांचं टॅलेंट प्लस ट्रेनिंग फी पण गमवावी लागत आहे. स्किल्ड वर्कफोर्स नसल्यामुळं प्रोजेक्ट पण लेट होत आहेत. मात्र काही एक्सपर्टस या घटनांना एक सिल्वर झालर असल्याचंही निरीक्षण नोंदवतात. वर्क फ्रॉम होमच्या काळात वर्किंग हावर्सला हरताळ फासत पार ९-१० तास काम करण्याची कंपन्यांनी सपाटा लावला होता.
तो आता वर्किंग कंडिशन्स सुधारण्याच्या नादात ताळ्यावर येइल अशी अपॆक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर वर्कप्लेसचं वातावरण पण सुधारेल. कर्मचाऱ्यांना देणाऱ्या सुविधांमध्ये देखील वाढ करण्यात येऊ शकते.
पण या सगळ्यात हद्द पार केली आहे इन्फोसिसने.
कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण इन्फोसिसमध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि यावर उपाय म्ह्णून कंपनीनं नवीन कर्मचार्यांसाठी ऑफर लेटरमध्ये, इन्फोसिसने एक नवीन क्लॉज टाकला आहे. या क्लॉजनुसार इन्फोसिसच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने राजीनामा दिला, तर पुढील 6 महिन्यांसाठी, त्यांना TCS, IBM, Cognizant, Wipro आणि Accenture साठी काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या जीवावर करोडोंचा फायदा काढणाऱ्या कंपन्या आता तरी कर्मचाऱ्यांचा विचार करणार का हे पाहण्यासारखं असणार आहे.
हे ही वाच भिडू :
- गूगलचं ऑफिसपण पुण्यात आलंय, आता महाराष्ट्र आयटी क्षेत्रात टॉप मारेल का?
- दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली.
- निकाल आला, आता टाटांची TCS पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट तीनदा विकत घेऊ शकतेय