प्राणावर बेतलं, जखमी झाले तरीही त्यांनी अमरनाथ यात्रा थांबू दिली नाही

‘जय जवान, जय किसान’ हा नारा आपण मोठ्या अभिमानाने देतो. कारण देशातल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या जवानांवर खूप अभिमान आहे, आणि का असू नये. आपल्या जिवाची बाजी लावत भारतीय सैन्य देशाच्या आणि देशाच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर तैनात असतात.

असेच एक सेवानिवृत्त सुभेदार मेजर गजे सिंह. ज्यांनी अमरनाथ यात्रा सुखरूप पार पडावी, म्हणून जखमी अवस्थेतही दहशतवाद्यांना प्रत्यूत्तर देत राहिले. ग्रेटर नोएडाच्या जारचा भागातील गुलावटी खुर्द गावाचे असणारे मेजर गजे सिंह. त्यांच्या या शौर्यामुळे गावातील प्रत्येक गावकऱ्याला त्यांंचा मोठा अभिमान आहे. 

तर नेहमीप्रमाणे 1993 साली सुद्धा मोठ्या उत्साहाने अमरनाथ यात्रेचं आयोजन होत. दरवर्षी दूरदूरवरून लाखो भाविक या भोलेनाथाच्या यात्रेला येतात.

त्या वर्षीही अशीचं यात्रा भरली होती. मात्र दहशतवाद्यांनी या यात्रेला टार्गेट केलं. अमरनाथ यात्रे दरम्यान दहशतवादी कारवायांच सत्र 1993 पासूनच सूरू झालं. यावर्षी दोन वेगवेगळ्या हल्ल्यात 3 भाविकांची हत्या झाली होती. 

या दरम्यान मेजर गजे सिंह तिथेच पोस्टींगवर होते. या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेवर संकट ओढवलं. यात्रा रद्द करण्याची मागणी होऊ लागली.

पण भारतीय सैन्याने आपली जबाबदारी सुखरूप पार पाडण्याचं ठरवलंच होतं. दहशतवाद्यांना प्रत्यूत्तर देत सैन्यान त्यांचा डाव मोडून काढला.

यावेळी मेजर गजे सिंह कारवाई दरम्यान जखमी झाले, पण आपल्या या अवस्थेतही माघारी न फिरकता त्यांनी जीव धोक्यात घालून चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.  

दरम्यान, भारतीय सैन्यात 34 वर्षे देशाची सेवा करणारे गजे सिंह 16 वर्षे जम्मू -काश्मीरमध्ये तैनात राहिले. तेथे पोस्टिंग दरम्यान त्यांनी एकूण 35 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

निवृत्त गजे सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, नोकरी दरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये त्यांची पोस्टिंग कधीही न विसरणारी होती. प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान होते. 3 जानेवारी 1989 रोजी बारामुल्लामध्ये लष्कराने एकूण 14 दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराच्या या टीममध्येही ते देखील सामील होते. दहशतवादी टेकडीवर लपून बसले होते. बारामुल्लाचे ऑपरेशन सुमारे दहा तास चालले.

गजे सिंह सांगतात की, 1991 मध्ये खनैसरमध्ये झाडांवर बसलेले दहशतवादी लष्कराच्या बसवर गोळीबार करत होते. बसमध्ये 50 पेक्षा जास्त लष्करी जवान बसले होते. प्रत्युत्तराच्या कारवाईत नऊ दहशतवादी ठार झाले.

1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान ते गुमरीमध्ये तैनात होते. सैन्याला सुरक्षितपणे पास करणे हे त्याचे कर्तव्य होते. याशिवाय 1994 मध्ये राजौरी पुंछमध्ये त्यांनी रात्री 12 वाजता आठ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, जे सेंटरवर हल्ला करण्यासाठी आले होते.  

स्वातंत्र्यानंतर मेजर गजे सिंह यांच्यासारख्या प्रत्येक जवानामूळेचं आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे या वीर जवानांना एक सॅल्यूट तर बनतोच. 

हे ही वाचंं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.