इंटरनेट बाबतच्या या अजब गोष्टी तुम्हला माहिती आहेत का ?

इंटरनेट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग झाला आहे. आज पर्यंत कधीच इंटरनेट वापरलं नाही असा माणूस आता शोधून देखील सापडणार नाही. जितक आपल्यासाठी अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी महत्वाच्या असतात तितकाच आपल्यासाठी इंटरनेट देखील आता महत्वाच झालं आहे. याच इंटरनेट मुळे भिडू तुम्ही या इंटरनेट बद्दलच्या अजब गोष्टी देखील वाचू शकत आहात.

 • जानेवारी 2018 मधील एका सर्वेक्षणानुसार ३,८१२,५६४,४५० यंत्र इंटरनेटशी जोडले गेले आहेत. यात चायनाचे स्थान एक नंबरला आहे.
 • इमेल हा प्रकार WWW पेक्षा देखील जुना आहे.
 • एकूण लोकसंख्येच्या तुलनेत स्वीडन या देशातील लोक सगळ्यात जास्त इंटरनेटचा वापर करतात.
 • सप्टेंबर १९९५ मध्ये पाहिलं डोमेन फुकट रजिस्टर झालं होत. त्याच नाव होत SYMBOLICS.COM
 • १९९९ मध्ये इंटरनेटवर सगळ्यात जास्त POKEMON सर्च झालं होत.
 • प्रत्येक महिन्यात साधारण १०,००,००० नवीन डोमेन रजिस्टर होतात. जानेवारी 2018 च्या सर्वेक्षणानुसार १ अब्ज ३० करोड वेबसाईट रजिस्टर होतात.
 • इंटरनेट वरील पहिला BROWESR “MOSAIC” होता.
 • ब्राझील मधील ECOSIA नावाचे एक सर्च इंजिन आहे जे आपल्या एकूण कमाई मधला ८०% भाग झाडे लावण्यासाठी वापरत.
 • १९९३ साली इंटरनेटवर फक्त १३० वेबसाईट होत्या.
 • हॉटवायरड, ज्याला आता वायरड.कॉम म्हणून ओळखले जाते, ही पहिली अशी वेबसाईट होती जिने बॅनर AD लावली होती.
 • प्रत्येक दिवशी पाठवण्यात येणारे जवळ जवळ ८०% मेल SPAM असतात.
 • इंटरनेट वरून खरेदी केलेली पहिली गोष्ट गांजाची एक बॅग होती.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जानेवारी १९९७ मध्ये केलेले उद्घाटन इंटरनेट वरील पहिला वेबकस्ट होता.
 • २१ ऑक्टोबर १९९४ साली व्हाईट होऊसची पहिली वेबसाईट लौंच करण्यात आली. ही वेबसाईट एका PORN वेबसाईटशी लिंक झाली होती.
 • नॉर्वे मध्ये प्रत्येक कैद्याला इंटरनेट वापरण्याची परवानगी आहे.
 • ANTHONY GRECO हा SPAM मेसेज पाठवण्याच्या आरोपावरून आटक झालेला पहिला माणूस होता.
 • गुगलवर एकादिवसात ६,५८६,०१३,५७४ वेळा गुगल सर्च होतात. यातले १५% गुगलने देखील पहिल्यांदा पाहिलेले असतात.
 • COM इंटरनेट वरील सगळ्यात महागडा विकला गेलेला डोमेन आहे.
 • भारतात सामन्य लोकांसाठी VSNL ने ऑगस्ट १९९५ साली पहिल्यांदा इंटरनेट सेवेची सुरवात केली.
 • सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गुगल कडे एकूण इंटरनेट वरील माहिती पैकी फक्त ०.००४% माहिती आहे उर्वरित सगळी माहिती DEEP WEB कडे आहे.

हे ही वाचा भिडू.    

Leave A Reply

Your email address will not be published.