अरब हुकुमशहा ज्याला चोवीस तास महिला बॉडीगार्डच्या संरक्षणाखाली रहावं लागायचं!

कर्नल मुअम्मर अबू मिया अल गद्दाफी म्हणजे आफ्रिका आणि अरब सीमेवरच्या लिबियाचा हुकुमशहा. गरीब घरात जन्मला. आपल्या अरब संस्कृतीचा त्याला अभिमान होता. देशाची सेवा करण्यासाठी त्याने शाळा निम्म्यातून सोडून सैन्यात दाखल झाला. तत्कालीन सरकार आपल्या देशाच्या धर्माच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करते आणि फक्त स्वतःच्या घराण्याच्या तिजोऱ्या भरायचं काम करते हे त्याने जनतेला पटवून दिलं. लष्करी क्रांती घडवून सत्ता ताब्यात घेतली.

सत्ता ताब्यात आल्या आल्या आपल्या सगळ्या विरोधकांना त्याने नेस्तनाबूत केले. अरब राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत तेलाच्या राजकारणामुळे होत असलेला अमेरिकन हस्तक्षेप झुगारून देणार असल्याच तो ठासून सांगायचा. आपल्या शत्रूंना वठणीवर आणायचं असेल तर अण्वस्त्रानी सुसज्ज असायला हवं हे त्याच स्पष्ट मत होतं. नावापुरती लोकशाही लिबियामध्ये आणून स्वतः तिथला कायमचा राष्ट्रप्रमुख बनला.

विस्मरणात जात असलेल्या आपल्या ऐतिहासिक संस्कृतीला त्याने परत उजाळा देण्याचे काम केले. इतिहासातून पाश्चिमात्य प्रभावाला हटवून टाकले. धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून कट्टरवाद वाढवण्याच काम त्याने केलं. धर्माचा वापर आपलं राजकारण टिकून राहण्यासाठी केला. लिबिया वर अनेक वर्ष राज्य केलेल्या इटालियन आणि ज्यू वंशीय लोकांवर त्याचा विशेष राग होता.

Amazonian Guard 768x501

तो स्वतः नेहमी लिबियाच्या पारंपारिक वेशात राहायचा. राहायलासुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्यापेक्षा अरबी तंबू त्याला आवडायचा. फक्त हा तंबू अलिशान आणि बुलेटप्रुफ होता. तो ज्या ज्या देशात जाई त्या देशात पंचतारांकित हॉटेलमध्ये हा तंबू सुद्धा सोबत असे.

सुरवातीला लिबियाला महासत्ता बनवण्याच स्वप्न दाखवणारा अवतारी पुरुष असल्याचा दावा करणारा गद्दाफी कधी देशाला विकणारा नेता बनला हे तिथल्या जनतेला कळालचं नाही.

लिबियाचे संविधान बरखास्त करून आपल्या विचारधारेचे व पसंतीचे कायदे लागू केले. लिबियाच्या अर्थव्यवस्थेवर गद्दाफी कुटुंबीयांनी संपूर्ण ताबा मिळवला. लिबियन जनतेचे आयुष्य गद्दाफीच्या कारकिर्दीत अवघड व हलाखीचे होऊन बसले. गद्दाफीने लिबियातील प्रचंड खनिज तेल साठ्यांमधून मिळणारा पैसा अण्वस्त्रे मिळवण्यासाठी वापरला व अनेक कट्टर दहशतवाद्यांना पाठिंबा दिला.

जवळपास ४२ वर्ष लिबियावर मुआमार गद्दाफीने राज्य केलं. हा ही एकप्रकारे विक्रमचं होता. पण कधी ना कधी त्याच्या अनिर्बंध सत्तेला खीळ बसणार होता. 

२०११च्या सुरुवातीस अरब जगतातील लोकशाहीवादी चळवळ अरब स्प्रिंग लिबियामध्ये दाखल झाली व बंडखोरांनी लिबियामधील गद्दाफीची सत्ता झुगारून देण्यास आरंभ केला. काही महिन्यांनी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात लपून बसलेला गद्दाफी मारला गेला.

त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विक्षिप्तपणाच्या, त्याच्या रंगेलपणाच्या कथा बाहेर आल्या ते ऐकून सार जग चाट पडलं होतं.

त्याने दोन लग्ने केली होती, त्या शिवाय त्याची अनेक रखेली होत्या. तो बऱ्याचदा शाळाकॉलेजेसना भेटी देण्यासाठी जायचा. तिथे त्याला आवडेल अशा मुलीच्या डोक्यावर हात ठेवायचा. त्या रात्रीचं त्या मुलीला गदाफ्फीच्या अंतःपुरात पाठवण्यात येई. कधी कधी त्या मुलीच वय १३-१४ वर्षाच असे. नकार देणाऱ्या मुलीना प्रचंड मोठी शिक्षा देण्यात येई. हे सगळ प्रकरण आतल्या आत दडपण्यात येई.

“इन गद्दाफीज हरम” या पुस्तकात या  घटनांच पुराव्यासकट वर्णन करण्यात आलं आहे. त्याची मुलाखती घेण्यासाठी येणाऱ्या पत्रकार महिलांनाही तो सोडत नसे.

हॉलीवूडच्या मोठमोठ्या फिल्मस्टार्सना आपल्या वैयक्तिक कार्यक्रमाच्या निम्मिताने तो लिबियामध्ये बोलावून घेई. यापैकी अनेक हिरोईनसोबत त्याने रात्र घालवली होती असे म्हणतात. पण अशा कार्यक्रमामधून आपल्या श्रीमंतीचे आणि ताकदीचे प्रदर्शन करण्याचा त्याला चंद होता. एकदा एका फॅशन शोच्या कार्यक्रमात त्याने भारतीय मॉडेल्सन बोलावून घेतले होते, यामध्ये तेव्हा अजून स्टार नसलेली कॅटरीना कैफ, नेहा धुपिया, अदिती गोवित्रीकर यांचा समावेश होता.

DEWBQmQXYAELLWC

पण सगळ्यात फेमस त्याच्या बॉडीगार्ड महिला होत्या.

पाश्चात्य पत्रकारांनी अमेझॉनीयन गार्डस असे ज्यांचे वर्णन केले आहे अशी ४० मादक महिलांची एक टीम गद्दाफीच्या रक्षणासाठी तैनात असायची. या मुलींची नियुक्ती स्वतः गद्दाफी करायचा असं म्हणतात की या सर्व मुली कुमारी असायच्या. त्यांना मिल्ट्री अकडमीमध्ये खास प्रकारचे कमांडो ट्रेनिंग दिलेलं असायचं. गदाफ्फी जिथे जिथे जाईल तिथे सावलीप्रमाणे या टीममधल्या आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज अशा १५ मुली त्याच्यासोबत असायच्या.

गदाफ्फीला महिला बॉडीगार्ड ठेवण्यामागचे कारण विचारले असता तो सांगायचा की,

“कोणताही अरब शार्पशुटर माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला तर त्याला मुलींच्यावर गोळ्या चालवायला हात थरथर कापेल.”

पण खरं सांगायचं झालं तर या महिला बॉडीगार्डसुद्धा त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठीचं होत्या. फक्त गद्दाफीचं नाही तर त्याची मुले, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांनी अनेकदा या मुलींवर बलात्कार केला असल्याचे समोर आले. हे सोडून गद्दाफीची एक आवडती नर्स देखील होती. ही सोनेरी केसांची युक्रेनियन नर्स तिला खास विमानाने ने आण केले जाई. असं म्हणतात की गद्दाफीच्या सगळ्या पर्सनल गोष्टी त्याचे सगळे सिक्रेट तिच्या जवळ होत्या.

तो मेला तेव्हा त्याची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक होती. सोन्याच्या टबमध्ये अंघोळ करणाऱ्या या स्वघोषित अवतारी पुरुषाचा अंत त्याच्याचं देशातल्या जनतेने केला.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. राहुल says

    हे वाचत असतांना असंच हसू येत होत … अजूनही गरिबीतून बाहेर आलेला, सांस्कृतिक धर्माला दुर्लक्ष केले जात आहे, विशिष्ट धर्माच ऐकता , आणि विशेष म्हणजे देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दाखवून देश विकायला सुरवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.