गांजाच नाही तर पुलवामा हल्ल्यातील स्फोटकं सुद्धा अमॅझॉनवरून मागवलेत.

भारत कधीही विसरू शकत नाही अशी एक घटना घडली होती..१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.

दहशतवाद्यांनी तब्बल २०० किलो स्फोटकांनी भरलेली एक कार जवानांच्या बसवर आदळवली होती. अन मग काय त्या बस चा मोठा स्फोट झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे एकूण ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. 

पण आत्ता हि घटना पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, पुलवामा हल्ल्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला घडवताना वापरण्यात आलेले तब्बल २०० किलो स्फोटकं अ‍ॅमेझॉनवरुन मागवण्यात आले होते, असा दावा कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं केला आहे. 

होय, अ‍ॅमेझॉनवरून अमोनियम नायट्रेडची खरेदी केल्याचा आरोप केला आहे या हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने National Investigation Agency ने आपल्या रिपोर्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती. 

याबाबत अ‍ॅमेझॉनने दहशतवाद्यांनी खरेदी केलेल्या रसायनांची सविस्तर माहिती तपास यंत्रणांना दिली होती. यानंतर अ‍ॅमेझॉनच्या मदतीनेच तपास यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉनवरुन भारतात बंदी असलेले अमोनियम नायट्रेड खरेदी केले होते.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष  बी.सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी गंभीर आरोप केलाय कि, एनआयएकडून अटक केलेल्या व्यक्तींची ज्यावेळी चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांनी ही स्फोटके तयार करण्यसाठी अ‍ॅमेझॉनवरुन आयईडी, बॅटरी आणि इतर काही सामान खरेदी केल्याचे कबूल केलेकेलं आहे.  आणखी एक म्हणजे फॉरेंसिक तपासामध्ये देखील हे स्पष्ट झाले आहे कि, या हल्ल्यासाठी बॉम्ब तयार करताना अमोनियम नायट्रेड, नायट्रोग्लिसरिन यांचा वापर करण्यात आला होता.

तसेच CAIT अशीही मागणी करत आहे कि, अ‍ॅमेझॉनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

दरम्यान, आमच्या जवानांविरोधात लढण्यासाठी दहशतवाद्यांनी प्रतिबंधित सामुग्री अमोनियम नायट्रेड ऑनलाइन माध्यमातून सहजपणे खरेदी केले. तसेच त्याचा वापर देशविरोधात केला. पुलावमा हल्ल्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याचं या तपासात समोर आलंय पण हे तर सर्वश्रुत आहे कि, अमोनियम नायट्रेटच्या खुल्या विक्रीवर भारतात निर्बंध लादले गेलेत. त्यामुळे हे पदार्थ विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉनवर आणि अ‍ॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी CAIT ने केली आहे.

अ‍ॅमेझॉनचा स्फोटके बनवणारे साहित्य विकणे हा काय पाहिलाच गुन्हा नाहीये तर अलीकडेच अ‍ॅमेझॉन ऑनलाईन गांजाची ऑनलाईन विक्री करतेय असा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. 

गांजा सारख्या अंमली पदार्थांची विक्री होणे हा काही साधारण गुन्हा नाहीये. पण सर्व या संपूर्ण प्रकरणावर आणि आरोपांवर अ‍ॅमेझॉन इंडियाची बाजू काय आहे याची वाटच पाहावी लागेल.

आता एजन्सी हे देखील तपासत आहे की हे कि, RDX कसे आणले गेले आणि पुलवामा येथे कसे आणले गेले आणि आंतरराष्ट्रीय हद्द ओलांडून सिमेंट वाहून नेणारे ट्रक कसे गेले आणि ते सुरक्षा यंत्रणेच्या नजरेत कसे आले नाही याची देखील पडताळणी केली जाणार असल्याचं सुरक्षा यंत्रणेने सांगितलं जातंय मात्र काही माहिती समोर आलीच नाही.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.