आंबा ते टिकली : संभाजी भिडेंनी आजपर्यंत १० वेळा दमदार डॉयलॉग हाणलेत

संभाजी भिडे

अख्या महाराष्ट्राला हे नाव नवीन नाही. शिवप्रतिष्ठानच्या कामामुळे हे नाव कायम चर्चेत असतं. संभाजी भिडे यांचे नाव सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी महिला पत्रकरांना दिलेला कुंकू लावण्याचा सल्ला.

भिडे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यानंतर महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले. संभाजी भिडे यांची वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाही.

संभाजी भिडे यांनी यापूर्वी केलेली १० वादग्रस्त वक्तव्य कोणते होते ते पाहूया

सप्टेंबर महिन्यात संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संभाजी भिडे यांनी लोकप्रतिनिधींवर टिका करतांना म्हटले होते,

“लोकसभेतील आणि विधानसभेतील लोकप्रतिनिधी हिंदवी स्वराज्यासाठी कलंक आहेत. तसेच सर्वधर्मसमभाव हा विचार देशावर लादणारे ‘गांडूळ’ प्रवृत्तीचे आहेत”

या वेळी त्यांनी भाजपचा अपवाद वगळता अन्य राजकीय पक्ष नेत्यांवर कडाडून टीका केली होते.

१५ ऑक्टोबर २०२१ रोजी दसऱ्या निमित्ताने सांगली येथे दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध लावले होते. त्यावर टिका करतांना संभाजी भिडे म्हणाले होते,

“मूळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत,”

संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, ‘भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला.’ मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संभाजी भिडे यांनी यांनी मोदींवर टिका केली होती.

संभाजी भिडे म्हणाले होते, 

पंतप्रधान म्हणतात भारताने जगाला बुद्ध दिला, बुद्ध अजिबात उपयोगाचा नाही.  पंतप्रधान चुकीचंच बोलले. निती-धर्म हे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी दिलं आहे. त्यामुळे विश्वाचा संसार सुखाने चालविण्यासाठी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हेच हवे आहेत.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना संभाजी भिडे म्हणाले होते,

आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्त्वात नाहीत. पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रुपाने औरंगजेब अजूनही अस्तित्त्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहे

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप (वाजेवाडी) आणि मांडवगण फराटा परिसरातील निर्वि येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना संभाजी भिडे यांनी तिरंग्या संदर्भात वक्त्यव केलं होत.

काय आमचा तिरंगा झेंड्याशी संबंध, कुठला तिरंगा झेंडा? भगवा झेंडा टाकून हा तिरंगा झेंडा कोणी केला? कोण होता तो हरामखोर.?

असं वादग्रस्त वक्त्यव्य संभाजी भिडे यांनी केलं होत.

मनुने जगातील पहिली घटना लिहली होती. मनुस्मृती म्हणजे मानववंश शास्त्र आहे. मनुच्या सावलीलाही उभे राहण्याची आपली लायकी नाही. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे केवळ नालायकपणा असल्याचे सांगत धर्मनिरपेक्षता हे केवळ थोतांड असल्याचे खळबळजनक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होत.

मार्च २०२२ मध्ये संभाजी भिडे अमरावतीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान करतांना म्हटले होते की,

जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर ……खोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’,

या वक्त्यावानंतर भिडे यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती.

एका कार्यक्रमात बोलतांना संभाजी भिडे यांनी महिला संदर्भात वादग्रस्त वक्त्यव्य केले होते,

जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंचं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे’,

वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समधीस्थळी बलिदानमास निमित्ताने दर्शन घेण्यासाठी संभाजी भिडे आले त्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर टिका केली होती.

समाजात काहींना खान्यापिण्यात कमी जास्त झाल्यास अनेकांना विषबाधा होते. ही विषबाधा, भूतबाधा याच्यावरती उपाय आहे. मात्र, हिंदुस्तानला तीन बाधा झाल्या आहेत.

एक म्लेंछ बाधा, एक आंग्ल बाधा आणि एक गांधी बाधा. या तीनही बाधांवरचा तोगडा कोणचा असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज आहेत

नाशिक मधील एका कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कडे असलेल्या आंब्या बद्दल सांगितलं होते.

ते म्हणाले होते.

 आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन ८-८ वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल.

मी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.”

तुम्हाला संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.