फक्त भारतातच नाही तर जपान कोरियामध्ये देखील मोजक्या कंपन्या अर्थव्यवस्थेवर राज्य करतात..

काही दिवसांपूर्वी भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यन यांनी अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी अंबानी आणि अदानी यांचं उदाहरण देत यांच्या वाढत्या विक्रमचा उल्लेख केला. त्यांनी विविध क्षेत्रातील या दोन गटांच्या वाढत्या प्रभावाचे वर्णन “जागतिक भांडवलशाहीच्या इतिहासातील एक अद्वितीय घटना” म्हणून केले.

व्यवसायाच्या बाबतीत हे दोन्ही ग्रुप भारतात टॉपला आहेत. यात बाकीची देखील नाव आहेत. पण यांची चर्चा जरा यूनिकचं असते. आता यांच्या या वाढत्या प्रभावामागे दोन कारणांवर आवर्जून मोठी चर्चा होते. एक म्हणजे त्याचे सरकारशी संबंध आणि दुसरं म्हणजे त्यांची वर्चस्व राखण्याची भूक. ज्यामुळे अनेकदा वाद- विवादही पाहायला मिळत आहेत.

आता अंबानी ग्रुपचं बोलायचं झालं. अंबानी यांनी पेट्रो-केमिकल आणि पेट्रोलियम, टेलिकॉम, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, संघटित किरकोळ व्यापार आणि मनोरंजन या क्षेत्रांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. कोरोना काळात एकीकडे सर्वांचे उद्योग ठप्प होत असताना अंबानी समूह मात्र डबलने झेप घेताना पाहायला मिळाला.

तर अदानी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर झपाट्याने वाढणारा अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा कोळसा आयात करणारा, वीज आणि सौरऊर्जा क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा खेळाडू आहे आणि आता भारतातील बंदरे आणि विमानतळांचा सर्वात मोठा मालक आहे.

हे दोन्ही गट आपापल्या क्षेत्रात बाप आहेत. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत एकमेकांची वाट कापण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. पण आता ‘ग्रीन एनर्जी’ क्षेत्रात आपले वर्चस्व जाहीर करून टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनाही सरकारमध्ये चांगले स्थान आहे.

दरम्यान, अमेरिकेत या दोन्ही गटांबाबत बोलताना डॉ.सुब्रह्मण्यन यांनी त्यांची तुलना दक्षिण कोरियामधील चीबॉल्स गट आणि जपानच्या कौटुंबिक-नियंत्रित जैबुत्सू गटाशी केली.

चीबॉल्स आणि जैबुत्सू कंपन्या आपापल्या देशात सर्वाधिक वर्चस्व असलेल्या कंपन्या आहे. त्यांच्या स्वतःच्या देशाच्या औद्योगिक भांडवल, संपत्ती इत्यादी मध्ये त्यांचा वाटा अंबानी-अदानी गटांच्या दाव्यांपेक्षा खूप जास्त आहे. पण विस्ताराचं बोललं तर जवपळपास सेमचं आहे. चीबॉल्स हे सुरुवातीला सरकार प्रायोजित राष्ट्रीय विजेते होते. ते आणि किरेत्सू राजकारणाला मोठ्या प्रमाणावर फंड पुरवतात.

आता अंबानी आणि यांच्या राजकीय संबंध तर तगडे आहेत, पण फंडींगच्या बाबतीत जरा छुपीच माहिती आहे. हा मात्र यात टाटा समूहाचं नाव आवर्जून घेता येईल. टाटा हे एकेकाळी किरेत्सू सारखे समूह होते जे एक होल्डिंग कंपनी बरोबर जैबुत्सू सारखा एकाच कुटुंबाच्या नावाने बऱ्याच काळापासून ओळखले जाते.

तसं पाहायचं झालं तर भारताच्या स्टार्ट-अप युनिकॉर्न कंपन्या एकत्रितपणे अंबानी साम्राज्यापेक्षा जास्त किमतीच्या आहेत. शिवाय, अंबानी-अदानींच्या विपरीत, टाटा समूह वर्चस्व किंवा राजकीय पकड मिळवण्यासाठी स्पर्धा करत नाही.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.