अंबानीच्या घराबाहेरील स्फोटक ते मनसुख हिरेन मृत्यू : संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?

गेल्या पंधरा दिवसांपासून उद्योगजगतात प्रसिद्ध असलेलं मुकेश अंबानी यांचं नाव मागच्या १५ दिवसांपासून राजकारणी आणि पोलीस यांच्यात चर्चेचा मुद्दा बनला आहे. त्यांच्या सोबतच मनसुख हिरेन, सचिन वाझे ही नावं पण जोडीली गेली आहेत. याला कारणीभूत ठरलं आहे ते अंबानींच्या घराबाहेर गाडीमध्ये सापडलेले स्फोटक पदार्थ.

पहिल्यांदा अंबानी यांचा घातपात करण्याचा हा प्रयत्न असल्याच दिसून आलं. मात्र, गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या गूढ मृत्यू नंतर वेगवेगळे तर्क लढवले जाऊ लागले. त्यामुळे साहजिकच या प्रकरणाला राजकीय वळण लागलं, आणि प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलयं.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंवर विधीमंडळात गंभीर आरोप केले. त्यावर सत्ताधाऱ्यांनी वाझेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पुढे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास देण्यावरून राजकारण तापले. विधिमंडळात/विधिमंडळाच्या बाहेर याचे पडसात उमटले.

याच अनुषंगाने राज्यभर गाजणाऱ्या अंबानी घातपात प्रकरणाचा आणि मनसुख हिरेन गूढ मृत्यू प्रकरणाचा आपण पहिल्या दिवसापासूनच्या घडामोडींचा संपूर्ण तपशील जाणून घेणार आहोत.

२५ फेब्रुवारी २०२१

मुकेश अंबानी यांच्या अन्टेलिया निवासस्थानापासून काही अंतरावर एका बेवारस संशयास्पद हिरव्या रंगाची स्कॉर्पियो गाडी आढळली होती. त्या गाडीमध्ये जिलेटीन २० कांड्या सापडल्या होत्या. गाडीमध्ये स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली होती. त्यात

‘नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली, एक झलक हैं ये. अगली बार ये सामान पुरा हो के आयेगा. ओरिजिनल गाडी मी आयेगा. पुरी फॅमिली को उडाने का इंतजाम है. संभल कर रहना. गुड नाईट’ अशा आशयाची ती चिट्ठी होती.

यातून अंबानी यांचा घातपात करण्याचा हेतू दिसून येत होता. यात गंभीर बाब म्हणजे अंबानींच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सेमच होता. सचिन वाझेंच्या नेतृत्वात पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला.

२७ फेब्रुवारी २०२१

दोन दिवसांच्या तपासादरम्यान, तब्बल ७०० सीसीटीव्ही चेक केले गेले. यात स्कॉर्पिओ कार विक्रोळी  भागातून चोरी केल्याच उघड झालं. तसंच कट रचण्यासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कारचा तपास सुरु करण्यात आला. ती देखील मुलुंड मधून चोरी झाल्याच उघडकीस आलं.

त्यातच स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या आणखी काही बनावट नंबर प्लेटचा आणि नीता अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर सेम असल्याच निष्पन्न झालं.

अंबानींच्या अन्टेलिया निवासस्थानाजवळ आढळलेली स्कॉर्पिओ ही मनसुख हिरेन यांची होती. मनसुख हिरेन १७ तारखेला खरेदीसाठी विक्रोळीला गेले होते. त्यावेळी गाडीचे  हैंडल लॉक झाले होते. त्यामुळे मनसुख यांनी गाडी तिथेच ठेवली होती. दुसऱ्या दिवशी गाडी दुरुस्तीसाठी मकॅनिकलला घेवून गेले असता गाडी जागेवरून गायब झालेली होती.

त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मनसुख यांची गाडी अज्ञातांनी चोरून अंबानी घातपात प्रकरणात वापरली होती. त्यामुळे मनसुख यांना पोलीस चौकशीला सामोरे जाव लागल होत. ते पोलिसांना चौकशीवेळी मदत करत होते.

२८ फेब्रुवारी २०२१

या घातपात कटाची जबाबदारी ‘जैश-उल-हिंद’ या आतंकवादी संघटनेने घेतली. ‘पुढे अजून बाकी आहे’ अशा शब्दात धमकीही दिली होती. एका टेलिग्राम संदेशात त्यांनी ‘स्फोटकांची गाडी ठेवणारे सुखरूप घरी पोहोचले असल्याचं स्पष्ट केलं.

पोलिसांनी देखील याला दुजोरा देऊन ही स्फोटक ठेवण्यामागे याच संघटनेचा हात असल्याचं जाहीर केलं.

१ मार्च २०२१

मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जैश-उल-हिंदने या प्रकरणाची जबाबदारी फेटाळून आपला या घटनेशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा या दाव्यासंबंधित तपासाला सुरुवात केली.

४ मार्च २०२१

गुरुवारी सायंकाळी मनसुख यांना एक फोन आला होता. त्यावेळी ते आपल्या ‘क्लासिक’ या दुकानात होते. तिथ त्यांचा मोठा मुलगा मित्र हजर होता. कांदिवलीच्या तावडे साहेबांचा फोन आहे. मी त्यांना भेटायला जात आहे, अस म्हणत मनसुख दुकानातून त्यांच्या डॉ. बाबासाहेन आंबेडकर रोडवरील घरी गेले. तिथून ते ८.३० ला बाहेर पडले.

रात्री १२.३० वाजले तरी घरी आले नाहीत. त्यांचा फोन बंद होता. म्हणून चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

५ मार्च २०२१

या सर्व प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसात उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत असतानाच मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्याची माहितीही दिली होती. त्यामुळे संपूर्ण सभागृह अवाक झालं.

फडणवीस यांनी हिरेन यांना सरकार वाचवण्यात अपयशी ठरले, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्या, अशी मागणी त्यांनी केली.

याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरेन यांचा मृत्यू कसा झाला याचा तपास लावण्यासाठी पोलीस सक्षम असल्याच सांगत फडणवीसांची मागणी फेटाळून लावली.

गुरुवारी रात्री गायब झालेल्या मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी मुंब्रा खाडीत मृतदेह आढळला. दररोज पोहायला जणाऱ्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होईल, असा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांचा खून झाल्याची शक्यात वर्तवली जाऊ लागली.

६ मार्च २०२१

हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. शुक्रवारी रात्री ८ वाजता शवविच्छेदन करण्यास सुरुवात केली. त्याआधी १२ तासांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याच अहवालात म्हंटल. त्यांचे भाऊ विनोद यांनी मनसुख यांना मारून त्यांचा मृतदेह पाण्यात टाकल्याचा संशय व्यक्त केला. मनसुख यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात याव अशी मागणी केली होती.

७ मार्च २०२१

त्यादिवशी राज्य सरकारने हा तपास राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडे देत असल्याची घोषणा केली. एटीएसने शनिवारी रात्री हिरेन कुटुंबियांचा घरी जावून जवाब घेतला होता. मनसुख यांची हत्त्या झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी विमला यांनी व्यक्त केला.

त्यानुसार कुटुंबियांचा संशय आणि शवविच्छेदन अहवाल याच्या निष्कर्षावरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी ही माहिती दिली.

८ मार्च २०२१

दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृह विभागाने अंबानी घातपात प्रकरण व हिरेन गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला. एनआयएने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.

९ मार्च २०२१

स्फोटकांनी भरलेली गाडी नोव्हेंबरपासून पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या ताब्यात होती. हा प्रकार उघडकीस आल्यापासून गाडी मालक मनसुख हिरेन हे तीन-चार दिवस सतत वाझे यांच्याबरोबर असायचे, असा जबाब त्यांच्या पत्नीने दिल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडनावीसांनी विधानसभेत केला.

वाझेंच्या निलंबनाची मागणी भाजपमुळे जोर धरत असतानाच सत्ताधार्यांनी ही मागणी फेटाळून लावली. ‘हिरेन यांनी अटक करून घ्यावी आणि चार दिवसांत त्यांची जामिनावर सुटका करू, असे वाझे यांनी त्यांना सांगितले होतं’, असाही आरोप फडणवीस यांनी केला.

१० मार्च २०२१

अखेरीस १० मार्च रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या वादग्रस्त वाझेंच्या बदलीची विधानपरिषदेत घोषणा केली आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या घोषणेनंतरच विधानसभेचे कामकाज सुरळीत झाले.

सध्या एटीएस आणि एनआयए या दोन्ही संस्था करत आहेत.

११ मार्च

घातपात प्रकरणात वापरलेल्या स्कॉर्पिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट जाहीर झाला. कारसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा नुकसान करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं रिपोर्टमधुन उघड झाल. ज्यावेळी कार चोरी झाली त्यावेळी कारचा दरवाजा खोलण्यासाठी कोणतीही छेडछाड, तोडफोड केलेली नाही. तसेच चोरीचेकोणतेही निशाण मिळालेले नाहीत, अशी माहिती फॉरेंसिक रिपोर्टनुसार समोर आली आहे.

अंबानींना धमकी देण्यासाठी वापरलेला फोन सापडला. एटीएसने आज ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या बँक अकाउंट्सचे डिटेल्स मिळवले कुटुंबियांना चौकशीला बोलवले. त्यामुळे लवकरच तपासाची दिशा स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.