अंबानी गुजरातला सर्वात मोठं प्राणिसंग्रहालय उभारतायेत पण त्याला विरोध का होतोय ?

गुजरात म्हणलं कि या राज्याच्या नावाने असलेले रेकॉर्ड लक्षात येतील.

असं म्हणतात जगातील सर्वात उंच, सर्वात मोठे आणि सर्वात लांब प्रकल्प गुजरातमध्ये आहेत. जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील गुजरातमध्ये आहे. सर्वात लांब सिंचन कालवा असू देत किंव्हा सर्वात मोठा विद्युत प्रकल्प असलेले धरण असो हे सर्व गुजरातमध्ये आहे. 

यानंतर आणखी एक विक्रम गुजरातच्या नवे असणारे ते म्हणजे, जगातील सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयापैकी एक प्राणीसंग्रहालय गुजरातच्या जामनगर मध्ये उभारण्यात येतंय.

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून हे भारतातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय आहे. 

त्यामुळे फक्त भारतातलेच नाही तर जगभरातले पर्यटक या संग्रहालयाला भेट देतील. त्यामुळे टूरीजमच्या नकाशावर गुजरातचं महत्वाचं स्थान असणार आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून रिलायन्सच्या या प्राणी संग्रहालयाला मंजुरी मिळाली आहे. मात्र,

पण या प्राणीसंग्रहालयाला विरोध होतोय..

अलीकडेच या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्राणिसंग्रहालयाला आव्हान देणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. हि याचिका बेसलेस असून त्यात कसल्याही स्वरूपाचे तथ्य नाही तसेच फक्त बातम्यांच्या आधारे विरोध केला जातोय असं मत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

आता महत्वाचा मुद्दा हा आहे कि विरोध का आहे याबाबत या याचिकेत ठोस असं कारण देण्यात आलेलं नाहीये. मात्र या याचिकेत रिलायन्सच्या ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरवर भारतभरातून आणि जगभरातून प्राणी आणले जातायेत. परदेशातून प्राणी आणण्यावर बंदी घातली जावी असा उद्देश या याचिकेमागे असल्याची माहिती मिळतेय. 

तसेच रिलायन्सचे हे ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या या प्रोजेक्टची तसेच त्याच्या मॅनेजमेंट ची चौकशी व्हावी त्यासाठी एसआयटीची मागणीही या याचिकेद्वारे न्यायालयासमोर ठेवण्यात आली होती. 

प्रदेशातून वेगवेगळ्या प्रजातीचे आणि वेगवेगळ्या हवामानात वाढ होणारे प्राणी भारतात आणले जातायेत त्यासाठी आवश्यक असणारी क्षमता आणि अनुभव हे या रिलायंसच्या झू सेंटरकडे आहे का यावरही प्रश्न उपस्थित केले गेले जात आहेत.

त्यामुळं या प्राणिसंग्रहालयला स्थगिती द्यावी अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आलेली. या याचिकेनंतर रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीने या झू प्रोजेक्टची सर्व तपशीलवार माहिती देण्यात आली. त्याद्वारे रिलायन्स सर्व नियमांचे आणि अटींची पूर्णपणे पूर्तता करत आहे हे स्पष्ट झाल्यानंतर कोर्टाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळली.  

हे झू सेंटर आपल्या पायाभूत सुविधा, मॅनेजमेंट, वातानुकूलित सुविधा, आवश्यक पशुवैद्य, क्युरेटर, जीवशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञ असे सर्व चोख व्यवस्था केली आहे. या सर्व सुविधांबद्दल जाणून कोर्टाने समाधान व्यक्त केले.

या विरोधात भर पडली होती जेंव्हा कमलापूर हत्ती कॅम्प मधील हत्ती अंबानींच्या प्राणी संग्रहालयात पाठविण्याची परवानगी देण्यात आलेली.

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प मधील ८ हत्ती आणि आलापल्लीमधील ३ हत्तींना जामनगर येथील प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आले. खासगी कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्राणिसंग्रहालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले आहे. राज्य सरकारने देखील त्याला मान्यता दिली होती तेंव्हा त्यावरून बरंच मोठं राजकारण झालं होतं.

याशिवाय आणखी एक वाद म्हणजे,  ब्लॅक पँथर भारतात आणण्याच्या करारावरून अंबानींचा हा प्रोजेक्ट आधीच वादात सापडला होता. कारण या संग्रहालयात जे २ ब्लॅक पँथर असणारेत ते आसामच्या गुवाहाटी प्राणीसंग्रहालयातून जामनगरच्या प्राणीसंग्रहालयात पाठविण्यासाठी सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यावरून देखील स्थानिक राजकारण पेटलं होतं.

या संग्रहालयाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ठये म्हणजे, जगातील विशेष असणाऱ्या प्रजातींचे प्राणी यात ठेवले जाणार आहेत. 

रिलायन्सचे हे प्राणिसंग्रहालय एकूण ३०० एकराच्या परिसरात बांधला गेला आहे. 

आफ्रिकन सिंह, चित्ता, जग्वार, भारतीय लांडगा, एशियाटिक सिंह,  पिग्मी हिप्पो, ओरंगुटान, लेमूर, मासेमारी मांजर, स्लॉथ बेअर, बंगाल टायगर, मलायन तापीर, गोरील्ला, झेब्रा, जिराफ, झेब्रा, शहामृग हत्ती आणि कोमोडो ड्रॅगनसारख्या प्राण्यांचा समावेश आहे.

असो तर अलीकडेच स्थगितीच्या याचिकेला सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यामुळे सद्या तरी हे संग्रहालयाची अडचण सुटली आहे. २०२३ पर्यंत हे प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी सुसज्ज असणार आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.