अमेरिका आणि चीन क्रिकेट का खेळत नाहीत यामागचे कारणसुद्धा डीप आहे….

क्रिकेट हा जगभरात खेळला जाणारा खेळ आहे हे आपण वाचत ऐकत असतो. पण याला काही अपवाद देखील आहेत. आणि यात जे दोन मुख्य देश अपवाद म्हणून गणले जातात ते प्रगत देश समजले जातात. इंग्रजांनी क्रिकेटचा शोध लावला खरा पण आशियायी देशांमध्ये तो इतका लोकप्रिय झाला कि त्या देशांनी आपले राष्ट्रीय खेळच मागे पडले.

तर मेन मुद्द्यावर येऊया आणि जाणून घेऊया अमेरिका आणि चीन क्रिकेट का खेळत नाही?

चीन क्रिकेट का खेळत नाही याच्यामागे एक जबरदस्त कारण आहे, ओलम्पिकमध्ये भरघोस पदकांची कमाई करणारा चीन क्रिकेटमध्ये पिछाडीवर गेला आणि कधीच क्रिकेट न खेळण्याचा निर्णय या देशानी घेतला.

क्रिकेटमध्ये नसणारा इंटरेस्ट म्हणजे या देशांनी ऑलम्पिक आणि राष्ट्रीय खेळांना जास्त महत्व दिलं. चीनमध्ये क्रिकेटबद्दल लोकप्रियता आणि जागरूकता वाढावी म्हणून एक टी ट्वेन्टी सिरीज आयोजित करण्यात आली होती.

संयुक्त अरब अमिरातसोबत ज्यात चीनची महिला टीम एकदा १४ धावांवर ऑलआऊट झाली आणि या देशानी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय का घेतला याची शाश्वती पटली.

ऑलम्पिक स्पर्धाना प्राधान्य देणं, खेळाडूंची देखरेख करणं या सगळ्या गोष्टी चीन सर्वप्रथम करतं आणि या देशाचं म्हणणं आहे कि क्रिकेटवर पैसे वाया घालवण्यापेक्षा राष्ट्रीय खेळावर तेव्हा पैसा लावला तर देशाला फायदा होतो. चीनचा राष्ट्रीय खेळ आहे टेबलटेनिस. टेबलटेनिस आणि बॅडमिंटनमध्ये सर्वाधिक पदकं मिळवण्याचा चीनचा रेकॉर्ड आहे आणि त्यामुळे इथे क्रिकेटला जास्त वाव नाही उलट इथल्या लोकांमध्ये क्रिकेटची क्रेझहि दिसून येत नाही.

चीन अशा खेळात जास्त इंटरेस्ट घेतो ज्यात पदकांची लयलूट करता येईल. वर्ल्ड वाईड खेळल्या जाणाऱ्या खेळांवर चीन जास्त फोकस करतं. टेबल टेनिस, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक हे खेळ सगळीकडे खेळले जातात आणि क्रिकेट त्या तुलनेत मागे आहे.

हे सगळं बघता भारतातल्या कुठल्याही लेकराला विचारा कि तुझा आवडता खेळ कोणता रे भावा तर ते म्हणतं क्रिकेट आणि खेळाडूंमध्ये विराट, सचिन, धोनी वैगरे. चीन, जपान, अमेरिका या देशांमध्ये क्रिकेट हा फेमस खेळ मानलाच जात नाही.

दुसरा देश म्हणजे अमेरिका.

जगातलं सगळ्यात प्रगत राष्ट्र अशी ओळख असलेलं राष्ट्र म्हणजे अमेरिका. अमेरिकामध्ये सगळ्यात जास्त खेळला जाणार खेळ म्हणजे बेसबॉल. या खेळाची क्रेझ क्रिकेटपेक्षाही जास्त आहे. आपल्याही देशात बेसबॉल खेळला जातो पण तो हाणामाऱ्यांसाठी. तरीही अमेरिकेने क्रिकेटला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला पण तस काही घडलं नाही.  आयसीसी अमेरिकेला क्रिकेटमध्ये आणण्याच्या पूर्ण बेतात आहे.  

ऑलम्पिक स्पर्धांमध्ये एका एका मेडलसाठी तरसणारा आपला देश आजही क्रिकेटलाच जास्त प्राधान्य देतो. चीन, अमेरिका या देशांनी क्रिकेटला जास्त सिरियसली घेतलं नाही आणि त्यांनी ऑलम्पिकवर फोकस करून आपल्या देशाला मेडल कसे मिळतील हे लक्ष्य ठेवलं.

हे देश आजही क्रिकेटला जगप्रसिद्ध खेळ मानत नाही आणि तितकं महत्वही देत नाही. ऑलम्पिक स्पर्धांमध्ये आपल्या देशाचं वर्चस्व कस राहील हे त्यांचं अंतिम ध्येय असतं. इतक्या वर्षांपासून या देशांनी क्रिकेट न खेळता इतर खेळांमध्ये जागतिक आयकॉन असलेले खेळाडू बनवलेले आहेत. या सगळ्या कारणांमुळे काही देशांमध्ये क्रिकेटची क्रेझ शून्य आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.