२० वर्षात अमेरिकेने ६१ लाख कोटी खर्च केले, पण अफगाणिस्तान पुन्हा तालिबान्यांच्या हातात गेले

११ सप्टेंबर २००१. १९ दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या ४ प्रवासी विमानांना हायजॅक केलं होतं. यातील २ विमानांना या दहशतवाद्यांनी क्रश केलं. यातील १ पेंटागॉन आणि १ अज्ञात ठिकाणी क्रश करण्यात आलं. या हल्ल्यात जवळपास २ हजार ९९६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या मागे अल कायदाचा हात असल्याचं समोर आलं होतं, याचनंतर अमेरिका ओसामा बिन लादेनचा जीव घेण्यासाठी आसुसला होता.

लादेन आधी सुदानमध्ये लपला होता, आणि नंतर त्याने अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. जशी हि गोष्ट कळली, तसा अमेरिका अफगाणिस्तानमधील तालिबानी साम्राज्यावर अक्षरशः तुटून पडला. अफगाणिस्तानला तालिबान्यांपासून वाचवणे आणि त्यांचं साम्राज्य संपवणे एवढं एकच ध्येय अमेरिकेने डोक्यात ठेवलं होतं.

याचा एक भाग म्हणून अमेरिकेने आपले आणि नाटोचे सैनिक अफगाणिस्तानमध्ये तैनात केले. तेव्हापासून ते आपलं सैन्य माघारी घेणार असल्याच्या घोषणेपर्यंत अमेरिकेने जवळपास १० हजार सैनिक या ऑपरेशनसाठी तैनात केले.

सोबतच तालिबान्यांना हरवण्यासाठी अफगाणिस्तानच्या तब्बल ३ लाख अफगाणी फौजेला ट्रेनिंग दिले. या सैन्याला अत्याधुनिक हत्यारे, उपकरणे देऊ केली. अफगाणी वायू सेनेची जबाबदारी आपल्याकडे घेतली. या सगळ्यासाठी अमेरिकेने आजपर्यंत तब्बल ६१ लाख कोटी रुपये खर्च केले. तर तब्बल २३०० सैनिकांना गमवावे लागले.

मात्र हे एवढे सगळे करून देखील आज अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं साम्राज्य पुन्हा एकदा परतलं आहे. 

एनर्जी ड्रिंक पासून ते हत्यांरापर्यंत सगळं सोडून अमेरिकेचं सैन्य परतले आहे.

अमेरिकेने आता तब्बल २० वर्षाच्या संघर्षानंतर अफगाणिस्तान सोडताना सगळ्यात मोठी सैन्य चौकी बगराम एयरबेसला मागे सोडलं आहे. यात एनर्जी ड्रिंकपासून ते बख्तरबंद वाहन, हेलिकॉप्टर, सैन्याची वाहन, नागरी वाहन, अत्याधुनिक हत्यारे, दारुगोळा असं सगळं सामान मोठ्या प्रमाणावर मागे टाकलं आहे.

पण त्यासोबतच 984 सी-17 या विमानाने मोठ्या प्रमाणावर साहित्य देशाबाहेर पाठवलं आहे.

तर काही साहित्य अमेरिकेन सैन्यानं परत घेऊन जाण्याऐवजी किंवा अफगाणी सैन्याला देण्या ऐवजी बाबा मीरच्या सर्वात मोठ्या डम्पिंग ग्राउंडवर टॅंक, रणगाडे, आणि अन्य हत्यारांना नष्ट केले. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मते, अमेरिकी सैन्याने याआधी अफगाणिस्तान सोडण्याआधी जवळपास १५०० ते १७०० सैन्यांची उपकरण नष्ट केली आहेत, जी परत घेऊन जाण शक्य नव्हतं. तर ३८१ मिलियन पौंड स्क्रॅप अफगाण सरकारला ४६.५ मिलियन डॉलरला विकले आहे. तर काही हत्यार अफगाण सैन्याच्या हवाली केले.

अमेरिकेने जी हत्यार सोडले त्याच पुढे काय होणार?

अशात आता मुख्य प्रश्न उभा राहत आहे तो म्हणजे अमेरिकेने जी काही अत्याधुनिक हत्यार आणि उपकरण अफगाणी सैन्याच्या हवाली केले होते, त्यांचं पुढे काय? तर त्याच उत्तर आपल्याला मिळत ते तालिबान्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर. अमेरिकेने सोडलेली हत्यार आता तालिबान्यांच्या ताब्यात आहेत. तालिबान सोशल मीडियाची अकाउंट्स तालिबानची मुलं अमेरिकन सैन्याची हत्यार ताब्यात घेण्याच्या व्हिडीओसनी अक्षरशः भरून गेली आहेत.

तालिबान्यांसाठी हि हत्यार वरदान ठरणार?

परराष्ट्र तज्ज्ञांच्या मते हि हत्यार आणि उपकरण आता तालिबान्यांना आश्चर्यकारक रित्या लागलेला जॅकपॉट आहे. संरक्षण तज्ञ लेफ्टनंट जनरल (रि) गुरमीत सिंह सांगतात,

अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून निघून गेल्यानंतर एक नवा पैसा देखील खर्च न करता तालिबानला अमेरिकेची सगळी हत्यार आणि उपकरण फ्रीमध्ये मिळाली आहेत. त्यामुळे आता हे सगळे साहित्य तालिबान्यांसाठी वरदान ठरणार ही गोष्ट नक्की.

अमेरिकेने दिलेली ट्रेनिंग फेल 

या सगळ्यांमधून एक प्रकारे मागच्या काही काळात अमेरिकेने अफगाणी सैन्याला जे काही ट्रेनिंग दिले होते ते फेल गेल्यासारखचं दिसून आलं. कारण अफगाण सैन्याने लढण्याची ताकदच दाखवली नाही. त्यांनी अगदी सहजरित्या तालिबान्यांपुढे हत्यार टाकली.

अमेरिकन सैन्याने जे काही ट्रेनिंग दिले होते ते अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. यामागचं असही एक कारण सांगितले जाते ते म्हणजे अफगाणी सैन्यांजवळ दारू गोळा नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणताही पराक्रम न दाखवता सरळ हार मनाली.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.