अमेरिकेच्या मायकलकडे २८ गोल्ड मेडल्स आहेत पण भारताकडे फक्त १ ,यात चूक कुणाची ?

जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या आपला भारत अनेक बाबतीत जगासमोर ताकदवान देश म्हणून स्वतःला सिद्ध करत आला आहे.

स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा एकच उद्देश राहिला आहे की संपूर्ण जगासमोर आपले वजन कायम अबाधित रहावे. मग ते डिफेन्स असो, विज्ञान, आयुर्वेद, योग असो किंवा मग येथे निर्मित होणारे दर्जेदार सिनेमे असो.

मात्र एका गोष्टीचे बाबतीत भारत कायम मागे राहिला आहे ते म्हणजे ऑलिंपिकच्या बाबतीत.

१९८४ मधील ऑलिंपिक आणि आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या दरम्यान भारत आणि केवळ एकच ऑलिंपिक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पण याचदरम्यान  इतर देशांचा रेकॉर्ड पाहिला तर लक्षात येईल की, इथोपियाने आत्तापर्यंत १७ गोल्ड मेडल, १० रौप्य तर १६ कास्य पदक मिळवले आहे. तसेच त्यांच्याच बरोबरीने नोर्थ कोरिया बियाया साधारण देशांची ही वर्णी लागली आहे.

आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत. बऱ्याच काळापर्यंत भारतचा पुरूष हॉकी संघ ऑलिंपिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता. १९२८-१९५६ या काळात लागोपाठ मिळविलेल्या सांघिक ६ सूवर्ण पदकांसह, १९२८-१९८० या १२ वर्षांच्या कालखंडात पुरूष हॉकी संघाने तब्बल ११ पदके मिळविली आणि

प्रथमच २००८ मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक नेमबाजीमध्ये अभिनव बिंद्रा यांनी पटकावले.

२००८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये  अभिनव बिंद्रा यांना १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

२०१६ च्या ऑलम्पिक मध्ये भारताने फक्त दोन मेडल जिंकले होते जे कि या ऑलिम्पिकमध्ये भारत आणि बरीच मोठी ताकद लावली होती. ही बाबच दाखवून देते कि, भारत क्रीडाक्षेत्रापासून फार लांब आहे.

ऑलिम्पिकच्या यादीनुसार भारत देश 78 देशांमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात ताकदीचे क्रिकेटपटू तयार होतात तर आपण नेमकं ऑलिम्पिक मध्येच का कमी पडतोय? याची काय कारणे असू शकतात.

याचं काही एकच कारण नाहीये जगभरातल्या तज्ञांनी यावर अभ्यासही केला. हा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो यावर विचार केला. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता भारताला २००४  मध्ये १५७  मेडल जिंकून आणणं अपेक्षित होतं. तिथे भारताने फक्त एकच मेडल जिंकलं होतं. युएस ने ४३ मेडल जिंकणे अपेक्षित होते तर त्यांनी त्याच्या दुप्पट म्हणजेच १०२ मेडल जिंकले होते. अजून एक म्हणजे देश सलगपणे बरीच मेडल जिंकतात त्यांना एका वर्गवारी मध्ये सामाविष्ट केले जाते.

देश जितका जास्त श्रीमंत असतात ते देश मेडलही जास्त जिंकतात, जसे की यूके आणि युएस.

भारत सरकारने देखील याचा अभ्यास केला आणि त्यातून समोर आले की ते एका खेळाडूसाठी एका दिवसाला तब्बल २२ रुपये खर्च करतो परंतु भारत मात्र दिवसाला एका खेळाडू वर फक्त तीन पैसे खर्च करतो, तर अशी हि आपली व्यवस्था.

इथे भारतात साध्याशा पुतळ्यांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जातात परंतु भारतीय खेळाडूवर मात्र तीन पैसे खर्च केले जातात किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना?

१९९८ मध्ये पी.टी उषा जेव्हा रिओ ऑलिम्पिक मध्ये जाणार तेव्हा त्यांच्याकडे प्रॉपर स्पोर्ट्स शूज नव्हते आणि आपण मोठ्या कौतुकाने सांगत सुटतो की पळण्यासाठी प्रॉपर शूज नसतानादेखील पी टी उषा हिमा दास यांनी कसे मेडल जिंकले वगैरे वगैरे. खरं तर हे आपल्या क्रीडा क्षेत्राचे अपयश म्हणावं लागेल.

परंतु क्युबा व नोर्थ कोरिया सारख्या देशांकडे पण फार पैसा नाही पण तेथील केंद्र सरकार व इतर काही सामाजिक संस्था खास खेळाडूंसाठी स्पॉन्सरशिप द्वारे पैसे उभे करतात. ‘नेशन बिल्डिंग’ साठी क्रीडा हेही एक महत्त्वाचे माध्यम आहे हे त्यांनी खूप आधीच जाणले होते. त्यामुळे तेथील खेळाडू व खेळ हे देशाच्या केंद्रस्थानी असतात.

भारताला ऑलिंपिकमध्ये स्वतःच स्थान मिळवायचं असेल तर, यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिला खेळाडूंची संख्या जास्तीत जास्त कशी वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

कारण आजपर्यंत जवळपास बऱ्यापैकी मेडल असे महिला खेळाडूंनी आणले आहेत. महिला असो पुरुष या खेळाडूंसाठी फंडिंग स्किल्स लर्निंग इत्यादी गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

२०१२ भारताकडून आतापर्यंत सर्वांत जास्त म्हणजे ८३ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले होते. याशिवाय भारतीय खेळाडूंनी एकूण ५५ क्रिडाप्रकारांत भाग घेतला, ही सूद्धा भारताची आतापर्यंतची सर्वांत मोठी मिळकत म्हणावी लागेल, तरीही तितकी समाधानकारक ही नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.