अमेरिकेसारखा प्रगत देश सोडून बाईंनी ‘भारत’ निवडला, समस्येवर काम करण्यासाठी !

एक अमेरिकन मुलगी भारतात येते, पीएचडी करायला..विषय होता ‘वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड – प. महाराष्ट्रातील अब्राह्मणी चळवळ. त्यादरम्यान तिने इथला समाज पाहिला, येथील चळवळी पाहिल्या, येथील निळे, भगवे झेंडे त्यांना दिसले, येथील समाजाचे प्रश्न दिसले…येथील प्रश्नांचा अभ्यास करता करता तिने तिचे आयुष्यच या प्रश्नांसाठी वाहून घेतले…त्या अमेरिकन मुलीचे नाव आहे डॉ. गेल ऑम्व्हेट !

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतातल्या मोजक्याच समाज शास्त्रज्ञपैकी एक म्हणजे डॉ. गेल ऑम्व्हेट !

भारतात आल्या आणि कायमच्या भारताच्या होऊन गेल्या. समाजकार्यासाठी आवश्यक नाहीये कि ती व्यक्ती आपल्याच देशातील नागरिक असावी. माणूस हा प्राणीच समाजशील आहे. त्याचप्रमाणे डॉ. गेल या सुद्धा आपल्या देशातील समस्या पाहिल्यात आणि या समस्यांवर काम करण्यासाठी त्यांनी भारतातच स्थाईक होण्याचं ठरवलं.

अमेरिकेसारखा प्रगत देश सोडून या बाईने भारत निवडला, का तर लोकांच्या समस्येवर काम करण्यासाठी !

विशेषतः त्यांनी त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र निवडला.  साधारणपणे ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात येऊन महात्मा फुले यांच्या कार्यावर देखील पीएचडी केली आणि भारतीय उच्च जातीय बुद्धीजीवी वर्गाने जाणिवपूर्वक दुर्लक्षित केलेल्या महात्मा फुले यांच्या कार्यावर गेल ओम्वहेट यांनी पुन्हा एकदा प्रकाश टाकला. जे कार्य खूप लोकांनी केलं आहे.

स्रि-मुक्ती चळवळींचा अभ्यास करतांना गेल ऑम्व्हेट यांची ओळख क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांच्याशी झाली. आणि मग त्या चळवळीत सक्रीय झाल्या.

त्यांनी सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले, यांच्याशी विवाह करून इथेच स्थायिक झाल्या आणि भारतीय पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचा चेहरा बनल्या.

प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले.

डॉ गेल आणि डॉ भारत पाटणकर यांनी आपल्या क्रांतिकारी सहजीवनातून सावित्री – जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिलाय.

एक अमेरिकन स्त्री भारतात येते आणि बघता बघता अस्सल मराठमोळी बाई कधी बनते हे तिलाही कळत नाही. 

त्यांचे कार्य :

सांगली जिल्ह्यातलं त्यांचं काम खूप महत्वाचं होतं. त्यांनी इंदुताई पाटणकर या आपल्या सासूबाईला सोबत घेवून सांगली जिल्यात फिरल्या. विधवा स्त्रिया, नव-याने सोडलेल्या, एकट्या राहणा-या अशा  स्त्रियांना त्या भेटून त्यांना संघटित केलं. त्यांना आत्मविश्वास दिला. त्यांच्या सामाजिक स्थानाची आणि त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांना करून दिली. या स्त्रियांच्या हक्कांचा एक ऐतिहासिक लढा यशस्वी करून दाखविला.  सांगलील्या वाळवा तालुक्यातील बहे या गावात त्यांनी या स्त्रियांना संघटीत करून त्यांच्या मालकीची घरे उभे करून दाखवली.

मुळातच संशोधक वृत्ती असलेल्या डॉ. गेल यांच्या संशोधक नजरेला इथले भीषण समाज वास्तव दिसून आले.

आदिवासी चळवळी मध्ये पायाला भिंगरी लावून काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ उभारणाऱ्या होत्या.

 डॉ. गेल म्हणजे एक चालता बोलता ज्ञानकोशच होत्या.

त्याच्या गाढ्या अभ्यासातून, संशोधनातून, आणि चिंतनातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. कोणताही विषय घ्या त्या विषयातलं सखोल ज्ञान डॉ. गेल यांच्याकडे  असायचंच.

विशेषतः जाती व्यवस्था आणि स्त्रियांचे शोषण हा त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय. त्यामुळे या देशातील जाती व्यवस्था आणि तिच्या अंतासाठी केला गेलेला संघर्ष या विषयावर संशोधनात्मक आणि चिकित्सक लिखाण त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. भारतातील नवी सामाजिक चळवळ, दलित आणि लोकशाही क्रांती, जातीविरोधी चळवळ आणि भारतीय संस्कृती- दलित दृष्टिकोन, ब्राह्मण्यवाद आणि जातीवाद विरुद्ध बुद्धवाद, भारतीय स्त्रियांचा संघर्ष यासह अलीकडेच नुकतेच त्यांचे तुकोबाची गाणी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकांशिवाय अनेक छोट्या छोट्या पुस्तिकांसह विविध नियतकालिकातून त्यांनी विपुल लिखाण केले आहे.

समाजशास्त्राबरोबरच साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये देखील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य सभा असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळ असो या दोन्ही चळवळींची भूमिका विकसित करण्यात डॉ. गेल यांचा सहभाग महत्वाचा राहिला आहे.

त्यांचे लिखाण म्हणजे पुरोगामी चळवळीसाठीचा अमुल्य ठेवा आहे !

डॉ. गेल यांची २५ पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हिण मुव्हमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, यांचा समावेश आहे.

बौद्ध धर्म आणि भारतीय इतिहास आणि समाजमनाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्यावर विपूल असे लेखन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.