फेमस होण्यासाठी ३७ दिवसात ३७ खून केले पण महासत्ता अमेरिका अजूनही त्याला शोधू शकली नाही

झोडियाक नावाचा किलर…

हा बाबा अमेरिकेचा एक कुख्यात सीरियल किलर होता. ज्याने 1960 ते 1970 दरम्यान सॅन फ्रान्सिस्को परिसरात एकदम कहर केला होता. उठसुठ रोज नवा खून..नुसती दहशत केली होती या किलरने. 37 दिवस 37 खून केले..कशासाठी ? तर प्रसिद्धीसाठी

पण हा सायको होता, एवढं मात्र नक्की

कारण या किलरला चक्क पोलिसांच्या मनाशी खेळायला आवडायचं. हा बाबा कोणाचीही हत्या करण्यापूर्वी हा खून कसा आणि केव्हा होईल याची सर्व माहिती अमेरिकन मीडियाला द्यायचा. ते पण एका कोड्याच्या रुपात. त्यामुळे अक्ख शहर या किलरच्या आपबीती खाली असायचं. लोकांच्या मनात उठता बसता दहशत असायची.

खरं तो असं का करायचा ?

तर किलरला आपल्या नावाची संपूर्ण अमेरिकेत चर्चा व्हावी आणि प्रत्येकाच्या मनात त्याची भीती असावी अस वाटत होत. या किलरने अमेरिकेतील भारीतल्या भारी पोलीस अधिकाऱ्यांना जेरीस आणलं होतं. या किलरचा माग काढता काढता पोलिसांच्या अक्षरशः नाकी नऊ आलं होतं.

अमेरिकन पोलिसांनी सांगितले की झोडियाक किलर नावाच्या व्यक्तीने केलेल्या सर्व हत्यांमागे दोन मारेकरी होते. ज्यांनी हत्येची घटना घडवून तपास यंत्रणांची दिशाभूल केली होती.

या प्रकरणातील पहिला संशयित आर्थर ले मिलर नावाचा एक व्यक्ती होता.

जेव्हा आर्थर पकडला गेला तेव्हा संपूर्ण अमेरिकेतील लोकांना वाटले की आता टेन्शनचे दिवस संपले, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण पोलिसांना त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही.

याशिवाय मारेकरी असल्याचा संशय असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा कोणीही पाहिला नव्हता. त्यामुळे कुख्यात किलर असण्याव्यतिरिक्त, या किलरला ओळखणं तसं अवघडचं होत.

हा किलर आपला मॅसेज एका वेगळ्याच पद्धतीने मीडियापर्यंत पोहोचवायचा.

हा झोडियाक किलर क्रिप्टो मेसेजद्वारे पोलिसांशी बोलायचा. त्यावेळी हे मॅसेज डीकोड करण पण पोलिसांसाठी अवघड होतं. पण जसं का 2020 उजाडलं अनेक देशांतील तज्ज्ञांच्या पथकांनी या मॅसेजच गूढ उकलल.

340 शब्दांचा मॅसेज किलरने 51 वर्षांपूर्वी अमेरिकन मीडिया आणि पोलिसांना पाठवला होता. आणि जवळपास 50 वर्षांनंतर हा मॅसेज अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड ओरनचॅक, ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर इंजिनिअर सॅम ब्लेक आणि बेल्जियन सॉफ्टवेअर इंजिनियर जरन यांनी सॉल्व्ह केला.

या मॅसेज मध्ये किलरने लिहिल होतं की,

मला वाटते की मला पकडण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला खूप मजा येत आहे. टीव्ही शोमध्ये माझ्याबद्दल जे सांगितले जाते तो मी नव्हेच. मी गॅस चेंबरला घाबरत नाही. कारण मी लवकरच स्वर्गात जाणार आहे.

या मेसेजमधील दोन गोष्टी अजूनही गूढच आहेत. कारण या मेसेजमधून किलर नक्की कोणत्या टीव्ही शोबद्दल बोलत होता हेच समजलेलं नाही. आणि मेसेजमध्ये लिहिलेल पॅराडाइजच स्पेलिंगही वेगळ आहे. तो स्वर्गाबद्दल नक्की काय बोलतोय हे ही समजत नाही.

एवढा चुती* किलर जगात कोणी पहिला नसेल. अमेरिकेतले लोक हकनाक गेले आण पोलिसांच्या मनाशी खेळण्याच्या नादात अमेरिकेतले लोक हकनाक गेले आणि किलर काही सापडला नाही.

आणि अमेरिका म्हणते आम्ही म्हणजे सुपर पॉवर. याला काय अर्थ आहे का राव…

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.