अमेरिकन लोकं बर्गर खात नव्हती, कारण होता हा एक माणूस…

नेटफ्लिक्सवर इंडियन प्रिडेटर: बूचर ऑफ दिल्ली नावाची वेब सिरीज आली. यातील सिरीयल किलर पोलिसांवर खुन्नस काढायची म्हणून खून करत असतो. तो पोलिसांना मला पकडून दाखवा असं चॅलेंज सुद्धा देत असतो.

आपला विषय दिल्लीचा नाही, अमेरिकेचा आहे शरीराने बलदंड असणारा जोसेफ १८ व्या वर्षी अमेरिकेतील लष्करात दाखल झाला होता. १९७३ मध्ये लष्करात भर्ती झालेल्या जोसेफला व्हिएतनाम येथे पाठवण्यात आलं. मात्र व्हिएतनाम येथे त्याच्या सोबत  घडलेल्या घटनांमुळे त्याला लष्कराचा तिटकारा आला होता. त्यामुळे युद्धानंतर अमेरिकेत आल्यावर जोसेफ परत लष्करात गेलाच नाही. 

जोसेफ २४ तास नशेत राहू लागला होता. त्यातच त्याला ड्र्ग्सचा नाद लागला. या दरम्यान वेश्या म्हणून काम करणाऱ्या एका मुलीच्या संपर्कात तो आला. दोघे एकत्र राहू लागले. घरखर्च चालवण्यासाठी जोसेफ ट्रक चालवायचा. त्यात त्याला मुलगाही झाला झाला.   

 १९९३ मध्ये जोसेफ ट्रक घेऊन बाहेर राज्यात गेला होता.

तो महिनाभरानंतर घरी परत आला. घरी आल्यावर त्याला गर्लफ्रेंड आणि मुलगा दोघेही बेपत्ता असल्याचे समजले. त्याने खूप शोध घेतला. पण ते दोघेही सापडले नाही. त्यानंतर जोसेफने ती जिथे पहिल्यांदा भेटली होती. तिथे जाऊन विचारले तर त्याला समजले की, ती एका मुलासोबत निघून गेली आहे.

जोसेफला भीती होती की, त्यांची गर्लफ्रेंड त्याच्या मुलाला चुकीच्या माणसांच्या हातात देईल. त्यामुळे तो त्याच्या मैत्रिणीला ओळखणाऱ्या लोकांना लोकांना भेटून विचारणा करू लागला. १९९४ मध्ये मैत्रिणीला ओळखणाऱ्या दोघांना विचारला गेल्यावर त्यांना तिच्याबद्दल काहीच माहित नव्हते त्यामुळे जोसेफने रागाच्या भरात त्यांना मारून टाकले. एवढंच नाही तर खून करताना पाहणाऱ्या एकाला सुद्धा मारून टाकलं आणि दूर नदीत फेकून दिलं. 

मात्र या केसमधून तो सहीसलामत बाहेर आला. त्याने खून केल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. उलट त्याचा राग अधिक वाढला होता.आता तो किलर बनला होता. विशेषतः त्याला वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणि ड्रग्स संदर्भातील व्यक्तींचा राग येऊ लागला होता. वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना तो भेटायला बोलवायचा आणि बलात्कार करून मारून टाकायचा. 

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला मारल्यानंतर तिच्या शरीराचा वरचा भाग एका घरात ठेवायचा.

अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात लोक अचानक गायब होत होते. मात्र त्यांचे मृतदेह सापडत नव्हते. एके दिवशी सफाई कामगाराला मृतदेह सापडला तो फक्त सांगाडा होता, मांस गायब होतं. हा सांगाडा एका मुलीचा होता.  कॅथी असे तिचे नाव होते. बरेच दिवस ती बेपत्ता होती.

मात्र खून कोणी आणि का केला हे कळू शकले नाही. काही दिवसांतच अजून एका मुलीचा सांगाडा सापडला होता. ती मुलगी सुद्धा वेश्या व्यवसाय करणारी होती.  तिचाही मारेकरी सापडला नाही.

जोसेफ ट्रक चालवायचा त्यानंतर त्याने रस्त्यावर ट्रक उभा करून बर्गर आणि सँडविच विकायला सुरुवात केली. डुकराचे मांस आणि गोमांस असलेले सँडविच आणि बर्गर विकायचा. पण जोसेफला माहित होते की, त्याला पोलिसांपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर पुरावे नष्ट करावे लागणार. 

त्यामुळे खून केल्यानंतर तो शरीरातील मांस बाहेर काढत असे. 

मांस बाहेर काढल्यानंतर तो सांगाडा डब्यात टाकायचा आणि फेकून द्यायचा. मग मांस तंदूरवर भाजून तो स्वतः खायचा आणि बर्गर आणि सँडविच मध्ये टाकून विकायचा. असं अनेक दिवस चालू होत.  विशेषत: वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना तो टार्गेट करत असे.

मात्र गुन्हेगार कितीही डोकेबाज असला तरी तो एखादी चूक करतोच, इथंही तसंच झालं जोसेफनं एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, पण ती निसटली. तिनं सगळी हकीकत पोलिसांना सांगितली, पोलिसांनी जोसेफचं स्केच काढून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर खटला दाखल झाला, फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली, पण पुढं जाऊन शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर झालं. पण जोसेफला पकडल्याची आणि त्याच्या कृत्यांची माहिती सगळीकडे पसरली, तसा अमेरिकन लोकांनी कित्येक दिवस बर्गर खाणं सोडून दिलं.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.