गलतीसे मिस्टेक झाली आणि महिलेनं थोडेथिडके नाही तर ३८ लाख रुपये जिंकले
श्रीमंती कुणाला नाही आवडत. कोणतंही काम करताना त्यातून जास्तीत जास्त पैसे मिळावे यासाठी कंबरडं मोडुस्तोवर आपण काम करतो. कोणी चांगल्या नोकऱ्या शोधतो, तर कोणी आपला एखादा बिझनेस थाटतो. पण यातही बरीचशी मंडळी झटपट पैसे मिळवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी लॉटरीचा मार्ग निवडतात. जगभरात लाखो लोक या लॉटरीवर आपलं नशीब आजमावतात.
पण कितीही म्हंटल तरी लॉटरी म्हणजे नशिबाचा खेळ आहे भिडू. एखाद्याचा तुक्का लागला कि लागतो. नाहीतर कितीही लॉटरीची तिकीट घेतली तरी काही फायदा होत नाही. बरीचशी मंडळी वर्षानुवर्षे लॉटरीची तिकीट विकत घेतात आणि लाखो रुपये वाया घालवतात. पण तरीही त्यांच्या हाताला काहीचं लागत नाही.
पण जर कोणाच्या ध्यानी-मनी सुद्धा नसेल आणि चुकून लाखोंची लॉटरी लागली तर…. तर काय विषयचं नाही ना त्याचा, नशीबचं फळफळलं. पण तुम्ही म्हणाल हे फक्त इमॅजिनचं करू शकतो बाकी काही नाही. पण भिडू हे खरचं घडलंय.
अमेरिकेतल्या एका महिलेसोबत असाच काहीसा प्रकार घडला. तिच्याकडून एक छोटी मिस्टेक झाली, पण याचं मिस्टेकनं तिला थोडंथोडकं नाही तब्बल ५० हजार डॉलर्स मिळवून दिलेत.
म्हणजे झालं काय अमेरिकेतल्या मेरीलँडइथं एक महिला हॅगर्सटाउनमधील हाफवे लिकर्सजवळ उभी होती, जिथे एक लॉटरी वेंडिंग मशीन बसवण्यात आली होती. या दरम्यान, तिच्या हातानं चुकून लॉटरी मशीनचे बटण दाबले गेलं आणि मशीन मधून तिच्यासाठी एक डीलक्स क्रेडिट तिकीट म्हणजे लॉटरीचं तिकीट बाहेर पडलं.
आता तिची काही इच्छा नव्हती आणि महत्वाचं म्हणजे ती याआधी कधीच लॉटरीच्या नादाला पण लागली नव्हती. पण आता आपलीच चुकी झाली म्हंटल्यावर नको असताना सुद्धा तिला ते तिकीट घ्यावं लागलं, ज्यासाठी तिला ५ डॉलर द्यावे लागले. पण तिला कुठं माहित होत कि आजचा दिवस आपलाच आहे.
तिनं ना-तोंड वाकडं करत ते लॉटरीचं तिकिट घेतलं. पण चुकून घ्याव्या लागलेल्या या ५ डॉलरच्या तिकिटाने तिला तब्बल ५० हजार डॉलर मिळवून दिले. म्हणजे जवळपास ३७ लाख ३१ हजार ७१० रुपये.
त्या महिलेचं नाव तर कळलं नाही पण तिने एका मुलाखतीत सांगितलं कि,
जेव्हा हे तिकीट मशीनमधून बाहेर पडले तेव्हा मला खूप राग आला. कारण, मला लॉटरी हा प्रकार अजिबात आवडत नव्हता. पण आता तिकीट मशिनमधून बाहेर आलंच आहे म्हंटल्यावर मला ५ डॉलर देऊन ते तिकीट विकत घेणं भाग पडलं. मी नाराज होऊन तिथून बाजूला झाले.
पण जसं तिनं आपल्या मोबाईलवर त्या लॉटरीच्या तिकिटाचा नंबर बघितला. तिची सगळी नाराजीचं दूर झाली. आपल्या एका चुकीमुळे बळजबरी घ्यावं लागल्याने तिकीटावर तिला ५० हजार डॉलर लागले होते. थोडा वेळ तर तिला त्याच्यावर विश्वास बसणं अवघड होत. ती गोष्ट क्लियर करण्यासाठी ती लॉटरी स्पॉन्सर करणाऱ्या ऑफिसमध्ये गेली आणि तिथं जाऊन तिकीट तपासलं.
अधिका-यांनी तिचं हे तिकीट बरोबर असल्याचं सांगितलं. आणि जेव्हा तिला खात्री पटली कि, खरचं आपल्याला ५० हजार डॉलर्सचे बक्षीस मिळालेय. तिच्या आनंदाचा पारावर गेला.
आता भिडू तीच नशीब म्हणून तिला लॉटरी लागली. आपल्यातले सुद्धा काही बहाद्दर अशा लॉटरीच्या मागे असतील. पण आपलं काम म्हणून सांगते कि, खात्रीशीर कंपनीच्या लॉटरीशिवाय यात डोकं न घातलेलच बरं, पण कॉन्फिडन्स असेल तर सबर करो….
हे ही वाच भिडू :
- एकेकाळी लॉटरी विकणाऱ्या लक्ष्यामामांनी विचारही केला नव्हता की त्यांच्याच फोटो लॉटरीवर येईल
- कधीकाळी मजूर असणारा हा लॉटरी किंग आज सगळ्याच राजकीय पार्ट्यांना खिश्यात ठेवतो.
- मटक्यावर मात करायची म्हणून तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी राज्य लॉटरीची योजना आणली.